अर्थ वल्लभ

साद घालते अशी जीवाला ….

28 Sep 2026 • 1 min read

साद घालते अशी जीवाला ….

अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडे दीर्घकालीन गुंतवणुकीतून संपत्ती निर्मिती ऐवजी अल्पकालीन नफ्याच्या उद्देशाने केलेली गुंतवणूक म्हणून पाहतात. त्यामुळेच, गुंतवणूकदारांना सल्ला दिला जातो की त्यांनी आपल्या पोर्टफोलिओच्या केंद्रस्थानी वैविध्यपूर्ण फंड ठेवावेत जसे की फ्लेक्झीकॅप आणि मल्टीकॅप फंड. याचे कारण भारतातील सर्वाधिक फंडांचा मानदंड असणारा ‘निफ्टी ५०’ (Nifty 50) देखील अनेकदा काही मोजक्या उद्योग क्षेत्रांकडे झुकलेला दिसून आला आहे. या निर्देशांकात ‘फायनान्शियल’ (वित्तीय) क्षेत्राचा वाटा अनेकदा एक-तृतीयांशपेक्षा जास्त राहिला आहे, तर बाजाराच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ‘आयटी’ आणि ‘एनर्जी’ क्षेत्रांचे वर्चस्व राहिले आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे दीर्घकालीन परतावा कमी होतो का? दोन दशकांच्या ‘एनएव्ही’ डेटाचा वापर करून केलेल्या १०-वर्षीय आणि १५-वर्षीय ‘रोलिंग रिटर्न्स’च्या विश्लेषणातून असे दिसून येते की, फ्लेक्झीकॅप आणि मल्टीकॅप दीर्घ कालावधीत सर्वात चांगला परतावा देतात आणि कमी अस्थिर असतात. ‘फ्लेक्सी-कॅप’ फंड गट जो वैविध्यपूर्ण ‘ॲक्टिव्ह इक्विटी फंडांचे’ प्रतिनिधित्व करतो, त्या फंड गटाने १०-वर्षीय रोलिंग रिटर्नच्या आधारे किमान ३ टक्के आणि १५-वर्षीय रोलिंग रिटर्नमध्ये किमान ४ टक्के अधिक परतावा दिला. अभ्यासासाठी किमान २० वर्षे पूर्ण केलेले १० फेक्झीकॅप फंड उपलब्ध आहेत. या फंडाचा २० वर्षांचा ‘एनएव्ही’ इतिहास असलेल्या प्रत्येक फ्लेक्झीकॅप फंडाच्या १०-वर्षीय आणि १५-वर्षीय रोलिंग रिटर्न तपासले. या दहा फंडात सर्वात चांगली कामगिरी बंधन फ्लेक्झीकॅप फंडाची आहे. दुसऱ्या क्रमांकावर एचडीएफसी फ्लेक्झीकॅप तर तिसऱ्या क्रमांकावर फ्रॅकलीन फ्लेक्झीकॅप फंड आहे. गमतीचा भाग असा की फ्रॅकलीन फ्लेक्झीकॅप उद्या ३१ वर्षे पूर्ण करेल तर आज बंधन फ्लेक्झीकॅप फंड २१ वर्षे पूर्ण करीत आहे.
भारतीय समभागांच्या मूल्यांकनात सद्य स्थितीत मोठी तफावत दिसून येत आहे. लार्जकॅप अत्यंत स्वस्त तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप लार्जकॅपच्या तुलनेत महाग दिसत आहेत. उपलब्ध मुल्यांकन संधींनुसार विविध बाजार गटात गुंतवणूक बदलण्याची लवचिकता ‘फ्लेक्सी-कॅप फंडांना’ असते यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीत बाजार गटांची विविधता मिळते. जे गुंतवणूकदार किमान पाच वर्षे एसआयपी करू इच्छितात ते बंधन फ्लेक्सीकॅप फंडाचा विचार करू शकतात. सप्टेंबर २००५ मध्ये आयडीएफसी इम्पिरिअल इक्वीटी या नांवाने सुरू झालेला हा फंड आज बंधन फ्लेक्झीकॅप म्हणून ओळखला जातो. या फंडाने कामगिरीचा विश्वासार्ह आलेख आणि एक वेगळा पोर्टफोलिओ तयार केला आहे. ‘आउट ऑफ फॅशन’ला प्रमाण मानून प्रवाहा विरुद्ध गुंतवणूक करणाऱ्या या फंडाने २८ सप्टेंबर २००५ ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसार वार्षिक १५.४४ टक्के दराने परतावा दिला आहे. या फंडाचे विराज कुलकर्णी हे २४ जानेवारी २०२४ पासून निधी व्यवस्थापक आहेत.

पोर्टफोलिओ रचना

निफ्टी टॉप १० इक्वल वेट इंडेक्स हा एक निर्देशांक आहे. हा निर्देशांक हा लेख लिहित असतांना जानेवारीपासून १८ टक्के घसरला आहे. तर ‘निफ्टी ५०० इक्वल वेट इंडेक्स’ या निर्देशांकात ५०० कंपन्या असून प्रत्येक कंपनीचा प्रभाव ०.२ टक्के आहे. हा निर्देशांक जानेवारीपासून ४ टक्के वधारला आहे. म्हणजे दोन निर्देशांकांच्या परताव्याच्या दरात २२ टक्के फरक आहे. या दोन निर्देशांकाची गेल्या पाच वर्षातील कामगिरी तपासली तर ‘निफ्टी टॉप १० इक्वल वेट इंडेक्स’ने वार्षिक ७ टक्के वाढ नोंदली आहे. आणि याच काळात ‘निफ्टी ५०० इक्वल वेट इंडेक्स’ने वार्षिक १४.८७ टक्के वाढ नोंदली आहे. सध्या बाजारा बाबत अशी वदंता आहे की या आघाडीच्या १० कंपन्यांच्या (ॲक्सिस बँक, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) नफ्यात पुरेशी वाढ होत नाही आहे. म्हणून या दहा १० कंपन्यांचे मुल्यांकन गेल्या पंधरा वर्षातील निच्चांकी मुल्यांकन आहे. या पैकी काही कंपन्या तर कोविड काळातील निच्चांकाच्या पण खाली गेल्या आहेत. ‘निफ्टी ५०० इक्वल वेट इंडेक्स’चा ‘मेडीयन पीई’ १७ आहे आणि निफ्टी’त या दहा कंपन्यांचा प्रभाव (वेट) ४० टक्के आहे. त्यामुळे या दहा कंपन्यांमुळे निफ्टी पीई बाधित झालेला आहे. वास्तविक निफ्टीचा पीई (या दहा कंपन्या वगळून) उर्वरित ४९० कंपन्यांचा विचार केला असेल तर मेडीयन पीई ३५ पट असून ‘वन इयर फॉरवर्ड पीई २८ पट आहे. आणि निफ्टी टॉप १० इक्वल वेट इंडेक्स’चा ‘ट्रेलिंग पीई’ १८ पट आहे आणि वन यिअर फॉरवर्ड पीई’१६ आहे.

२०१६ ते २०२६ दरम्यानचा विचार केल्यास गेल्या १० वर्षात या मोठ्या १० कंपन्यांनी (निफ्टी टॉप १० इक्वल वेट इंडेक्स) वार्षिक १३ टक्के परतावा दिला आहे. आणि, आहे ‘निफ्टी ५०० इक्वल वेट इंडेक्स’ने १० वर्षात १३ टक्केच परतावा दिला आहे परंतु ही दहा वर्षे २०१६ इत २०२१ आणि २०२१ ते २०२६ अशी विभागली तर, पहिल्या ५ वर्षात हे या दहा कंपन्यांनी विस्तृत बाजारापेक्षा सरस कामगिरी केली आहे. आणि या काळात विस्तृत बाजाराने ६-७ टक्के परतावा दिला होता. बहुतेकांना आठवत असेल, एचडीएफसी, रिलायन्स, आयटीसी, टीसीएस, इंफोसिस, आणि कोटक (ह्रितिक) यांनीच बाजार चालवला होता. मात्र गेल्या पाच वर्षात चित्र उलट आहे. या पाच कंपन्या स्थिर आहेत आणि, उर्वरित बाजराने समाधानकारक परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षात यांच योगदान १८ टक्के आहे आणि उर्वरित बदराचे योगदान (४९० कंपन्यांचे) योगदान २४ टक्के आहे. बाजार हा नेहमीच आवर्तीय पद्धतीने वाटचाल करत असतो. जेव्हा तुम्ही आवर्तनाच्या एका टोकाला असता, तेव्हा तुम्हाला गतीच्या विरुद्ध प्रवास करायचा असतो आणि तेव्हाच मोठा परतावा मिळतो. तुम्ही २०२०-२१ मध्ये बहुसंख्य अशा मताचे होते की एचडीएफसी बँक घ्या, कोटक बँक घ्या, टीसीएस घ्या, इन्फोसिस घ्या, कारण या कंपन्यांच्या गुंतवणुकीत नफा आहे. परंतु आज या कंपन्या पुढील पाच वर्षे अशाच राहतील या कंपन्या वगळून खरेदी करा असे सांगणारे आहेत. परंतु या फंडाचे निधी व्यवस्थापक मनीष गुनावाणी आणि विराज कुलकर्णी असे मानत नसावेत, या कंपन्यांचे मुल्यांकन इतके स्वस्त आहे की आगामी तीन ते पाच वर्षात या कंपन्या अविश्वनीय परतावा देतील. म्हणून निधी व्यवस्थापकांनी या कंपन्यांत एकूण पोर्टफोलीओच्या ५० टक्के रक्कम गुंतविली आहे. या फंडाची रणनीती प्रवाहा विरुद्ध गुंतवणूक करण्याची (काउंटर सायक्लिकल एलोकेशन) म्हणजे जेव्हा मिड अँड स्मॉल कॅप खूप महाग असतात तेव्हा २० टक्के अधिक गुंतवणूक मिड आणि स्मॉल कॅपमध्ये करायची आणि मिड अँड स्मॉल कॅप जेव्हा खूप स्वस्त असतात तेव्हा ५० टक्के गुंतवणूक मिड आणि स्मॉल कॅप मध्ये करायची आज या फंडाची मिड आणि स्मॉल कॅपमध्ये २२ टक्के गुंतवणूक आहे. (मध्यंतरी हा फंड आयडीएफसी प्रीमिअर इक्वीटी म्हणून ओळखला जात असे आणि केनेथ अॅड्रु निधी व्यवस्थापक असतांना हे प्रकर्षाने जाणवत असे.) उद्योग क्षेत्राचा विचार केल्यास बँक, माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहकाभिमुख वस्तू यात निर्देशांकाच्या तुलनेत अतिरिक्त गुंतवणूक आहे. तर भांडवली वस्तू औद्योगिक वापराच्या वस्तू, धातू यात निर्देशांकाच्या तुलनेत अतिरिक्त गुंतवणूक आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, मारुती, आयटीसी आणि टाटा कन्सल्टन्सी या आघाडीच्या दहा गुंतवणुका आहेत. मजबूत व्यवसाय अनेकदा अधिमुल्यावर व्यवहार करतात. तथापि, भविष्यातील परतावा हा कंपन्यांच्या कमाईवर अवलंबून असतो. जेव्हा वाढ निराशाजनक असते, तेव्हा महागडे ग्राहकाभीमुख, ऑटोमोबाईल आणि स्मॉल-कॅप कंपन्या झपाट्याने खाली येऊ शकतात. बंधन फ्लेक्सीकॅप फंडाची रणनीती स्पष्ट असल्याने आणि २० वर्षाचा इतिहास उपलब्ध असल्याने या फंडाची शिफारस केली आहे. हा फंड एक मुख्य सक्रियपणे व्यवस्थापित इक्विटी फंड म्हणून काम करू शकतो. पाच-सात वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या दीर्घकालीन एसआयपीसाठी गुंतवणूकदारांनी या फंडाचा विचार करावा. एकंदरीत, गेल्या एकवीस वर्षात सहा निधी व्यवस्थापकांनी व्यवस्थापित केलेल्या या फंडाची सध्याची कामगिरी फार उत्साहजनक नसली तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी नक्कीच विचार करावी अशी आहे. म्हणूनच अनेकदा हाच फंड गुंतवणुकीसाठी साद घालत असतो.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top