vasantmadhavkulkarni

Smart Laddering in Mutual Fund

स्मार्ट लॅडरिंग (Smart Laddering in Mutual Funds)

स्मार्ट लॅडरिंग (SMART Laddering in Mutual Funds) तज्ञांचे असे सांगणे असते कि गुंतवणुकीतील जोखीम टाळू नका त्या जोखीमेचे व्यवस्थापन करा. व्याज दर आणि रोख्यांच्या किंमती यांच्यात व्यस्त प्रमाण असते जेव्हा व्याज दर वाढू लागतात तेव्हा रोख्यांच्या किंमती कमी होतात. अशा परिस्थितीत सामन्य गुंतवणूकदरांनी नेमके काय करावे या विषयावर एडलवाईज म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य […]

स्मार्ट लॅडरिंग (Smart Laddering in Mutual Funds) Read More »

Portfolio Review राहुल शिंदे

तुजवरी धरी अनुकंपा (Portfolio Review of Rahul Shinde) राहुल शिंदे हे पुणे स्थित लोकसत्तेचे वाचक आहेत. लोकसत्ता अर्थवृत्तांत मध्ये शिफारस प्राप्त फंडात ते ऑक्टोबर २०१७ पासून गुंतवणूक करीत आहेत. ते ‘डीआयवाय’ म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आहेत. साहजिकच सर्व फंड ‘डायरेक्ट’ (मध्यस्था शिवाय) प्रकारातील आहेत. तंत्रज्ञानामुळे गुंतवणुकीत सुलभता आली त्यामुळे कोणीही स्वतःहून गुंतवणूक करू शकतो. तंत्रज्ञानाने गुंतवणूक

Portfolio Review राहुल शिंदे Read More »

कोथिंबीरवडी की खिमा पॅटीस?

भारतीय गुंतवणूकदारांना उपलब्ध असलेल्या फंडांची त्यांच्या एका वर्षांच्या कामगिरीनुसार क्रमवारी लावली तर त्या वैश्विक गुंतवणूक करणाऱ्या फंडाची कामगिरी अव्वल दिसते. मागील महिन्याभरात रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणाऱ्या फंडांची कामगिरी भारतात गुंतवणूक करणाऱ्या फंडांच्या तुलनेत अव्वल असलेली दिसते. या फंड गटातील फंडानी २४ एप्रिल रोजीच्या ‘एनएव्ही’नुसार फंडांनी वर्षभराच्या गुंतवणुकीवर किमान १२ टक्के नफा नोंदविला आहे.

कोथिंबीरवडी की खिमा पॅटीस? Read More »

Canara Robeco Equity Diversified Fund

‘कर्ते’पण जपलेला फंड

  या वर्षांच्या जानेवारी-मार्च या तिमाहीत जगभरातील भांडवली बाजारांनी कमालीची अस्थिरता अनुभवली. या बाजार घसरणीच्या काळात ज्या फंडाच्या मुद्दलाची कमीत कमी हानी झाली त्या फंडाच्या यादीत  कॅनरा रोबेको इक्विटी डायव्हर्सिफाइड (Canara Robeco Equity Diversified Fund) हा फंड अग्रस्थानी राहिला आहे. केवळ याच पडझडीत नव्हे तर १ जानेवारी २०१० ते ३१ मार्च २०२० या मागील ११

‘कर्ते’पण जपलेला फंड Read More »

संधी की सापळा?

सध्याचे स्वस्त मुल्यांकन सापळ्यात अडकवणारे आमिष ठरण्याची शक्यता अधिक आहे. ही गुंतवणुकीची अखेरची संधी नक्कीच नव्हे. सध्याची अस्थिरता जी दिवसेंदिवस वाढत्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे त्या अस्थिरतेवर मात करण्याचा प्रयत्न योग्य मालमत्ता विभाजनातून करता येईल. वर्षभरात पावसाळ्यात लिंब सर्वात स्वस्त असतात. लिंब स्वस्त झाली म्हणून घरातील गृहिणी साठवणीचे लोणचे किंवा लिंबाचे तत्सम पदार्थ पावसाळ्यातील स्वस्त

संधी की सापळा? Read More »

कर नियोजनाचे पंचक

कर नियोजन आणि विशेषत: प्राप्तिकराचे नियोजन ही दरवर्षी करायची गोष्ट आहे. वर्षांच्या सुरुवातीला करनियोजन केले नाही तर शेवटी करवजावटीसाठी जे पर्याय उपलब्ध आहेत त्या साधनाचा उपयोग करावा लागतो. कर वजावटीस पात्र मुदत ठेवी आणि जीवन विम्यातील गुंतवणुकीत स्थैर्य असल्याने परताव्याच्या दराकडे डोळेझाक करून कर बचतीसाठी या साधनांना पंसती दिली जाते. स्थैर्याव्यतिरिक्त त्या व्यक्तीच्या संपत्ती-निर्मितीची गरज

कर नियोजनाचे पंचक Read More »

प्रचीतीविण अवघे व्यर्थ…

लोकांतात राहण्याची सवय असलेल्यांना एकांत खायला उठतो. तर एकांत प्रिय असलेल्यांना गर्दीचा त्रास होतो. जागतिक संकटाच्या भयाने सर्वांनाच मर्यादित एकांतात राहावे लागले आहे. या एकांताचा उपयोग आपल्या गुंतवणुकीचा मागोवा घेतल्यास आपल्याच चुका आपल्याला दिसून येतील. आणि घसरलेला बाजार मालमत्ता विभाजनाचे महत्व नक्कीच पटवेल. मालमता विभाजनात फारच कमी लोकांना गुंतवणुकीत रोखे फंड असल्याचे महत्व पटते. रोखे

प्रचीतीविण अवघे व्यर्थ… Read More »

अविरत निष्कलंकित

साधारण रोखे बाजारात एखादा घोटाळा झाला की त्या घोटाळ्यात कोणते फंड बाधित झाले आहेत, कोणत्या फंड घराण्यांची किती रक्कम त्यात अडकली आहे याची चर्चा सुरू असते. ताजा ‘येस बँके’चा अपघात याला अपवाद नव्हता. येस बँकेसारख्या संकटानंतर कोणी गुंतवणूकदार निश्चित उत्पन्न  देणाऱ्या गुंतवणूक साधनांचा विचार करीत असतील तर रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांचा ‘बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट

अविरत निष्कलंकित Read More »

एका रौप्य महोत्सवी कारकीर्दीची गोष्ट

गेल्या दोन दशकांत म्युच्युअल फंड व्यवसायाने भरीव कामगिरी केली आहे. त्याच वेळी वित्त बाजाराने या काळात पुष्कळ चढउतारही अनुभवले आहेत. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालासुब्रमणियन हे या व्यवसायातील असे एक धुरीण आहेत की, ज्यांनी या व्यवसायातील अशा अनेक चढ-उतारांमधून या कंपनीचे यशस्वी नेतृत्व केले. मग तो कसोटीचा काळ ‘डॉट

एका रौप्य महोत्सवी कारकीर्दीची गोष्ट Read More »

Mutual Fund Performance

‘कर्त्यां’चे प्रगतीपुस्तक

म्युच्युअल फंड उद्योगातील व्यवस्थापना खालील मालमत्तेत जानेवारी २०२० मध्ये, डिसेंबरच्या तुलनेत ४.९ टक्के वाढ नोंदवत उच्चांकी २७.८५ लाख कोटींवर पोहचली आहे. एप्रिल २०१९ पासून या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेत ४.०६ लाख कोटींची (१७.०१%) वाढ झाली आहे. समभाग गुंतवणूककरणाऱ्या फोलीओंची संख्या जानेवारी ६.८९ कोटींवर पोहचली असून, म्युच्युअल फंडांच्या एकूण फोलीओच्या ७८ टक्के आहे. रोखे गुंतवणूक

‘कर्त्यां’चे प्रगतीपुस्तक Read More »

गुंतवणुकीवरील कमी परताव्याचे निदान!

जानेवारी २०१८ पासूनच म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीवरील परतावा घटण्यास सुरुवात झाली. समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या सर्वच फंड गटांनी एकाद-दुसरा अपवाद वगळता मागील पाच वर्षांत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)पेक्षा कमी परतावा दिला आहे. दर वर्षी आधीच्या पाच वर्षांचा परतावा अगदी वेगळा दिसत आहे. निफ्टीने २०१२ ते २०१७ आणि २०१३ ते २०१८ या कालावधीत अनुक्रमे १५

गुंतवणुकीवरील कमी परताव्याचे निदान! Read More »

वावटळीतील उल्लेखनीयता

कर वजावटीसाठी करायच्या गुंतवणूक साधनांपैकी ‘ईएलएसएस फंड’ हे अन्य कर वजावटपात्र साधनांपैकी सर्वात कमी कालावधी असणारे गुंतवणूक साधन आहे. डीएसपी टॅक्स सेव्हर फंड हा २०१५ पासून ‘लोकसत्ता- कर्ते म्युच्युअल फंड’ यादीचा भाग राहिला आहे. या फंडाचे निधी व्यवस्थापन अपूर्व शहा यांच्याकडून रोहित सिंघानिया यांच्याकडे जुलै २०१५ मध्ये आले. या फंड घराण्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर फंडाचे निधी व्यवस्थापन

वावटळीतील उल्लेखनीयता Read More »

काटय़ांचे सरले दिसं आता मधुमास!

स्मॉल कॅप समभागांवर अर्थव्यवस्थेचा व्यापक परिणाम होत असतो. सध्या अर्थव्यवस्था व्यापारचक्रीय मंदीच्या विळख्यातून बाहेर पडत आहे. शिवाय दोन वर्षांतील तीव्र घसरणीमुळे स्मॉल कॅपचे नव्याने गुंतवणूक करण्यास एक आकर्षक मूल्यांकन उपलब्ध आहे. एकूणच पोर्टफोलिओ परतावा वाढविण्यासाठी गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओचा लहानसा हिस्सा स्मॉल कॅप गुंतवणुकीसाठी राखून ठेवायला हवा. गेल्या दोन वर्षांमध्ये स्मॉल कॅप समभागांची मोठी घसरण झाली आहे.

काटय़ांचे सरले दिसं आता मधुमास! Read More »

आजवर ज्यांची वाहिली पालखी…

नवीन वर्षांच्या आगमनाबरोबर शिफारसपात्र फंडांची यादी तयार होत असते. मध्यंतरी ‘सेबी’ने म्युच्युअल फंडाचे सुसूत्रीकरण लागू केले, त्यानंतर प्रसिद्ध होणारी ही पहिली यादी आहे. या वर्षीच्या शिफारसप्राप्त फंडांची यादी आणि जानेवारी २०१८ ची यादी यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. मागील यादीतील शिफारसप्राप्त फंडांच्या कामगिरीत घसरण झाल्याने वगळल्या गेलेल्या फंडांची संख्या अधिक आहे. यादी बनविण्यास सुरुवात केली तेव्हा

आजवर ज्यांची वाहिली पालखी… Read More »

अबोल हा पारिजात आहे!

कर बचतीसाठी म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणाऱ्या ईएलएसएस फंड गटात ज्या योजनांनी १४ टक्के (कारण मुद्दल पाच वर्षांत दुप्पट होते) किंवा त्याहून अधिक परतावा देणारे जे फंड आहेत त्या फंडात बीओआय अ‍ॅक्सा टॅक्स सेव्हरचा समावेश होतो. सरलेल्या वर्षांतील ध्रुवीकरण आणि अस्थिरतेचा अचूक फायदा उठवत निधी व्यवस्थापकांनी अलीकडील काळात गुंतवणुकीत केलेल्या फेरबदलामुळे फंडाच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे दिसून

अबोल हा पारिजात आहे! Read More »

धोरण बदलाचा लाभार्थी

डिएसपी फोकस फंडाचा एस अँण्ड पी बीएसई ५०० टीआरआय हा मानदंड आहे. हा फंड मानदंडसापेक्ष गुंतवणूक करणारा फंड आहे. १ ऑक्टोबर २०१८ पासून फंडाची सूत्रे हरीश झव्हेरी यांच्याकडून गोपाळ अग्रवाल यांच्याकडे आली. आधीच्या निधी व्यवस्थापकांनी वाहन उद्योगात मानदंडापेक्षा केलेली अधिक गुंतवणूक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला गुंतवणुकीतून पूर्णपणे वगळणे फंडाच्या हीन परताव्यास कारण ठरले. या काळात

धोरण बदलाचा लाभार्थी Read More »

ध्रुवीकरणाचा अतिरेक झालेले वर्ष

समभाग गुंतवणूकदरांसाठी २०१९ हे वर्ष संस्मरणीय ठरले. या वर्षांत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांचे पडसाद गुंतवणुकीवरील परताव्यात उमटले. भारतात लोकसभेच्या निवडणुका, निकालासंबंधाने अनिश्चितता, जागतिक व्यापार युद्ध, त्यामुळे प्रमुख आर्थिक निर्देशांकांत वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांत वेगाने झालेली घट या परिणामी वर्षांरंभी निर्देशांकांचा प्रवास खालच्या दिशेने सुरू होता. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी फेब्रुवारीत गाठलेला तळ आणि निवडणुकांच्या निकालानंतर मे महिन्यांत

ध्रुवीकरणाचा अतिरेक झालेले वर्ष Read More »

‘विविधता वास्तविक असावी, आभासी नव्हे’

सरत्या वर्षांत रोखे बाजारातील अनियमिततेमुळे रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांच्या मालमत्तांना गळती लागली होती. याउलट आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या रोखेसंलग्न फंडांच्या मालमत्तेत वाढ झाल्याचे दिसून येते. या फंड प्रकारात ‘आयडीएफसी बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड’ सर्वाधिक मालमत्ता असलेला फंड ठरला आहे. आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या स्थिर उत्पन्न फंडांचे गुंतवणूक प्रमुख असलेले सुयश चौधरी यांची बाजारातील यशाची रणनीती समजावून

‘विविधता वास्तविक असावी, आभासी नव्हे’ Read More »

uti-equity-fund

फंड दहा हजारी

परताव्याच्या कोष्टकात यूटीआय इक्विटी फंड अग्रस्थानी जरी नसला तरी मागील एका वर्षांत कामगिरीत सर्वोत्तम सुधारणेचा लाभार्थी असणारा हा फंड आहे. मल्टीकॅप फंड गटात १२ डिसेंबरच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार त्याचा वार्षिक परतावा १२.२८ टक्के आहे. डिसेंबर २०१८ मध्ये मल्टीकॅप फंड गटाच्या कोष्टकात तळच्या एक चर्तुथांश (क्वार्टाइल) हिश्श्यात गणना झालेल्या या फंडाने वर्षभरात वरच्या एक चर्तुथांश फंडात

फंड दहा हजारी Read More »

midcap mutual fund details

मिडकॅप आवडे कोणाला?

सध्या नव्याने गुंतवणुकीसाठी सुरू असलेला (एनएफओ), प्रिन्सिपल मिडकॅप फंड हा दखल घ्यावा असा फंड आहे. मिडकॅप फंडांना एकूण मालमत्तेच्या किमान ६५ टक्के मालमत्ता ‘सेबी’च्या व्याख्येनुसार मिडकॅप समभागांत गुंतवणूक करावे लागतात. म्युच्युअल फंड विश्लेषक या भूमिकेतून एखाद्या ‘एनएफओ’ची शिफारस करताना कमालीचा सावधानता बाळगावी लागते. परंतु फंड घराणे, आणि त्यांची गुंतवणूक व्यवस्थापन पाहणाऱ्या मंडळींवरील विश्वास या ‘एनएफओ’ची

मिडकॅप आवडे कोणाला? Read More »

Mid cap fund

मिडकॅप सम्राट

मागील दीड वर्ष मिडकॅप गुंतवणूकदारांसाठी वावटळीचे वर्ष ठरले. ५ जानेवारी २०१८ रोजी गाठलेल्या शिखरानंतर मिडकॅप निर्देशांकाचा माघारी प्रवास सुरू झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी हे लार्जकॅप निर्देशांक नवीन शिखरे पादाक्रांत करीत असताना एस अँड पी बीएसई मिडकॅप निर्देशांकांचा मागील २३ महिन्यांतील प्रवास नकारात्मक राहिल्याने गुंतवणूकदारांची मिडकॅपकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात अजून सकारात्मकतेचा अभाव दिसून येत आहे. मिडकॅप समभागांच्या

मिडकॅप सम्राट Read More »

फंड गुंतवणूकदारांचे हितरक्षण करणारा निर्णय

बँकेतर वित्तीय कंपन्यांसाठी दिवाळखोरी आणि नादारी संहिता उपलब्ध नसतानाही रिझव्‍‌र्ह बँकेने या कायद्याची कक्षा रुंदावण्यात येत असल्याचे डीएचएफएल प्रकरणात दाखवून दिले. हे स्तुत्य अशासाठी की, बँका स्वत:च्या हितरक्षणासाठी किरकोळ ठेवीदार, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा बळी देत होत्या. भारताचे उद्योगक्षेत्र एका संक्रमणातून जात आहे. या संक्रमणाचे पडसाद संबंधितांवर पडताना दिसत आहेत. मुंबईस्थित दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल)

फंड गुंतवणूकदारांचे हितरक्षण करणारा निर्णय Read More »

तारांकित सुधारणेचा संभाव्य लाभार्थी

एलआयसी एमएफ लार्जकॅप, जो पूर्वी एलआयसी एमएफ ग्रोथ फंड या नावाने ओळखला जात होता. या फंडाने मागील वर्षभरात १८.८६ टक्के वार्षिक परतावा दिला असून लार्जकॅप गटात हा फंड दिनांक ८ नोव्हेंबरच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार तिसऱ्या क्रमांकावर, तर एक वर्षांच्या ‘एसआयपी’ परताव्यात लार्जकॅप गटात चौथ्या स्थानी असून त्याने २१.५२ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. तीन वर्षे

तारांकित सुधारणेचा संभाव्य लाभार्थी Read More »

आश्वासक वर्षपूर्ती

फोकस्ड इक्विटी फंड या फंड प्रकारात गुंतवणुकीतील समभाग केंद्रित जोखीम आणि जोखमीमुळे मिळणारा लाभ पदरात पडण्यासाठी फंडाची काळजीपूर्वक निवड आवश्यक असते. फोकस्ड फंड या फंड प्रकारात ‘सेबी’च्या नियमानुसार कमाल ३० समभागांत गुंतवणूक करणे आवश्यक असल्याने निधी व्यवस्थापक काळजीपूर्वक समभागकेंद्रित पोर्टफोलिओ तयार करतात. फोकस्ड फंड या फंड प्रकाराच्या या वैशिष्टय़ामुळे समभाग एकाग्रतेचा धोका अधिक असतो. फंडाच्या

आश्वासक वर्षपूर्ती Read More »

तुझ्या, जपानी भाषालिपिसम अगम्य सुंदरता…

समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडाच्या मागील वर्षभरात नफ्याची चिंताजनक परिस्थिती असतांना लाँग टर्म गिल्ट फंड या फंड गटातील फंडांनी मागील एका वर्षांत २० टक्क्यांपेक्षा अधिक वार्षिक परतावा दिला आहे. मालमत्ता विभाजनाचे महत्त्व यावरून लक्षात येईल. पोर्टफोलिओत समभाग आणि रोखे यांचे योग्य प्रमाण म्हणूनच महत्त्वाचे ठरते. गिल्ट किंवा जी-सेक फंडांचा वर्षभरातील लक्षवेधक परतावा मिळण्यास प्रामुख्याने रिझव्‍‌र्ह बँकेने

तुझ्या, जपानी भाषालिपिसम अगम्य सुंदरता… Read More »

…तरी गमते उदास

‘‘देशाच्या अर्थव्यवस्थेने राम म्हटला असून, अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ताज्या वित्तीय सुधारणा म्हणजे शस्त्रक्रिया यशस्वी परंतु रुग्ण दगावला या पद्धतीच्या आहेत. आमच्या शीर्षस्थ नेत्यांना हे कोणी तरी समजावून सांगायला हवे,’’ हे बर्वे कुलोत्पन्नांचे शब्द लिफ्टसाठी थांबलेल्यांच्या कानात उकळत्या शिशासारखे घुसले. हे शब्द ऐकून बटाटा अपार्टमेंटमधील सर्वानाच धक्का बसला. पंचेधारी बाबा बर्व्यांच्या घरातून अंडय़ाची टरफले बाहेर फेकली

…तरी गमते उदास Read More »

फलाटदादा फलाटदादा… सिग्नल पडला आली गाडी

भारतीय रेल्वेमध्ये ऑनलाईन प्रवासी तिकीट आरक्षण, प्रवाशांसाठी केटरिंग आणि बाटलीबंद पेयजल अशा व्यवसायातील एकाधिकारशाहीमुळे कंपनीला आपल्या उत्पादन आणि सेवांवर किंमत ठरविण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे आणि दुसऱ्या कोणत्याही स्पर्धकाचा दबाव नाही. याचा फायदा गुंतवणूकदारांना कंपनीच्या सूचिबद्धतेवेळी नक्कीच मिळेल. भारतीय रेल्वेच्या मालकीची इंडियन रेल्वे कॅटिरग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) ही सार्वजनिक उपक्रमातील ‘मिनीरत्न’ दर्जा असलेली कंपनी

फलाटदादा फलाटदादा… सिग्नल पडला आली गाडी Read More »

विजयी वीर

व्यवसायातील वृद्धी आणि गुणवत्ता या दोहोंचा संगम असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक करताना मोठे अधिमूल्य द्यावे लागते. जे मोजके निधी व्यवस्थापक या अधिमूल्याची किंमत जाणतात त्यात यांचा समावेश आहे. अर्थव्यवस्था मंदावली असताना आपल्या फंडातील गुंतवणूकदारांचे मुद्दल शाबूत ठेवून त्यावर नफा मिळविण्यासाठी निधी व्यवस्थापकांना रात्रीचा दिवस करावा लागतो. समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापक मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कठोर परिश्रम

विजयी वीर Read More »

‘विवेका’नुभव

नारायण निवर्तल्याला पंचवीसहून अधिक वर्षे झाली. लग्नातल्या पंगतीतले श्लोक कधीच इतिहासजमा झाले. मग पंगतीच्या जागी बुफे आले. हल्ली तर लग्नाचा इव्हेंट झाला आहे. ज्यांच्या लग्नात नारायण राबला, त्या जुन्याजाणत्या मंडळींना आपल्या नातवंडांच्या लग्नाच्या दिवशी नारायणाची आठवण हटकून होतेच. गणेश उत्सवाच्या निमित्ताने पुण्यात जाणे झाले होते. गणपतीच्या दिवसांत पुण्यात असण्यासारखे सुख नाही. कुटुंबाने रात्री गणपतीचे देखावे

‘विवेका’नुभव Read More »

“गुंतवणूकदाराचे आर्थिक वर्तन त्याच्या पैशावरील परतावा निश्चित करते”

यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी भीती आणि हाव या दोन भावनांवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. गुंतवणुकीवर मिळणारा परतावा केवळ फंडांच्या कामगिरीवर न ठरता गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर सुद्धा ठरत असतो. महाराष्ट्रात सध्या यात्रांना उधाण आले आहे. आजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री आणि भावी उपमुख्यमंत्री आपापल्या पक्षाच्या यात्रेत व्यग्र आहेत. नव्याने गुंतवणूक करावी असे वातावरण नसल्याने फंड घराण्यातील अधिकाऱ्यांना उसंत असल्याने, मलादेखील फंड

“गुंतवणूकदाराचे आर्थिक वर्तन त्याच्या पैशावरील परतावा निश्चित करते” Read More »

आधुनिक युगातील ‘फणसाळकर’ मास्तर

पुलंनी ‘गणगोत’मध्ये फणसाळकर मास्तरांचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. पुलंचे आजोबा ‘ऋग्वेदी’, सूर्यनमस्काराचार्य सोमण मास्तर, लष्करी खाक्याचे दादा पारधी, श्रीमंत चांदीवाले परांजपे आणि लौकिक अर्थाने मास्तरकी न केलेल्या परंतु मूळच्या शिक्षकी वृत्तीमुळे पाल्र्यात ‘फणसाळकर मास्तर’ अशी ओळख असलेल्यांचा आदराने उल्लेख त्यांनी केला आहे. शताब्दीच्या उंबरठय़ावर असलेल्या पाल्र्याचे टिळक मंदिर स्थापन करण्यापासून कार्यक्रमाची सूचना देणारी मंदिराची घंटा वाजविण्याचे

आधुनिक युगातील ‘फणसाळकर’ मास्तर Read More »

गुंतवणूकदारांच्या सहनशीलतेचा कस पाहणारा कालखंड

दोन वर्षांपूर्वी सर्वाधिक परतावा देणारे म्युच्युअल फंड आज सोन्याचा मुलामा गळून पडलेल्या कथिलासारखे वाटू लागले आहेत. अशा समयी गुंतवणूकदारांनी करायचे तर काय? साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या १० तारखेदरम्यान फंडांची मागील महिन्यातील कामगिरी तपासणे हा अनेक वर्षांचा प्रघात आहे. जून महिन्याची आकडेवारी तपासताना काहीशी अपेक्षित तरीही धक्कादायक आकडेवारी समोर आली. तब्बल ७,००० कोटींपेक्षा (एक अब्ज अमेरिकी डॉलर)

गुंतवणूकदारांच्या सहनशीलतेचा कस पाहणारा कालखंड Read More »

Scroll to Top