LIC mutual fund

संधी की सापळा?

सध्याचे स्वस्त मुल्यांकन सापळ्यात अडकवणारे आमिष ठरण्याची शक्यता अधिक आहे. ही गुंतवणुकीची अखेरची संधी नक्कीच नव्हे. सध्याची अस्थिरता जी दिवसेंदिवस वाढत्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे त्या अस्थिरतेवर मात करण्याचा प्रयत्न योग्य मालमत्ता विभाजनातून करता येईल. वर्षभरात पावसाळ्यात लिंब सर्वात स्वस्त असतात. लिंब स्वस्त झाली म्हणून घरातील गृहिणी साठवणीचे लोणचे किंवा लिंबाचे तत्सम पदार्थ पावसाळ्यातील स्वस्त […]

संधी की सापळा? Read More »

कर नियोजनाचे पंचक

कर नियोजन आणि विशेषत: प्राप्तिकराचे नियोजन ही दरवर्षी करायची गोष्ट आहे. वर्षांच्या सुरुवातीला करनियोजन केले नाही तर शेवटी करवजावटीसाठी जे पर्याय उपलब्ध आहेत त्या साधनाचा उपयोग करावा लागतो. कर वजावटीस पात्र मुदत ठेवी आणि जीवन विम्यातील गुंतवणुकीत स्थैर्य असल्याने परताव्याच्या दराकडे डोळेझाक करून कर बचतीसाठी या साधनांना पंसती दिली जाते. स्थैर्याव्यतिरिक्त त्या व्यक्तीच्या संपत्ती-निर्मितीची गरज

कर नियोजनाचे पंचक Read More »

तारांकित सुधारणेचा संभाव्य लाभार्थी

एलआयसी एमएफ लार्जकॅप, जो पूर्वी एलआयसी एमएफ ग्रोथ फंड या नावाने ओळखला जात होता. या फंडाने मागील वर्षभरात १८.८६ टक्के वार्षिक परतावा दिला असून लार्जकॅप गटात हा फंड दिनांक ८ नोव्हेंबरच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार तिसऱ्या क्रमांकावर, तर एक वर्षांच्या ‘एसआयपी’ परताव्यात लार्जकॅप गटात चौथ्या स्थानी असून त्याने २१.५२ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. तीन वर्षे

तारांकित सुधारणेचा संभाव्य लाभार्थी Read More »

तिला काही सांगायचंय!

गंपू जन्माला आला तो हितचिंतक म्हणूनच. जन्माला येणारा प्रत्येक जीव भोकाड पसरून येतो; पण गंपूने आईला नसले तरी सुईणीला तरी नक्की विचारले असेल, ‘कसं काय गोपिकाबाई, तब्येत ठीक आहे ना?’ गंपू जन्माला आला तोच उपकारापुरता आला! केवळ आईची वासल्यभावना तृप्त करणे आणि वडिलांना वारसाची सोय करणे यापलीकडे गंपूच्या जन्माला येण्याचा दुसरा हेतू नसावा. इतका उपकारी

तिला काही सांगायचंय! Read More »

नाही कशी म्हणू तुला… घेते तुझे नांव

  चालू वर्षात भांडवली बाजाराची वाट अतिशय खडतर असली तरी, ऑक्टोबर महिन्यांत म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या माध्यमातून ७९८५ कोटी गुंतविण्यात आले. ही रक्कम आजपर्यंतची कुठल्याही महिन्यांत ‘एसआयपी’ माध्यमातून गुंतविलेल्या राक्कमेहून सर्वाधिक रक्कम आहे. दिवाळीच्या दिवसांत धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन मिळून सर्वाधिक ‘सिप’ची नोंदणी झाल्याचे दिसून आल्याचे वृत्त म्युच्युअल फंड विषयक वार्तांकन करणाऱ्या संकेतस्थळाने दिले आहे. फटाक्याचा दणदणात आणि सोन्याची चमक फिकी

नाही कशी म्हणू तुला… घेते तुझे नांव Read More »

कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा…

  मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडाचा मागील एक वर्षाचा परतावा गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर टाकणारा आहे २३ ऑक्टोबर २०१७ रोजी बाजार बंद होते वेळी बीएसइ एसअँडपी मिडकॅप १६१४७.९७ वर बंद झाला होता. २३ ऑक्टोबर २०१८ रोजी बाजार बंद होते वेळी बीएसइ एसअँडपी मिडकॅप निर्देशांक १३८३४.५ वर बंद झाला. वर्षभरात मिडकॅप निर्देशांकात १४ टक्क्यांची तर १ जनेवारी २०१८

कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा… Read More »

सही है

समभाग गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार मिड कॅपच्या मोहात पडला नाही असे अभावानेच आढळते.    एलआयसी एमएफ मिड कॅप फंडाच्या ताज्या पतनिश्चितीमुळे या फंडाचा समावेश निवडक दर्जेदार मिड कॅप फंडांमध्ये झाला आहे.   पतनिश्चितीच्या   पहिल्याच प्रयत्नांत नव्याने गुंतवणुकीसाठी आश्वासक पत मिळणे हे एखाद्या फलंदाजाने कसोटी पदार्पणात द्विशतक झळकावण्यासारखे आहे. मागील आठवड्यात मॉर्निंगस्टार आणि व्हॅल्यु रिसर्च ऑनलाईन या म्युच्युअल फंडांचे

सही है Read More »

Scroll to Top