अर्थ वल्लभ

अस्थिर काळातील सोबती

30 Oct 2026 • 1 min read
सध्याच्या बाजारात, वेगवेगळे निर्देशांक त्यांच्या ५२ आठवड्यांच्या तुलनेत वेगवेगळ्या पातळीवर आहेत. निफ्टी-५० निर्देशांक मागील ५२ आठवड्यांच्या तळाच्या पातळीजवळ (सध्याचा निर्देशांक २२६००, तर ५२ आठवड्यांचा उच्चांक २६३७३ निच्चांक २२१७९) मिडकॅप निफ्टी १५० सध्याची पातळी २०५९२, तर ५२ आठवड्यांचा उच्चांक २३६४७ निच्चांक १९२१८. तर निफ्टी स्मॉलकॅप सध्याची पातळी १७६३९ तर ५२ आठवड्यांचा उच्चांक १८५५१ निच्चांक १४१४३ गेल्या वर्षभरात रोख्यांत चांगली तेजी आली आहे आणि केंद्र सरकारचे १० वर्षाचे रोखे सध्या ७.३८ टक्के परतावा दरावर उपलब्ध असून ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ६.४५ तर नीचांकी पाळीवर परताव्याचा दर ७.४० टक्के होता. (रोख्यांच्या किंमती आणि परताव्याच्या दर यांच्यात व्यस्त सबंध असतो. उच्चांकी किंमतीवर परताव्याचा दर कमी तर किंमतीच्या निच्चांकी पातळीवर परताव्याचा दर उच्चांकी असतो.) तथापि, गेल्या काही महिन्यांत मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप फंडांत अभूतपूर्व अस्थिरता दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅपचे मुल्यांकन दीर्घकालीन सरासरी मुल्यांकनापेक्षा जास्त तर लार्जकॅपचे मुल्यांकन दीर्घकालीन सरसरी मुल्यांकनापेक्षा कमी आहे. (करोना काळातील मुल्यांकनाओएक्षा कमी) जे गुंतवणूकदार मध्य जोखीम स्वीकारून आपल्या बचतीवर ९-१० टक्के सातत्याने परतावा कमवू इच्छितात अशा गुंतवणूकदरांसाठी एचडीएफसी बॅलन्स्ड-ॲडव्हान्टेज फंड हा एक चांगला पर्याय आहे. वाढते व्याजदर आणि वेगवेगळ्या मार्केटकॅपच्या मुल्यांकनातील तफावतीमुळे बॅलन्स्ड-ॲडव्हान्टेज फंडामध्ये गुंतवणूक करण्याची ही एक चांगली संधी आहे. निधी व्यवस्थापक समष्टी आणि मुल्यांकन यांचा विचार करून गुंतवणुकीचे विभाजन करतात. त्यामुळे गुंतवणुकीची वेळ महत्त्वाची ठरत नाही. सेवानिवृत्तीपश्चात एसडब्ल्यूपी द्वारा नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी एक रक्कमी गुंतवणुकीसाठी देखील हा फंड एक चांगला पर्याय आहे. एचडीएफसी बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज हा फंड एचडीएफसी फंड घराण्याचा आणि बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज या फंड गटातील सर्वात मोठी मालमत्ता असलेला फंड आहे. या दोन गोष्टींमुळे हा फंड हायब्रीड गटातील सर्वोत्तम फंड असून दीर्घकाळात सातत्याने सरासरीपेक्षा जास्त परतावा देण्याचा फंडाचा ३२ वर्षांचा इतिहास आहे. म्हणूनच गुंतवणूकदार मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी फंडात एकरकमी गुंतवणुकीचा विचार करू शकतात.

तीन दशकांची यशस्वी कारकीर्द असलेला फंड

‘एचडीएफसी बॅलन्स्ड ॲडव्हांटेज’ (पूर्वीचा ‘एचडीएफसी प्रुडन्स’) फंड गेली ३२ वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करत आला आहे. काही काळासाठी या फंडाची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी परतावा देणारी राहिली असली, तरी पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास, हा फंड आपल्या श्रेणीतील सर्वोत्तम फंडांपैकी एक ठरला आहे. विविध कालावधींमधील परताव्याचा विचार करता, ‘एचडीएफसी बॅलन्स्ड ॲडव्हांटेज’ फंडाने नेहमीच समाधानकारक, म्हणजेच मध्यम ते उच्च श्रेणीतील (१५ टक्क्यांच्या आसपास किंवा त्याहून अधिक) परतावा दिला आहे. या फंडाचा गेल्या वीस वर्षातील (१ ऑक्टोबर २००६ ते ३० सप्टेंबर २०२६) पाच वर्षे चलत सरासरी परतावा १४.२१ टक्के, तर पंचवीस वर्षातील (१ ऑक्टोबर २००१ ते ३० सप्टेंबर २०२६) दहा वर्षे चलत सरासरी परतावा १८.०१ टक्के इतका आहे. १ ऑक्टोबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीतील ‘पाच वर्षांच्या चलत सरासरी विचार केल्यास सरासरी परतावा १२.२१ टक्के आहे. या फंडाच्या कामगिरीत सातत्य आणि उच्च परतावा यांचा मिलाफ दिसून येतो.

पोर्टफोलीओ रचना

हा फंड समभाग (इक्विटी) आणि रोखे (डेट) यात गुंतवणूक करतो. या फंडाचे गोपाल अग्रवाल (२९ जुलै, २०२२ पासून), अनिल बांबोली (२९ जुलै, २०२२ पासून), अरुण अग्रवाल (६ ऑक्टोबर, २०२२ पासून), ध्रुव मुच्छल (२२ जून, २०२३ पासून), नंदिता मेनेझेस (२९ मार्च, २०२५ पासून) आणि इहाब दलवाई (११ सप्टेंबर, २०२६ पासून) निधी व्यवस्थापक आहेत. ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार ३० सप्टेंबर २०२६ रोजी फंडाची मालमत्ता १.०२ लाख कोटी होती. फंडाची किमान ६५ टक्के मालमत्ता समभाग गुंतवणुकीत असते. मालमत्ता वाटप आणि समभाग आणि रोखे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी अनेक घटकांचा निधी व्यवस्थापक विचार करतात. समभाग गुंतवणुकीला अस्थिरतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी डेरिव्हेटिव्ह्जचा वापर केला जातो. गुंतवणुकीचे विभाजन हे तत्कालीन बाजारमूल्यांकन आणि व्यापक आर्थिक परिस्थितीवर (समष्टी) अवलंबून असते. समभाग गुंतवणुकीचे प्रमाण निश्चित करण्यापूर्वी मागील बारा महिन्यांचा ‘प्राईस-टू-अर्निंग्ज रेशो’, ‘अर्निंग्ज यील्ड’ आणि सरकारी रोख्यांवरील परताव्याच दर (जी सेक यिल्ड) यांचा गुणोत्तर, महागाई, वित्तीय स्थिती, व्याजदर आणि बाह्य वातावरण यांचा आढावा घेतला जातो. उदाहरणार्थ, मार्च २०२० मध्ये जेव्हा बाजारात मोठी घसरण झाली, तेव्हा आणि त्यानंतरच्या संपूर्ण वर्षात, या फंडाची इक्विटीमधील गुंतवणूक (हेजिंग न केलेली) ८० टक्क्यांहून अधिक होती. त्यानंतर २०२१ मध्ये हे प्रमाण हळूहळू कमी करण्यात आले. २०२२ च्या बहुतेक काळात ही गुंतवणूक ६० ते ६८ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्यात आली होती आणि २०२३ च्या सुरुवातीला ती पुन्हा कमी करण्यात आली. सप्टेंबर २०२४ पासून पुन्हा समभाग गुंतवणूक वाढविण्यात आली. तथापि, फंडाला समभाग कररचनेचा लाभ मिळवण्यासाठी, समभाग आणि संबंधित (डेरीव्हेटीव्हज) साधनांमधील गुंतवणूक ६५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त राखली जाते. समभाग गुंतवणुकीचा मोठा हिस्सा ‘निफ्टी १००’ मधील ‘लार्ज-कॅप’ कंपन्यांच्या समभागात गुंतविला जातो. त्यामुळे, हा भाग बऱ्यापैकी स्थिर आणि मध्यम जोखमीचा असतो. कर्जरोखे विभागामध्ये सुरक्षितता (क्रेडीट रेटिंगज), रोकड सुलभता आणि परतावयाचा दर यांवर भर दिला जातो. यामध्ये सरकारी रोखे आणि उच्च मानांकन (ट्रिपल ए पत) असलेले कॉर्पोरेट बाँड्सच समावेश असल्याने, पत जोखीम (कर्ज बुडण्याची जोखीम) नगण्य किंवा शून्य असते. मात्र, व्याजदरांचा अंदाज घेऊन हा फंड आपल्या गुंतवणुकीचा कालावधी (ड्युरेशन) सक्रीय व्यवस्थापित केला जातो. उदाहरणार्थ, सध्या व्याजदर निच्चांका जवळ होते आणि वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन गेल्या १२ महिन्यांत फंडाने आपल्या गुंतवणुकीचा सरासरी कालावधी (residual maturity) हळूहळू कमी करायला सुरवात केली आहे. थोडक्यात सांगायचे तर, ‘एचडीएफसी बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड’ हा एक दर्जेदार फंड आहे. ज्या गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता कमी ते मध्यम आहे, त्यांच्या ‘कोअर होल्डिंग’ मध्ये हा फंड समाविष्ट करण्यासाठी योग्य ठरू शकतो. ५-१० वर्षांच्या कालावधीसाठी एसआयपी देखील प्रभावी ठरू शकतात.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top