अर्थ वल्लभ

सूर न सापडलेले वर्ष

10 Jan 2026 • 1 min read

सूर न सापडलेले वर्ष

सरलेले २०२५ हे वर्ष २०२० (कोव्हीड नंतरचे) सर्वाधिक अस्थिर वर्ष ठरले. सर्वच आघाड्यांवर गोंधळाचे वर्ष होते, भू-राजकीय असो, बाजार असो, व्याज दर असो किंवा रुपये अमेरिकन डॉलर विनिमय दर असो. या विकसनशील परिस्थिती लक्षात घेता, विविध शिफारस केलेल्या फंडाच्या कामगिरी कडे वळू. कॅलेंडर२०२५ मध्ये ,महत्वाच्या शेअर बाजार निर्देशांकात एकच कल दिसला नाही निफ्टी ५० ने १०.५ टक्के वाढ झाली निफ्टी मिडकॅप १५० मध्ये ५.२ टक्के % वाढ झाली, तर निफ्टी स्मॉलकॅप २५० मध्ये ६.८० टक्के घट झाली आहे. सर्वाधिक फंडांचा मानदंड असणारा निफ्टी ५०० ६.७ टक्के वाढ झाली. निफ्टी ५०० निर्देशांकातील ६५ टक्के कंपन्यांचे समभाग केवळ ६ टक्के वाढले तर निफ्टी १०० मधील ५० टक्के कंपन्यांनी निर्देशांकापेक्षा (१० टक्क्यापेक्षा) कमी वाढ नोंदवली. या कामगिरीचे त्रैमासिक मूल्यमापन केले असता, एप्रिल जून २०२५ तिमाहीतील तीव्र घसरणी नंतर लगेच तेजी आली जुलै सप्टेंबर तिमाहीत बाजार दिशाहीन होता तर शेवटच्या तिमाहीत ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत पुन्हा तेजी आली. साहजिकच निर्देशांकापेक्षा अधिक वाढलेल्या निर्देशाकातील कंपन्या केवळ २ टक्के होत्या. साहजिकच ज्या फंडाच्या पोर्टफ़ोलिओ मध्ये अधिक वैविध्य होते, किंवा जे मानदंड सापेक्ष अधिक विचलित होते त्यांची कामगिरी चागली होती ज्यांच्या पोर्टफोलीओत मिड-अँड-स्मॉलकॅपचे प्रमाण जास्त होते अश्या फंडांनी अतिशय कमी वाढ नोंदविली. सरासरी ६५ टक्के फंडांनी त्यांच्या मानदंड सापेक्ष कमी परतावा मिळविला.
मागील वर्षी या स्थंभातून अनेक फंड गटातून वेगवेगळ्या फंडांची शिफारस केली. जसे की, लार्जकॅप, फ्लेक्सिकॅप, मल्टीकॅप, मिडकॅप स्मॉलकॅप, व्हॅल्यू वैगरे. समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडांनी सरासरी ५.४९ टक्के नफा नोंदविला तर या स्थंभातून शिफारस केलेल्या फंडांचा ‘आयआरआर’ ९.५१ टक्के आहे. हा ४टक्क्यांचा ‘अल्फा’ आव्हानात्मक बाजार परिस्थितीत सशक्त फंड निवड अधोरेखित करतो. सरलेल्या वर्षातील लार्जकॅप निर्देशाकातील तेजी मोजक्या कंपन्यांच्या बाजार भावात झालेल्या वाढीमुळे होती. डिसेंबर पर्यंत तोट्यात असलेले निर्देशांक दिसेल्बर महिन्यात अवतरलेल्या तेजीमुळे वर्षअखेरीस नफा दाखवू शकले. संकुचित तेजीमुळे पराग पारिख फ्लेक्सिकॅप सारख्या दिग्गज फंडांनी देखील निफ्टी १०० टीआरआयपेक्षा किंचित कमी परतावा मिळविला. आयसीआयसीआय प्रू फोकस्ड इक्विटीसारख्या फंडाने लक्षणीय कामगिरी केली, याच फंड घराण्याच्या आयसीआयसीआय प्रू व्हॅल्यू फंडाची कामगिरी देखील लक्षवेधी होती. शिफारस केलेल्या फंडात मिड-आणि-स्मॉलकॅप फंड जे अधिक आक्रमक गुंतवणूक धोरण अंगीकारीतात अशा फंडाचा समावेश होता. फोकस फंडांपासून ते पासून ते मिडकॅप, मल्टीकॅप, स्मॉलकॅप, थीमॅटिक फंडाचा समावेश होता. या शिफारस प्राप्त फंडांपैकी काही फंडांनी कामगिरीत निराशा केली. २०२४ मध्ये तेजीच्या बाजारामुळे २०२५ मध्ये मिड आणि स्मॉलकॅप फंडांची संख्या कमी होती. २०२५ मध्ये, काही मिडकॅप फंडांनी विस्तृत बाजाराच्या तुलनेत मध्यम कामगिरी केली तर स्मॉलकॅप फंडांची घसरण झाली. या वर्षीच्या शिफारशीसाठी उच्च जोखीम असणारे काही फंड दृष्टीपथात आहेत. मिड आणि स्मॉलकॅप फंड गटात आव्हानात्मक परिस्थिती असूनही या वर्षी मिड आणि स्मॉलकॅप फंडांत वाचकांना गुंतवणूक करण्याची शिफारस करावीशी वाटते. लार्जकॅप केंद्रित निर्देशांकांपेक्षा या मिडआणि स्मॉलकॅप फंड या वर्षी चांगली कामगिरी करतील. निफ्टी स्मॉलकॅप २५० टीआरआय मध्ये वर्षभरात ७.११ टक्के घसरण झाली तर निफ्टी मिडकॅप १५० टीआरआय मध्ये ५.३९ टक्के वृद्धी झाली.
२०२४चा स्टार परफोर्मर मोतीलाल ओसवाल मिडकॅप २०२५ मध्ये मानदंड सापेक्ष खराब कामगिरी करणारा ठरला. महिंद्रा मॅन्युलाइफ मिडकॅप आणि बडोदा बीएनपी मल्टीकॅपने वर्षाच्या सुरुवातीला घसरण नोंदवली परंतु वर्ष अखेरीस मानदंड सापेक्ष चांगली कमाई केली. स्मॉलकॅप फंड गटात निफ्टी स्मॉलकॅप २५० सापेक्षा खराब कामगिरी करणाऱ्या फंडांची संख्या जास्त आहे. स्मॉलकॅप फंडांच्या मालमत्ता क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला एसबीआय स्मॉलकॅप फंडाने सर्वाधिक निराशा केली. या फंडाला पोर्टफोलीओतून वगळण्या वाचून गुंतवणूकदारांना पर्याय नसल्याचे दिसते. याच फंड घराण्याचा एसबीआय फोकस्ड फंडाने देखील गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा टाकली. योग्य वेळी या फंडांबाबत योग्य टी शिफारस होईल. सध्या तरी या फंडांतून गुंतवणूक काढून घेणे योग्य असेल.
वर्ष २०२५ मध्ये शेवटची शिफारस असलेल्या टाटा डिजिटल फंड २०२६ मध्ये चांगली कामगिरी करेल. एक टर्नअराउंड उद्योग क्षेत्र म्हणून माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडे निधी व्यवस्थापक पहात आहेत. अलीकडे जिन्नस ‘पीएसयु’ सारख्या थीमॅटिक आणि ट्रान्सपोर्टेशन सारख्या सेक्टरल (युटीआय लॉजेस्टीक अॅण्ड ट्रान्सपोर्टेशन) फंडाकडे नव्याने पाहण्याची वेळ आली असून पुढील वर्षभरात त्याचे परिणाम दिसून येतील.
तथापि, या सरकारने ‘कन्झम्शन’ या थिम बाबत सकारत्मक धोरण आखून देखील तेजीची सुचिन्हे दिसत नसल्याने सध्या या फंडाबाबत सकारात्मक किंवा नकारात्मक दृष्टीकोन नाही. ‘थांबा आणि वाट पहा’ हे धोरण अवलंबिणे योग्य ठरेल.
२०२५ ची सुरवात एलआयसी मिडीयम अॅण्ड लॉंग ड्यूरेशन फंडाच्या शिफारशीने केली. सरलेल्या वर्षात बहुप्रतिक्षित रेपो दर कपात प्रत्यक्षात येऊनही फंडांनी अपेक्षित परतावा दिला नाही. प्रत्यक्षात कपात होण्यापूर्वीच बाजारपेठा आधीच दर कपातीवर लक्ष केंद्रित करत होत्या, परिणामी दर कपात होऊनही त्या वर्षात रोख्यांच्या किंमतीत वाढ झाली नाही. एकूणच, रोखे फंडातील गुंतवणूक फार किफायतशीर ठरली नाही.
रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडाचे अनेक उपलब्ध पर्याय असूनही कमी कालावधी, मनी मार्केट, अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन आणि फ्लोटिंग रेट, बँकिंग अॅण्ड पीएसयू डेट सारख्या फंडांनी अपेक्षित परतावा दिला नाही. लॉंग ड्युरेशन फंडांनी सर्वाधिक निराशा केली. मोठी व्याजदर कपात येऊनही जिथे ‘अॅव्हरेज म्यॅच्युरिटी’ २ ते ३ वर्षे आहे अशा फंडानी लॉंग ड्यूरेशन फंडांपेक्षा चांगली कामगिरी केली. या वर्षासाठी कॉर्पोरेट बाँड फंड बँकिंग अॅण्ड पीएसयू डेट आणि डायनॅमिक बॉंड फंडांचा दीर्घकालीन पोर्टफोलिओसाठी समावेश करण्याची शिफारस आहे. ‘लोकसत्ता कर्त्यां’च्या यादीचे तिमाही पुनरावलोकन सुरु आहे. योग्य संधी ओळखण्याची आणि झालेल्या चुका सुधारण्याचा वेळीच प्रयत्न करण्यात येईल. सरलेल्या वर्षातील संकुचित तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा पडली असली तरी नवीन वर्ष हे निराशेचे जाणार नाही ही अशा नवीन वर्षाकडून ठेऊया.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top