मधुरा खरे
रत्नागिरीच्या ‘अंतूशेट’च्या पिढ्या ह्याच मातीत उगवल्या आणि विस्तारल्या. अंतूच्या वंशातली एक शाखा गुहागरात समृद्धीत नांदत आहे. अंतुच्या पणतीला गुहागरातल्या वरल्या पाटातल्या खऱ्यांकडे दिली आहे. पाच फुटांच्या आतबाहेर उंची, तांबूस गोरा वर्ण, आणि घारे डोळे सानुनासिक पण सुस्पष्ट आवाजाच्या मधुराची आणि माझी ओळख एका कार्यक्रमा निमित्ताने झाली. पणजोबांच्या नशिबात जरी अश्वथामाच्या दुधाची वाटी असली तरी पणती […]
