अर्थ वल्लभ

दोन दशकांचा समृद्धीचा साथीदार: युटीआय लार्ज अँड मिडकॅप फंड

25 Nov 2025 • 1 min read

दोन दशकांचा समृद्धीचा साथीदार: युटीआय लार्ज अँड मिडकॅप फंड

गेल्या आठवड्यात बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी त्यांचे सर्वोच्च शिखर गाठून नंतर आठवड्याच्या अखेरीस घसरण नोंदविली. ही घसरण मुखत्वे आंतरराष्ट्रीयबाजारात घसरण झाल्याचे पडसाद भारतात उमटले. चिपनिर्माती कंपनी एनव्हिडियाच्या तिसऱ्या तिमाहीच्या चांगल्या निकालांनंतर २४ तासांच्याआत अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्यांच्या भावात घसरण झाली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कंपन्यांच्या भावातील उन्मादाला जमिनीवर आणणारी ही घसरण होती. जगातील सर्वात मोठे बाजारमूल्य असणारी कंपनी एनव्हिडियाने गुंतवणूकदारांना त्यांच्या प्रगत डेटासेंटर चिप्ससाठी आश्वासक भविष्याविषयक संकेत दिल्यानंतर गुरुवारच्या सत्रात वॉल स्ट्रीट वर व्यवहारांची सुरवात तेजीने झाली तरी कामकाज बंद होतांना एस अँड पी ५०० मध्ये १.६ टक्क्यांची घसरण झाली. तर डाऊ जोन्स इंडस्ट्रीअल अॅव्हरेज ०.८% ने घसरून बंद झाला. तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणारा नॅस्डॅक कंपोझिट २.२% ने घसरून बंद झाला. याचे पडसात भारतीय बाजारात शुक्रवारी उमटले. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात पाच शतकी घसरण झाली. भारतीय कंपन्यांच्या तिमाहीत, निकालात लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे, कंपन्यांची घसरलेली प्रतिसमभाग कमाई (इपीएस) हळूहळू पुन्हा रुळावर येत आहे, भारतीय समभाग बाजारपेठेचे मुल्यांकन विकसनशील आशियाई आणि विकसित जागतिक बाजाराच्या तुलनेत रास्त आहे. भारतीय अर्थव्यवस्था पुढील काही वर्षे १० ते १२ टक्के दराने वाढेल अशी अपेक्षा आहे.
आंतरराष्ट्रीय अनिश्चितता लक्षात घेता आणि देशात समाधानकारक तेजी असल्याने गुंतवणूकदार सक्रिय व्यवस्थापित फंडाद्वारे निफ्टी लार्ज-मिडकॅप परिघात एखादी एसआयपी वाढविण्याचा विचार करू शकतील लार्ज-मिडकॅप फंड गट निवडण्यामागे अस्थिरतेचा सामना करताना निधी व्यवस्थापकाला अधिक लवचिकता देणारा हा फंड गट आहे. उपलब्ध गुंतवणूकसंधी वेगवेगळ्या बाजार भांडवली कंपन्यांत उपलब्ध आहेत. म्हणून सक्रिय व्यवस्थापित फंडाला प्राधान्य दिले पाहिजे. युटीआय युटीआय लार्ज अँड मिडकॅप फंड हा लार्ज अँड मिडकॅप फंड गटातील दीर्घ इतिहास असलेला फंड आहे. युटीआय टॉप १०० हा फंड १ ऑगस्ट २००५ रोजी अस्तित्वात आला. या फंडाचे नांव पहिल्यांदा युटीआय टॉप १००पासून युटीआय कोअर इक्विटी असे बदलण्यात आले. दुसऱ्यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये युटीआय लार्ज अँड मिडकॅप असे बदलण्यात आले. ‘निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय’ हा फंडाचा मानदंड निश्चित केला आहे. या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा २००९ ते २०१७ सवती कुलकर्णी यांच्याकडे होती. फंड घराण्याने २०१७ पासून निधी व्यवस्थापनाची धुरा श्रीवत्स यांच्याकडे दिली. ते या फंडाचे विद्यमान निधी व्यवस्थापक आहेत. हा फंड गुंतवणूक कालावधी ७ ते १० वर्षे असेल तर गुंतवणूकदार पद्धतशीर गुंतवणूक मार्गाने (एसआयपी) गुंतवणूक करू शकतात. वर उल्लेख केल्यानुसार सध्या मुल्यांकन फार स्वस्त नाही मिड-कॅपचे मुल्यांकन सरासरी मुल्यांकनापेक्षा अधिक आहे. युटीआय लार्ज अँड मिडकॅप फंड अस्तित्वात आल्याला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या २० वर्षात फंडाने वार्षिक १३.६६ टक्के दराने परतावा दिला आहे. सुरवातीच्या १ लाख गुंतवणुकीचे १२.४९ लाख झाले आहेत. फंडाचा सुरवातीपासून एसआयपी वार्षिक परतावा १३.७५ टक्के आहे. सुरवातीपासूनच्या १००००च्या एसआयपीचे ऑगस्ट २००५ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत २४४ हप्ते गेले असून २४.४० लाखाच्या गुंतवणुकीचे १,१८, ८५,८४८ झाले आहेत चक्रवाढ वाढीचे (कंपाऊंडिंग) हे एक उत्तम उदाहरण आहे. विनाखंड चाललेली एसआयपी छोट्या गुंतवणुकीतून मोठा निधी निर्माण करू शकते. कोरोना पश्चात फंडाची कामगिरी अधिक मजबूत झाल्याचे दिसते. राहिली आहे. पॉइंट-टू-पॉइंट आधारावर, फंडाने दीर्घ कालावधीत त्याच्या बेंचमार्क निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआयला वार्षिक १.५० ते २.०५ टक्क्यांनी मागे टाकले आहे. फंडाने दिलेला मागील पाच वर्षांचा २३.६६ टक्के वार्षिक परतावा फंड गटात तिसऱ्या क्रमांकाचा परतावा आहे. नोव्हेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२५ दरम्यानच्या पाच वर्षातील ३ वर्षाचा चलत परतावा (रोलिंग रिटर्न) तपासाला असता, ८३.९४ टक्के वेळा फंडाने २० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तपशीलवार आकडेवारी कोष्टक क्रमांक १ मध्ये दिली आहे.

फंडाची चलत सरासरी कामगिरी (टक्केवारी) (कोष्टक क्रमांक १)

 सरासरीकमालकिमान१५ ते २०२० पेक्षा अधिक
युटीआय लार्ज अँड मिडकॅप२२.६२९.८२१६.६२१६.०६८३.९४
फंड गट सरासरी२०.६५२१.३११३.१४२.५५८.५१

नोव्हेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२५ पर्यंतच्या एनएव्ही नुसार, या फंडाचा अपसाइड कॅप्चर रेशो १०६.२४ आहे, जो दर्शवितो की तेजी दरम्यान फंडाची एनएव्ही मानदंड सापेक्ष अधिक वाढते, आणि डाउनसाइड कॅप्चर रेशो ९६.७५ आहे, जो असे दर्शवितो की घसरणी दरम्यान फंडाचा एनएव्ही मानदंड सापेक्ष कमी घसरतो.

आघाडीच्या दहा उद्योग क्षेत्र निहाय गुंतवणूक (कोष्टक क्रमांक -२)

उद्योग क्षेत्रटक्केवारी
वित्तीय सेवा२८.६४
माहिती तंत्रज्ञान१०.१५
तेल आणि नैसर्गिक वायू८.२६
वाहन आणि वाहन पूरक८.२५
आरोग्यनिगा७.६३
ग्राहकोपयोगी वस्तू४.८२
दळणवळण४.०२
बांधकाम३.२
धातू आणि खाणउद्योग३.१८
सेवा३.०७
सध्याची तेजी आणि मूल्यांकनांमध्ये झालेली वाढ तसेच अमेरिकेच्या आयात कर वाढी नंतर जगात विविध उद्योगात वृद्धीच्या संधी कमी झाल्या. गुंतवणूकदारांनी सध्या एक रक्कमी गुंतवणूक टाळून एसआयपी किंवा एसटीपी मार्गाने माफक प्रमाणात दीर्घ मुदतीसाठी एसआयपीचा विचार करावा. बाजाराच्या पुढील चाटचाळी बाबत सावध पवित्रा घेऊन गुंतवणूक करावी. तेजी आली म्हणून कमरेचे सोडून डोक्याला बांधण्याचा आततायीपणा करू नये.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top