अर्थ वल्लभ

रंग माझा वेगळा…

11 May 2025 • 1 min read

रंग माझा वेगळा…

अनेक इक्विटी आणि हायब्रीड फंडांना कामगिरीत मागे सारल्याने गेल्या १८-२० महिन्यांत मल्टी-ॲसेट ऍलोकेशन फंडांना गुंतवणूकदारांची पसंती लाभल्याचे दिसत आहे. सध्या, या फंड गटात २८ फंड असून फंड गटाच्या एकत्रित मालमत्तेने नुकताच १ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सेबीच्या मल्टी-ॲसेट ऍलॉकेशन फंडाच्या व्याख्येनुसार मल्टी-अ‍ॅसेट अलोकेशन फंड (MAAF) हा असा म्युच्युअल फंड आहे जो किमान तीन वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करतो आणि प्रत्येक मालमत्ता वर्गात किमान १०टक्के गुंतवणूक आहे. या मालमत्ता वर्गात सामान्यतः भारतीय समभाग, रोखे आणि मौल्यवान धातू या सारख्या जिन्नसांचा समावेश असतो. उपलब्ध फंडांचे विश्लेषण केले असता, या फंड गटातील फंड सात मालमत्ता वर्गात गुंतवणूक करतात. जसे की, देशांतर्गत इक्विटी, आर्बिट्राज, रोखे, मौल्यवान धातू, (सोने चांदी), अन्य जिन्नस प्रकार(जास्त, तांबे कच्चे तेल), परदेशी समभाग, ‘आरईआयटी, आणि ‘इनव्हीटस’ असे हे सात मालमत्ता प्रकार आहेत.

कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाच्या मल्टी-ॲसेट ऍलॉकेशन फंडाच्या ‘एनएफओ’ला ९ मे रोजी प्रारंभ झाला असून ‘एनएफओ’ २३ मे पर्यंत खुला आहे. जोखीम आणि परताव्याचा समतोल साधणे हे मुख्य उद्दिष्ट असले तरी, मालमत्ता वाटप रणनीती आणि प्रत्येक मालमत्ता वर्गातील त्या त्या वेळची जोखीम वेगाने बदलत असल्याने निधी व्यवस्थापकाचा दृष्टीकोन महत्वाचा ठरतो. या फंडांचे प्रत्येक मालमत्ता वर्गाचे प्रमाण निश्चित करण्याची रणनीती वेगवेगळी आहे. ही रणनीती गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात घेणे आवश्यक आहे. या फंड गटातील फंड सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गोल्ड इटीएफ, गोल्ड फ्युचर्स किंवा भौतिक सोन्याचा वापर करतात. बहुतेक फंड गोल्ड ‘इटीएफ’ किंवा भौतिक सोन्यात गुंतवणूक करतात. तर एडलवाईस मल्टी ॲसेट ॲलोकेशन, व्हाईटओक कॅपिटल मल्टी ॲसेट ॲलोकेशन, आयसीआयसीआय प्रू मल्टी-ॲसेट आणि टाटा मल्टी ॲसेट अपॉर्च्युनिटीज फंड कमोडिटी डेरिव्हेटिव्हजच्या माध्यमातून गुंतवणूक करतात. सोने आणि चांदीचे फ्युचर्स खरेदी केल्यास कमी भांडवल लागते. मागील २४ महिन्यांत व्हाईटओक कॅपिटल मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड या फंड गटात सर्वात चांगला परतावा दिलेला फंड असून त्या खालोखाल डीएसपी मल्टी ॲसेट ऍलॉकेशन फंड आणि आयसीआयसीआय प्रू मल्टी-ॲसेटचा क्रम लागतो. मागील २४ महिन्यांत या फंडांनी १८ ते ११ टक्के दरम्यान वार्षिक परतावा दिला आहे. काही फंड कच्चे तेल, तांबे, जस्त आणि ॲल्युमिनियम सारख्या धातूत (नॉन फेरस) गुंतवणूक करतात. टाटा मल्टी ॲसेट अपॉर्च्युनिटीज फंड एक्स्चेंज-ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्जद्वारे कच्चे तेल, तांबे, जस्त आणि ॲल्युमिनियममध्ये गुंतवणूक करणारा एक यशस्वी फंड आहे. टाटा मल्टी ॲसेट अपॉर्च्युनिटीज फंड एकूण मालमत्तेच्या ३० टक्क्यांपर्यंत जिन्नसांत गुंतवणूक करणारा फंड आहे. तर परदेशातील समभागांना प्राधान्य देणाऱ्या फंडात इन्वेस्को इंडिया मल्टी ॲसेट ऍलोकेशन (१७ टक्के), डीएसपी मल्टी ॲसेट ॲलोकेशन (१५ टक्के) आणि निप्पॉन इंडिया मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड (१० टक्के) यांचा समावेश आहे. इन्वेस्को इंडिया मल्टी ॲसेट प्रामुख्याने अमेरिकेतील कंपन्यांत गुंतवणूक करतो तर डीएसपी मल्टी ॲसेट ॲलोकेशन आणि निप्पॉन इंडिया मल्टी ॲसेट ॲलोकेशन एकाच देशात गुंतवणूक न करता जागतिक बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करतात. सर्व २८ मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंडांचा अभ्यासले असता कॅनरा रोबेको मल्टी-ॲसेट ऍलॉकेशन फंड भारतीय समभाग, भारतीय रोखे आणि दोन मौल्यवान धातू (सोने आणि चांदी) या मालमत्ता प्रकारात गुंतवणूक करणार आहे.

काही फंड मिड आणि स्मॉल कॅप समभागांत जास्त गुंतवणूक करतात. मोतीलाल ओसवाल मल्टी ॲसेट (३१ टक्के), एलआयसी एमएफ मल्टी ॲसेट ॲलोकेशन (३० टक्के), आणि एचएसबीसी मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड (२७ टक्के) हे मिड आणि स्मॉल कॅप समभागांत सरासरी सापेक्ष जास्त गुंतवणूक असलेले मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड आहेत. यामुळे मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंडगटात तुलनेत जास्त परताव्या सोबत उच्च अस्थिरता आणि नकारात्मक जोखम असलेले हे फंड आहेत. अलीकडील बाजारातील मंदीच्या काळात त्यांच्या कामगिरीवरून हे स्पष्ट होते, मोतीलाल ओसवाल मल्टी ॲसेटने एका वर्षात ९ टक्के तोटा नोंदविला होता. एचएसबीसी मल्टी ॲसेट ऍलोकेशनने गेल्या वर्षभरात केवळ ४ टक्के परतावा दिला एलआयसी एमएफ मल्टी ॲसेट ऍलोकेशन फंड अस्तित्वात आल्याला १ वर्ष पेक्षा कमी कालावधी लोटला आहे. अस्तित्वात आल्याला एक वर्षांहून अधिक कालावधी लोटलेले २५ फंड अस्तित्वात असून या फंडाची समभाग गुंतवणूक १६ ते ६५ टक्के आहे. तर यूटीआय मल्टी ॲसेट ॲलोकेशन आणि सुंदरम मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड यांची समभाग गुंतवणूक ६५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. युटीआय मल्टी ॲसेट ऍलोकेशन फंड आणि सुंदरम मल्टी ॲसेट ऍलोकेशन फंडाने गेल्या वर्षभरात अनुक्रमे ८ टक्के आणि १२ टक्के परतावा दिला आहे. काही फंड सोन्यापेक्षा चांदीला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले. ताजी पोर्टफ़ोलिओ आकडेवारी नुसार कोटक मल्टी ॲसेट ॲलोकेशन, महिंद्रा मॅन्यु लाइफ मल्टी ॲसेट ॲलोकेशन आणि क्वांट मल्टी ॲसेटने सोन्यापेक्षा चांदीत अधिक गुंतवणूक केली आहे.

मल्टी-अ‍ॅसेट अलोकेशन फंड्सवर कर आकारणी फंडातील समभागाची मात्रा आणि गुंतवणुकीच्या कालावधीनुसार होते. जर फंडाच्या गुंतवणुकीत समभाग मात्रा ६५ टक्के किंवा त्याहून अधिक असेल तर एक वर्षा पेक्षा कमी कालावधीवर झालेल्या नफ्यावर १५% कर आकारला जातो तर १ख़ वर्ष कालावधी पेक्षा जास्त कालावधीच्या १.२५ लाखांवरील भांडवली लाभावर १२.५ टक्के कर आकारणी होते. फंडाच्या गुंतवणुकीत समभागाची मात्रा ६५ टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर तो डेट फंड समाजाला जातो आणि त्या नुसार करा आकरणी होते.

कॅनरा रोबेको म्युच्युअल मल्टी-ॲसेट ऍलॉकेशन फंड गुंतवणुकीत किमान ७० टक्के दरम्यान समभाग गुंतवणूक राखेल आणि समभाग गुंतवणुकीचा ढाचा हा ‘कॅनरा रोबेको फोकस्ड इक्विटी फंडा सारखा ३५ ते ४० कंपन्यांचा समावेश असलेला मल्टीकॅप घटणीचा असेल. सोने आणि चांदीसाठी इटीएफचा वापर करणार आहे. म्हणूनच हा फंड इतर मल्टी-ॲसेट फंडांहून वेगळा असल्याने रंग माझा वेगळा असे म्हणावे लागेल.

मल्टी-ॲसेट अलोकेशन फंड अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य मानले जातात ज्यांना कमी जोखीम घेण्याची इच्छा असते परंतु त्यांच्या गुंतवणुकीवर स्थिर परतावा मिळवायचा असतो.मल्टी-अ‍ॅसेट अलोकेशन फंड टोकाचे आळशी आणि टोकाचे उतावळे प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी आदर्श फंड आहे. आळशी गुंतवणूकदार जे असेट अलोकेशन करत नाही आणि उतावळे गुंतवणूकदार समाज माध्यमांवरील सल्ल्यांवर विसंबून चुकीच्या वेळी चुकीच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात. हा फंड अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदरांसाठी आदर्श साधन ठरेल. बहु मालमत्ता वर्गात शिस्तबद्ध गुंतवणुक करून संपत्ती निर्मिती करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदरांसाठी हे आदर्श साधन ठरेल.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top