अर्थ वल्लभ

भविष्यवेधी फंड : महिंद्रा मनूलाईफ फोकस्ड फंड

20 Nov 2023 • 1 min read

भविष्यवेधी फंड : महिंद्रा मनूलाईफ फोकस्ड फंड

सक्रियपणे व्यवस्थापित लार्ज-कॅप इक्विटी फंडांची त्यांच्या मानदंड सापेक्ष मागील एका वर्षातील कामगिरी समाधानकारक नाही. मागील एका वर्षात निफ्टी १०० आणि बीएसई १०० सारख्या मानदंडांपेक्षा सरस कामगिरी करण केवळ  ४ फंडांना जमलं आहे. ३ वर्षे आणि ५ वर्षे कालावधीत केवळ २२ आणि २७ टक्के फंडांनी मानदंड सापेक्ष अधिक परतावा मिळविला आहे. गुंतवणूकदारांच्या पोर्टफ़ोलिओतील मानदंड सापेक्ष खराब कामगिरी करणाऱ्या या ७५ टक्के लार्जकॅप फंडांची जागा  फोकस्ड इक्विटी फंड घेऊ शकतात. कारण बहुतांश फोकस्ड इक्विटी फंड हे लार्जकॅप केंद्रित फंड आहेत. फोकस्ड इक्विटी फंडांपैकी ९५ टक्के फंडांनी दोन तृतीयांश मालमत्ता लार्ज-कॅप कंपन्यांमध्ये गुंतविली आहे. सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फोकस्ड इक्विटी फंड हा एक फंड गट असून, या फंडांना ३० पेक्षा जास्त कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकीची मुभा नसते. निधी व्यवस्थापकाच्या इच्छेनुसार उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या समभागांना  या फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये स्थान दिले जाते.  फोकस्ड इक्विटी फंडांच्या पोर्टफोलीओत समभागांचे ध्रुवीकरण झालेले असल्याने हे फंड ‘हाय रिक्स हाय रिटर्न’ प्रकारात मोडतात. महिंद्रा मनूलाईफ फोकस्ड फंडाला १९ नोव्हेंबर रोजी ३ वर्षे पूर्ण होत असल्याने या फंडाची दखल घेणे उचित ठरते. मागील ३ वर्षाचा विचार केल्यास फंड हा सातत्याने ‘टॉप’ किंवा ‘अपर मिडल क्वारटाइल’ मध्ये राहिला आहे. या फंडात १९ नोव्हेंबर २०२० मध्ये गुंतविलेल्या १ लाखाचे १६ नोव्हेंबर२०२३ रोजी ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार १९०३९६ (वार्षिक लाभ २४.०४%) झाले होते, आणि १९ नोव्हेंबर २०२० रोजी ५०००ची एसआयपी सुरु केलेल्या १०८०००च्या गुंतवणूकीचे १६ नोव्हेंबर२०२३ रोजी ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार २३६७३४  झाले (वार्षिक लाभ १८.६६ %) आहेत. मॉर्निंगस्टार एखाद्या फंडाला तीन वर्षांनंतर ‘स्टार रेटिंग’ बहाल करते. फंडाच्या चमकदार कामगिरीमुळे या फंडाला ‘फोर स्टार’ किंवा ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ मिळण्याची शक्यता आहे.  या फंडाला जर ‘फोर स्टार’ किंवा ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ मिळाले तर पदार्पणात ‘फोर स्टार’ किंवा ‘फाईव्ह स्टार रेटिंग’ मिळविणाऱ्या १५ टक्के फंडात या फंडाची गणना होईल. पदार्पणात ‘फोर स्टार’ किंवा ‘फाईव्ह स्टार रेटिंग’ मिळविणे म्हणजे पदार्पण केलेल्या कसोटी सामन्यात शतक झळकवण्यासारखे आहे.   

तीन वर्षातील एसआयपी कामगिरी फंडाची

या फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयुएम) ८७९.०५ कोटी रुपये आहे. रेग्युलर प्लानचा व्यवस्थापकीय खर्च २.२ टक्के असून फंडाचा मानदंड (बेंचमार्क ) ‘निफ्टी ५००टीआर आय’ आहे. या फंडाचे क्रिष्णा संघवी हे मुख्य निधी व्यवस्थापक तर फातिमा पाचा या सहनिधी व्यवस्थापिका आहेत. काही गुंतवणूकदारांचा (यु ट्यूब पाहून गुंतवणूक करणाऱ्या) असा गैरसमज आहे की फोकस्ड फंड हे थीमॅटिक किंवा सेक्टर फंड्सइतकेच धोकादायक असतात. परंतु महिंद्रा मनूलाईफ फोकस्ड फंडाने १३ उद्योग क्षेत्रात गुंतवणूक केल्याने, जोखीम कमी केली आहे. तथापि, अधिक वैविध्यपूर्ण फंडांच्या तुलनेत फोकस्ड फंडांमध्ये कंपन्यांच्या धृविकरणाचा धोका किंचित जास्त असतो. महिंद्रा मनूलाईफ फोकस्ड फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये ३० कंपन्यांचा समावेश असून स्टॉक्स आहेत,आघाडीच्या ५ ऊद्योगक्षेत्रातील गुंतवणूक ४५ टक्के आहे. आघाडीच्या ५ कंपन्यांतील गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या ३५ टक्के आहे. या फंडाची शिफारक करण्या मागे फंडाच्या कामगिरीतील सातत्य हे कारण आहे. ‘पॉइंट टू पॉइंट’ किंवा ‘ट्रेलिंग रिटर्न्स’ अनकेदा दिशाभूल करणारे असू शकतात, विशेषतः सध्याची बाजार परिस्थिती फंड व्यवस्थापकाला अनुकूल असल्याने. विश्लेषकांनी बाजारातील घसरणीच्या तिमाहीतील कामगिरीचा अभ्यास केला असता फंडाचा ‘डाऊनसाईड कॅप्चर रेशो’ भांडवलाची सुरक्षितता जोपासल्याची ग्वाही देतो. फंड घराण्याच्या गुंतवणूक परिघात ३५० कंपन्या असून या पैकी ३० कंपन्यांची निवड या फंडाच्या गुंतवणुकीसाठी होते. निधी व्यवस्थापक ‘ टॉप डाऊन अॅप्रोच’ गुंतवणूक परिघातील कंपन्यां निश्चित करण्यासाठी तर ‘बॉटम अप अॅम्रोच’ या कंपन्यांना चाळणी लावण्यासाठी वापरला जातो.  कंपन्यांची शाश्वत कमाईतील वाढीची क्षमता, विश्वासार्ह व्यवस्थापन आणि चांगल्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स पद्धती असलेल्या कंपन्यांना गुंतवणुकीत स्थान दिले जाते. स्टॉक-पिकिंग हे टॉप-डाउन जोखीमसमंधीत निकष, कंपन्यांची रोकड सुलभता आणि अंतर्गत अस्थिरता विचारात घेऊन कंपन्यांची निवड केली जाते. फंड घराण्याचा संशोधन चमू मूलत: त्यांच्या सर्वोत्तम कल्पनांचे संयोजन फोकस्ड इक्विटी फंडासाठी करीत असतो.

निधी व्यवस्थापक गुंतवणुकीच्या मूळ शैलीमुळे ‘निफ्टी ५०० टीआरआय इंडेक्स’शी पूर्णत: भिन्नता राखलेला पोर्टफोलिओ तयार केला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत रिलायंस आयसीआयसीआय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया इंफोसिस आणि ग्रासिम या पाच आघाडीच्या कंपन्या आहेत. वित्त पुरवठा आणि आर्थिक सेवा, इंधन, तंत्रज्ञान, विवेकाधीन वस्तू (कन्झ्युमर डीस्क्रीशनरी) जिन्नस, ही आघाडीची गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे आहेत.  उच्च दर्जाचा ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’ असलेल्या कंपन्यांचा समावेश असल्याने समस्याग्रस्त कंपन्या गुंतवणुकीत दिसत नाहीत. फंडाची मालमत्ता मर्यादित असल्याने बाजारातील चढ उतार निधी व्यवस्थापक व्यवस्थित व्यवस्थापित करीत आलेले दिसत आहेत. याचे प्रतिबिंब फंडाचा तीन वर्षांचा ‘अपसाइड कॅप्चर गुणोत्तर ८८.४५ आणि तीन वर्षांचा ‘डाउनसाइड कॅप्चर रेशो’ १०८.९२ असून हे दोनही आकडे फंड गटाच्या सरासरीशी तुलना करता उजवे वाटतात. एप्रिल मे महिन्यातील सार्वजनिक निवडणूकीमुळे संभाव्य अस्थिरतेचा विचार करून पोर्टफोलिओतील लार्जकॅप फंडांची जागा घेण्यास हा एक सक्षम पर्याय दिसत आहे.   

फंडाची एनएव्ही 

अधिक माहितीसाठी आणि गुंतवणूकिसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा

+91 97024 90900

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top