अर्थ वल्लभ

केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू…..

07 Sep 2023 • 1 min read

जेव्हा अर्थव्यवस्थेत व्याजदर शिखरावर असतात, तेव्हा गुंतवणूकदारांना दहा वर्षांच्या किंवा अधिक कालावधीसाठी निश्चित उत्पन्न पर्यायांमध्ये (बॉंड्स) गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. भारतीय गुंतवणूकदारांसाठी, अशा दहा वर्षे किंवा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करण्यास मर्यादित गुंतवणूक साधने उपलब्ध आहेत.  सामान्य गुंतवणूकदार दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी सारखा लोकप्रिय पर्याय निवडतात. या पर्यायात तुमचे पैसे १५ वर्षांसाठी गुंतवावे लागतात तुमच्या अडचणीच्या वेळी काढता येत नाहीत. आरबीआय रिटेल डायरेक्ट मंचावर सरकारी रोखे (जी-सेक) खरेदी केल्यास, तुम्हाला फक्त नियमित उत्पन्न मिळते, हे उत्पन्न व्याजाच्या रूपाने मिळते. हे व्याज तुमच्या उत्पन्नात मिळविले जाते आणि तुमच्या आयकर कर कक्षेनुसार व्याजावर कर आकारणी होते. तुम्ही मुदतपूर्ती पूर्वी या रोख्यांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास तुमचा परतावा कमी होतो. निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्य सारखा दीर्घ-कालावधीचे कर्ज फंड दहा वर्षे किंवा त्याहून  अधिक कालावधीतील उद्दिष्टांसाठी गुंतवणूकदारांना तीन वर्षांनतर रोकड सुलभता आणि गुंतवणुकीवर कर कार्यक्षम  पर्याय उपलब्ध करून देणारा हा फंड आहे. व्याजावर दर वर्षी कर द्यावा लागतो तर या फंडाच्या युनिट्सची विक्री केल्यावर कर लागू होतो. गुंतवणूककेल्यापासून पाचव्या वर्षांत युनिट्सची विक्री केल्यास भांडवली लाभ त्या आर्थिक वर्षातले उत्पन्न समजून त्यावर  कर भरावा लागेल.

निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्य हा गुंतवणुकीस कायम खुला असलेला (ओपन-एंडेड) आणि दीर्घ मुदतीच्या केंद्र सरकारच्या रोख्यांत गुंतवणूक करणारा फंड आहे. हा फंड फक्त दीर्घ मुदतीच्या केंद्र सरकारच्या रोख्यांत गुंतवणूक करतो. या फंडाचे ‘मॅकॉले ड्यूरेशन’ नेहमीच सात वर्षे आणि त्याहून अधिक असतो. हा फंड २० वर्ष ते २५ वर्षांची उर्वरित मुदत असलेल्या केंद्र सरकारच्या रोख्यांत गुंतवणूक करतो. हा फंड सक्रियपणे कालावधी व्यवस्थापित करतो (अॅक्टीव ड्यूरेशन मॅनेजमेंट) या फंडाच्या खर्चाचे प्रमाण स्पर्धक सक्रिय व्यवस्थापित गिल्ट फंडांपेक्षा कमी असून रेग्युरल प्लानचा टीइआर (एकूण खर्चाचे प्रमाण) ०.५३ टक्के तर डायरेक्ट प्लानचा टीइआर ०.१६ टक्के आहे. दीर्घ मुदतीच्या सरकारी रोख्यांचा पोर्टफोलिओ असूनही, हा एक गुंतवणुकीसाठी कायम खुला असलेला फंड असून रोजच्या एनएव्ही नुसार फंडाच्या युनिट्सची खरेदी विक्री होते. या फंडातून पहिल्या तीन वर्षात रक्कम काढल्यास १ टक्के निर्गम शुल्क लागू होते. पहिल्या तीन वर्षांत, गुंतवणूकदारांना त्यांच्या २० टक्के युनिट्सची विक्री कोणत्याही अधिभाराशिवाय करता येते. तीन वर्षांच्या मुदतीनंतर सर्व युनिट्सची विक्री कोणत्याही अधिभाराविना करता येते. दीर्घ मुदतीच्या रोख्यांत खूप अस्थिरता असते. युनिट्सची अल्प-मुदतीत खरेदी विक्रीला पायबंध घालण्यासाठी हे अधिमूल्य लागू केले असू शकते. कारण दीर्घ मुदतीचे रोखे अतिशय रोकड सुलभ असल्याने मोठ्या गुंतवणूकदारांच्या विक्रीला पायबंध घालणे आवश्यक आहे.

भारतातील मागील व्याजदर आवर्तनात १० वर्षे मुदतीच्या रोख्यांचे कमाल उत्पन्न ८.००-८.५० टक्के पर्यंत गेले होते. सध्याच्या व्याजदर आवर्तनात केंद्र सरकारच्या १० वर्षे मुदतीच्या रोख्यांचे उत्पन्न किमान २७ जुलै २०२० रोजी ५.५४ टक्के तर कमाल २५ ऑक्टोबर २०२२ रोजी ७.७८ इतके होते. सध्याचे उत्पन्न सुमारे ७.१६ टक्के असून सध्याचे उत्पन्न व्याजदर शिखराच्या जवळ आहे. साधारणपणे, व्याजदर आवर्तानाच्या  शिखराजवळ दीर्घ मुदतीची गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होतो. कारण भविष्यात व्याज दर कमी झाल्यास रोख्यांच्या किंमती वाढून भांडवली नफा होण्याची शक्यता असते. व्याजदर आवर्तनाचे शिखर निश्चित करणे आणि त्यावेळी गुंतवणूक करणे खूप कठीण असते. परंतु सध्याचे दहा वर्ष मुदतीच्या रोख्यांचे उत्पन्न पाहता पुढील वर्षभरात दहा वर्ष मुदतीच्या रोख्यांचे उत्पन्न ७,४५-७.५० दरम्यान राहील. म्हणून दीर्घ-मुदतीच्या कर्जरोख्यांत एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली संधी आहे. सध्याचे दहा वर्ष मुदतीच्या रोख्यांचे उत्पन्न लक्षात घेता जे गुंतवणूकदार एकरकमी मोठी रक्कम गुंतवू शकत नाहीत त्यांच्यासाठी पाच वर्षाची एसआयपी करण्याची चांगली वेळ आहे. दहा वर्षे मुदतीच्या रोखांचे उत्पन्न सप्टेंबर २०१८ मधील ८ टक्क्यांवरून जुलै २०२० मध्ये ५.५० टक्क्यांपर्यंत घसरल्यानंतर आता ते वाढून पुन्हा ७.३० टक्क्यांवर आले आहे. यामुळे निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्यने गेल्या एका वर्षात ४.३ टक्के आणि तीन वर्षांत ६ टक्के परतावा दिला आहे. फंडातील गुंतवणूकदारांनाही या व्याजदर वाढीचा मोठा फटका बसला आहे.  फंडाच्या स्थापने पासूनची एप्रिल-जून २०२२ ही सर्वात वाईट तिमाही होती या तिमाहीत फंडाच्या ‘एनएव्ही’त ४.४ टक्के तर सर्वात वाईट वर्षात (जून २०२१ ते जून २०२२) २.९ टक्क्यांची घसरण झाली. (कारण व्याजदर वाढल्यावर रोख्यांच्या किंमतीत घसरण होते) म्हणून या फंडाची शिफारस आठ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छीणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आहे. हा फंड स्थिर उत्पन्न गुंतवणूक करणारा असला तरी हा खूप अस्थिर फंड आहे. असे म्हणतात की ‘क्रेडीट रिस्क इज पर्मनंट बट ड्युरेशन रिस्क इज टेम्पररी’ त्यामुळे ही अस्थिरता व्याजदर वाढीच्या वेळी असते. हा फंड दीर्घ मुदतीच्या रोख्यांत व्याजदर वाढण्याचा धोका पत्करून गुंतवणूक करतो म्हणून याचा परतावा अन्य रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांपेक्षा अधिक आहे.

या फंडाची सुरवात ५ जुलै २०१८ रोजी झाली. प्रशांत पिंपळे या फंडाचे स्थापनेवेळी निधी व्यवस्थापक होते. ३१ मार्च २०२१ पासून विद्यमान निधी व्यवस्थापक म्हणून प्रणय सिंन्हा यांची नेमणूक झाली. डेट फंडांच्या ‘लॉंग ड्यूरेशन’ फंड गटात एक वर्षे मुदतीत ८.०८ आणि पाच वर्षे मुदतीत ८.९५ टक्के परतावा देणारा हा फंड दोन्ही कालावधीत अव्वल स्थानी आहे. दोन्ही कालावधीत आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा किमान १ टक्का अधिक परतावा या फंडाने दिला आहे. मालमत्ता क्रमवारीत हा फंड अव्वल स्थान अबाधित राखून आहे. हा फंड ६२८० कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करतो. या फंड गटात सर्वात कमी खर्चाचे प्रमाण असणारा आणि सर्वात अधिक परतावा देणारा हा फंड आहे. म्हणूनच या फंडाला  ‘केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू’ असेच संबोधावेसे वाटते.

अधिक माहितीसाठी आणि गुंतवणूकिसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा

+91 97024 90900

खालील लिंकवर क्लिक करून आजच आपली भेट निश्चिंत करा

https://bit.ly/vkEnquiryform

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top