अर्थ वल्लभ

निःपक्ष विश्लेषक

31 Aug 2020 • 1 min read

जगभरात डू इट युवरसेल्फ (डीआयवाय) संप्रदाय वेगाने फोफावतो आहे. याला गुंतवणूक व्यवस्थापन अपवाद राहिलेले नाही. स्वतः करा (डीआयवाय) गुंतवणूक ही एक पद्धत आणि धोरण आहे ज्यात वैयक्तिक गुंतवणूकदार स्वत:ची गुंतवणूक स्वत:च व्यवस्थापित करतात. गुंतवणूकदार सामान्यत: पूर्ण-सेवा दलाली (फुल सर्विस ब्रोकर) किंवा व्यावसायिक निधी व्यवस्थापकांची (आरआयए) सेवा न घेता सवलतीच्या दलाली संस्था (डिस्काउंट ब्रोकर्स)  आणि नि:शुल्क गुंतवणूकीची सेवा देणाऱ्या मंचांचा वापर करतात. नव्याने उदयाला आलेल्या या ‘डीआयवाय’ गुंतवणूकदार सांप्रदायीकांच्या अगदी विरुद्ध ‘डन फॉर मी’ म्हणजे सर्वकाही हातात मिळण्यासाठी व्यावसायिक शुल्क देऊन त्यांचे सेवा घेणारे सुद्धा गुंतवणूकदा मोठ्या प्रमाणावर आहेत. ‘डीआयवाय’ सांप्रदायाचे काही तोटे आहेत. हे सांप्रदायिक मुख्यत्वे हौशी किंवा यांत्रिक (रोबो) सल्लागाराचे सहाय्य घेतात. हौशी किंवा यांत्रिक (रोबो) सल्ल्यांत व्यावसायिकतेच अभाव असतो. यांत्रिक सल्लागारांना केवळ आकडे कळतात त्यांच्या सल्ल्यात भावनांचा अभाव असतो. हे यांत्रिक सल्लागार मुख्यत्वे अल्गोरिथमचा वापर (संगणक प्रणालीवर आधारित कार्यसूचनांचे पालन) करून साचेबद्ध पर्याय सुचवितात. मुखत्वे ही पद्धत निष्क्रीय गुंतवणूकीचा मागोवा घेण्यासाठी वापरली जाते. सक्रीय व्यवस्थापन असालेल्या फंडात मानवी निधी व्यवस्थापक तांत्रिक सल्लागरापेक्षा चांगला परतावा देतात असे आढळून आले आहे. ‘डीआयवाय’ पंथातील गुंतवणूकदारांची नेमकी ही गरज ओळखून सुरु झालेला PrimeInvestor.in हा मंच अस्तित्वात आल्याला एक वर्ष पूर्ण झाले असल्याने त्याचे दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.

‘प्राईमइन्व्हेस्टर डॉट इन’ (इथून पुढे प्राईम) हा विश्लेषण मंच आहे. या मंचाने ‘सेबी’कडे ‘गुंतवणूक विश्लेषक’ (इन्व्हेस्टमेंट अॅनॅलिस्ट) म्हणून नोंदणी केली आहे. गुंतवणूकदारांना वार्षिक वर्गणी आकारून निःपक्ष सल्ला मिळण्याची सुविधा हा मंच देत आहे. ‘प्राईम’ आधुनिक काळातील गुंतवणूकदारांना पडणाऱ्या प्रश्नांचा मागोवा घेत उच्च-गुणवत्तापूर्ण आणि निःपक्ष संशोधनावर आधारित विश्लेषणात्मक उत्तरे देणारे संशोधन अहवाल वर्गणीदारांपर्यंत पोहचवतो. ‘प्राईम’ जवळजवळ उपलब्ध सर्व वैयक्तिक गुंतवणूक /विमा उत्पादनांचे विश्लेषण करून संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधनानंतर शिफारस करतो किंवा गुंतवणूक टाळण्याचा सल्ला देतो. या मंचाचे वर्गणीदार होण्यापूर्वी संभाव्य वर्गणीदार कशाची अपेक्षा करू शकतात आणि कशाची अपेक्षा करू नये याची जंत्री ‘प्राईम’ने संकेतस्थळावर दिली आहे.

चेन्नईस्थित श्रीकांत मीनाक्षी यांना या स्टार्टअपची कल्पना सुचली. सध्याचा उपक्रम सुरु करण्याआधी त्यांनी राष्ट्रीयपातळीवर म्युच्युअल फंड वितरणाची यंत्रणा उभी केली होती. या वितरण मंचासाठी कार्यरत असतानाच्या त्यांच्या माजी सहकारी विद्या बाला आणि भावना आचार्य यांच्या सहयोगाने ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. मंच अस्तित्वात आल्यानंतर आरती कृष्णन या चमूला सल्लागार संपादक म्हणून येऊन मिळाल्या. विद्या बाला आणि आरती कृष्णन यांची ओळख गुंतवणूकदारांना स्थंभ लेखिका म्हणून आहे. त्यांनी विविध इंग्रजी नियतकालिकांसाठी प्रदीर्घ काळ स्थानभ लेखन केले आहे. वर्षभरापूर्वी तीन संस्थापक आणि २ कर्मचारी यांच्यासह सुरु झालेला हा प्रवास वर्ष संपत असतांना १० वर पोहचला आहे.

‘प्राइम’चे ‘रेडी टू युज’ स्वरूपाचे २० वेगवेगळे पोर्टफोलीओ वर्गणीदारांना उपलब्ध असून वेगवेगळ्या गुंतवणूक कालावधीसाठी, वेगवेगळ्या वित्तीय ध्येयांसाठी (सेवानिवृत्ती किंवा मुलांचे शिक्षण), वेगवेगळ्या गरजा (नियमित उत्पन्न, वृद्धी वाढ इत्यादी) साठी पोर्टफोलिओ आहेत. वर्गणीदारांना गुंतवणूक साधनाची अचूक निवड (फंड, मुदत ठेव, निधी, मुदतीची विमा योजना, वेगवेगळ्या अल्प बचतीच्या सरकारी योजना) करण्यास सहाय्य करतात. या मंचावर प्रत्येक पोर्टफोलिओसाठी तपशीलवार विवरण त्यामागची तर्कसंगत कारणे वर्गणीदाराला कळतात. एक सामान्य गुंतवणूकदार त्यांच्याशी संबंधित कोणत्याही गरजेसाठी पोर्टफोलिओ निवड करू शकतो. विवेकी गुंतवणूकदार स्वतःची वित्तीय उद्दीष्टे निश्चित करण्यासाठी ‘प्राइम’ची मदत घेऊ शकतात. एक सामान्य गुंतवणूकदार त्यांच्या कोणत्याही गुंतवणूक विषयक प्रश्नांची पर्यायी उत्तरे या मंचावर शोधू शकेल. अनुभवी गुंतवणूकदारांसाठी, ‘प्राइम’ने फंड निवडण्यासाठी ‘थीम पार्क’, उपलब्ध करून दिले असून वर्गणीदार गुंतवणूकीच्या कल्पनांसह या ठिकाणी जाऊन वित्तीय ध्येयांची पूर्तता करणाऱ्या फंडांची निवड करू शकतील. सर्व वर्गणीदरांसाठी त्यांच्या गुंतवणुकीवर तज्ञांचे मत अजमावण्यासाठी पुनरावलोकन साधने उपलब्ध असून शिफारस केलेले फंड आणि ईटीएफची यादी वापरू शकतात. “आम्ही प्रत्येक तिमाहीअंती आमच्या शिफारस प्राप्त फंडांची कामगिरी तपासून आवश्यक भासल्यास बदल करतो. याशिवाय, ‘प्राइम’ आठवड्यातून तीन वेळा फंड रणनीती संदर्भातील शिफारसी आणि बाजार विश्लेषणाच्या आधारे दर्जेदार मजकूर प्रकाशित करतो, असे मंचाच्या एक संस्थापक विद्या बाला सांगतात. या सर्व सेवा सेवा वार्षिक २५०० रुपये वर्गणीत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ‘पर्सनलफिन’, ‘मनीलाइफ’, ‘व्हॅल्यू रिसर्च’ आणि ‘मॉर्निंगस्टार’ यासह अन्य माध्यमे संशोधन सेवा देत असली तरी “या सर्वांची उपलब्धता मर्यादित किंवा विशिष्ठ सेवेपुरती मर्यादित आहे. तर ‘प्राइम’च्या सेवा वित्तीय बाजारातील सर्व उत्पादनांन सामावणाऱ्या आहेत. ग्राहकांकडून घेतलेले सदस्यता शुल्क हे केवळ आमच्या उत्पन्नाचा स्त्रोत आहे. आम्ही कोणताही मोबदला, दलाली किंवा आमच्या संकेत स्थळावर जाहिरात करण्यासाठी म्युच्युअल फंड किंवा विमा कंपन्यांकडून शुल्क स्वीकारत नाही” असा श्रीकांत यांचा दावा आहे. वार्षिक वर्गणी स्विकारण्यास सुरवात झाल्यापासून या मंचाचे ५००० नोंदणीकृत वापरकर्ते आणि १००० वर्गणीदार ग्राहक असल्याची माहिती श्रीकांत यांनी दिली. “हे कोणत्याही विपणन खर्चाशिवाय तसेच आमच्या समाजमाध्यमातील पोस्ट आणि ‘लोकसत्ता’सारख्या माध्यमांनी आमच्या उपक्रमाची दखल घेतली म्हणून हे शक्य झाले. पुढच्या तीन वर्षांत ‘प्राइम’ने  दरवर्षी १०० टक्के वाढीचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच साहसी गुंतवणूकदारांकडून निधी उभारण्याचा विचार नसल्याचे सांगत  नजीकच्या विस्तारासाठी संस्थापक आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसत्ता वाचकांना वार्षिक वर्गणीवर १० टक्के विशेष सवलत दिवाळी पर्यंत दिली जाणार असून या सवलतीचा लाभ घेण्यासाठी LOKSATTA हा कुपन कोड वापरायचा आहे.

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top