कर नियोजनाचे पंचक
कर नियोजन आणि विशेषत: प्राप्तिकराचे नियोजन ही दरवर्षी करायची गोष्ट आहे. वर्षांच्या सुरुवातीला करनियोजन केले नाही तर शेवटी करवजावटीसाठी जे पर्याय उपलब्ध आहेत त्या साधनाचा उपयोग करावा लागतो. कर वजावटीस पात्र मुदत ठेवी आणि जीवन विम्यातील गुंतवणुकीत स्थैर्य असल्याने परताव्याच्या दराकडे डोळेझाक करून कर बचतीसाठी या साधनांना पंसती दिली जाते. स्थैर्याव्यतिरिक्त त्या व्यक्तीच्या संपत्ती-निर्मितीची गरज […]






