अर्थ वल्लभ

धोरण बदलाचा लाभार्थी

06 Jan 2020 • 1 min read

डिएसपी फोकस फंडाचा एस अँण्ड पी बीएसई ५०० टीआरआय हा मानदंड आहे. हा फंड मानदंडसापेक्ष गुंतवणूक करणारा फंड आहे. १ ऑक्टोबर २०१८ पासून फंडाची सूत्रे हरीश झव्हेरी यांच्याकडून गोपाळ अग्रवाल यांच्याकडे आली. आधीच्या निधी व्यवस्थापकांनी वाहन उद्योगात मानदंडापेक्षा केलेली अधिक गुंतवणूक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला गुंतवणुकीतून पूर्णपणे वगळणे फंडाच्या हीन परताव्यास कारण ठरले. या काळात ‘ऑटो निर्देशांका’त ३५ टक्के घसरण झाली तर ‘आयटी निर्देशांक’ १०० टक्क्यांनी वधारला. या दोन्ही चुका विद्यमान निधी व्यवस्थापकांनी सुधारल्या असल्याने फंडाच्या परताव्यात सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. मागील वर्षभरात निधी व्यवस्थापकांनी वाहन उद्योगातील गुंतवणूक कमी करून एचडीएफसी लाईफ आणि एसबीआय लाईफ या कंपन्यांत गुंतवणूक केली. मागील वर्षभरात रिलायंस इंडस्ट्रीजच्या मात्रेत सातत्याने केलेली वाढ फंडाच्या कामगिरी सुधारणेस एक कारण ठरली. आधीच्या निधी व्यवस्थापकांचे धोरण फोकस्ड फंड असल्याने समभाग केंद्रित ‘हाय रिस्क हाय रिटर्न’ या प्रकारचे होते. साहजिकच ज्या उद्योग क्षेत्रांची चलती होती त्या उद्योग क्षेत्रात अधिक गुंतवणूक करीत असत. विद्यमान निधी व्यवस्थापकांचे धोरण फंडाची गुंतवणूक ‘डायव्हर्सी फाईड इक्विटी फंड’ या प्रकारचे असल्याने निधी व्यवस्थापक मानदंडसापेक्ष कोणत्याही उद्योग क्षेत्रात अवास्तव गुंतवणूक करीत नाहीत किंवा नकारात्मक दृष्टीकोन असून देखील एखादे उद्योग क्षेत्र गुंतवणुकीतून पूर्ण वगळत नाहीत. गुंतवणुकीचे सुधारित धोरण समभाग केंद्रित परंतु उद्योग क्षेत्र विकेंद्रित प्रकारचे आहे. याचे परिणाम फंडाच्या कामगिरीत दिसू लागले असून सहा महिने, तीन महिने आणि एक महिना कालावधीत फंड पहिल्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. एक वर्षापुर्वीच्या पाच वर्ष क्रमवारीत आणि एक वर्ष क्रमवारीत फंडाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली असून फंड अनुक्रमे पाचव्या आणि बाराव्या क्रमांकावर आहे. फोकस्ड फंड गटाच्या मागील एका वर्षाच्या ‘एसआयपी’ कामगिरीत अव्वलस्थानी असलेल्या या फंडाची नवीन वर्षाची पहिली शिफारस करीत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

म्युच्युअल फंड  विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

 

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top