अर्थ वल्लभ

मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड: सध्याची कामगिरी कमजोर, पण दीर्घकालीन रेकॉर्ड दमदार!

12 Oct 2026 • 1 min read

या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

आज दुसरी माळ. काल पासून आश्विन नवरात्रीला प्रारंभ झाला. नवरात्रीच्या निमिताने सरस्वती आणि लक्ष्मी यांचे स्मरण करून आजच्या विषयाला सुरवात करतो. म्युच्युअल फंड संशोधनाची एक पध्दती आहे. भविष्यात कोणते फंड अधिक चांगला परतावा मिळवून देतील,हे शोधून काढणे हे या संशोधनाचे उद्दिष्ट असते. याचे संशोधन करत असतांना काही असे फंड हाताला लागतात, ज्यांच्या बद्दल आश्वासक राहावे असे संकेत देतात, असे तीन फंड (१२ आणि २६ ऑक्टोबर, आणि ९ नोव्हेंबर) वाचकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. त्यापैकी आजचा पहिला फंड मोतीलाल ओस्वाल मिडकॅप फंड. या फंडाची पहिल्यांदा शिफारस ७ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रकाशित झाली होती. या दिवशी केलेल्या एक रक्कमी गुंतवणुकीवर २.५६ टक्क्यांचा तोटा झाला आहे तर या दिवशी सुरु केलेल्या एसआयपीचे २४ हप्ते गेले असून २.६५ टक्के वार्षिक नफा झाला आहे.
आर्थिक वर्ष २०२६ मध्ये म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता आणि गुंतवणूकदारांच्या खात्यात (फ़ोलिओ) वाढ झाली असली, तरी एक वर्षापूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर तोटा झालेल्या फंडांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत तिप्पट झाली आहे. १ ऑक्टोबर २०२६ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसार १ ऑक्टोबर २०२५ रोजी केलेल्या गुंतवणुकीवर तोटा झालेल्या फंडांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत २४८ वरून जवळपास तिप्पट होऊन ७३१ वर पोहोचली. त्याच वेळी, १२ टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या योजनांची संख्या ३०८ वरून १७६ पर्यंत घसरली आहे. शून्य ते ५ टक्क्यांपर्यंत तोटा झालेल्या फंडांची संख्या मागील वर्षातील १७२ वरून वाढून ४५५ तर ५ ते १० टक्के तोटा झालेल्या फंडांची सांख्य संख्या ३८ वरून १४६ पर्यंत वाढली, तर १० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक तोटा झालेल्या फंडांची संख्या ३० वरून १०१ झाली आहे. तर परताव्याच्या दुसऱ्या टोकाचा विचार केल्यास १० टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या योजनांची संख्या ३०४ वरून १९८ पर्यंत कमी झालीअसून, ५ टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या योजनांची संख्या १०५६ वरून ७४२ पर्यंत घटली, तर ५ ते १० टक्के दरम्यान वार्षिक परतावा देणाऱ्या फंडांची संख्या ८५८ वरून ५३२ पर्यंत घसरली आहे. ही वार्षिक परताव्याची आकडेवारी बाजारा बद्दल बरेच काही सांगून जाते. तुलनेने कमी तोटा झालेल्या फंडांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे.बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणुकीवर तोटा झालेल्या फंडांच्या संख्येत वाढ झाल्याचे मानले जाते.
म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता आणि गुंतवणूकदारांचा सहभाग वाढत असतानाही परतावा समाधानकारक राहिलेला नाही. व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयुएम) मागील वर्षातील ६५.७ लाख कोटी रुपयांवरून १२.२ टक्क्यांनी वाढून मार्च २०२६ च्या अखेरीस ७३.७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये इक्विटी गुंतवणूक करणाऱ्या फंडांमध्ये ३.५ लाख कोटी रुपयांचा निव्वळ ओघ नोंदवला गेला; यामध्ये फ्लेक्सी-कॅप फंड्स (८९,२१३ कोटी रुपये), स्मॉल-कॅप फंड्स (५१,८७२ कोटी रुपये) आणि मिड-कॅप फंड्स (५१,१९७ कोटी रुपये) यांचा प्रामुख्याने समावेश होता. एका बाजूना एका बाजूला मालमत्ता आणि म्युच्युअल फंडांच्या खात्यांच्या संख्येत वाढ होत असली तरी तरी या वाढीव गुंतवणूकीवर तोटा झालेल्या फंडांच्या

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top