अर्थ वल्लभ

आता कशाची बंधने ?

23 Jan 2023 • 1 min read

आता कशाची बंधने ?

ज्यांनी आर्थिक नियोजनासाठी संपर्क केला पैकी प्रिती दाते जोशी यांच्या कुटुंबाची आजच्या नियोजनासाठी निवड केली. जोशी कुटुंबात प्रिती दाते जोशी (३४) विशाल जोशी (३५) आणि त्यांची मुलगी धृती (३० महिने) असे तिघे आहेत. विशाल हे राष्ट्रीयकृत बँकेत आहेत. प्रिती या संगणक अभियंता असून एका स्टार्टअपमध्ये पुण्यात नोकरी करतात. करोना काळात त्यांनी नोकरी गमावली होती जवळ जवळ १८ महिन्यांच्या बेरोगारीनंतर त्यांना १ डिसेंबर पासून पुन्हा नोकरी लागली. प्रिती यांनी वर्ष २०१८-१९ मध्ये ९ लाखांचे एक शैक्षणिक कर्ज घेतले होते या कर्जा पैकी ३ लाखांची परतफेड झाली असून ६ लाखांचे कर्ज अद्याप फेडायचे आहे. कोरोनपूर्व काळात जोशी कुटुंबीय स्वत:ची सदनिका भाड्याने देऊन दुसऱ्या सदनिकेत भाड्याने रहात होते. कोरोना काळात नोकरी गेल्या नंतर स्वत:च्या घरी रहायला आले. त्यांची ३ वित्तीय ध्येये निश्चित करण्यात आली.
येत्या दोन ते तीन वर्षात स्व मालकीची ‘वन‘ बीचकेटू बीएचके’ विकत घेणे मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तरतूद करणे सेवा निवृत्तीपश्चातच्या उदार निर्वाहाची तरतूद करणे राहत्या घरा व्यतिरिक्त जोशी कुटुंबीयांकडे १० लाखांची रोकड सुलभता आहे. या व्यतिरिक्त काहीही गुंतवणूक नाही.
कृती योजना

बचत खात्यात १० लाख विना वापर पासून आहेत. या पैकी ३ लाख आणीबाणीच्या खर्चाच्या तरतुदीकरता ठेऊन उर्वरीत ७ लाख   खालील प्रमाणे गुंतविणे  

  • २ लाख कॅनरा  रोबेको फ्लेक्झीकॅप फंड
  • २ लाख निप्पॉन इंडिया मल्टीकॅप फंड
  • २ लाख फ्रँकलीन इंडिया फोकस्ड इक्वीटी फंड
  • १ लाख  कॅनरा  रोबेको इमर्जिंग इक्विटीज फंड

 १० लाखांच्या बँकेच्या मुदत ठेवी शैक्षणिक कर्जाच्या परत फेड करण्यासाठी वापरावे.

  • प्रिती आणि विशाल भविष्यात कर्ज घेणार असल्याने त्यांनी प्रत्येकी १ कोटीचा शुद्ध विमा (टर्म प्लान) खरेदी करावा.
  • आरोग्य विमा पुरेसा आहे.
  • ‘वन बीएचके’ मधून ‘टू बीएचके’ मध्ये जाण्यासाठी सध्या २५ लाख अतिरिक्त हवे आहेत. घराच्या किंमतीत वार्षिक वाढ  ७.५  टक्क्यांची गृहीत घारली तर एका वर्षाने २७ लाख २ वर्षांनी २९ लाख ३ वर्षांनी ३१.५० लाख ४ वर्षांनी ३३.७५ लाख आणि ५ वर्षांनी  वर्षांनी  ३६.४५ लाख लागतील या रक्कमे पैकी ५० टक्के रक्कम जमा करण्यासाठी ३५ हजाराची एसआयपी आणि वर उल्लेख केलेले ७ लाख वापरावे लागती.
  • प्रिती आणि विशाल यांचा मासिक सध्याचा मासिक खर्च ३० हजार असून ते २०४९ मध्ये सेवा निवृत्त होतील तेव्हा त्यांचा  खर्च १.७० लाख असेल. (महागाईचा वार्षिक दर ७.५ टक्के) या पैकी २१ हजार रुपये एनपीएस पेंशनमधून मिळतील. (वार्षिकी दर ४ टक्के)  
  • या पैकी ६३ लाख राष्ट्रीय पेंशन योजनेतून तर
  • सेवा निवृत्ती उदरनिर्वाहासाठी ५ कोटी सेवा निवृत्ती निधीची आवश्यकता आहे.  या पैकी १.३० कोटी विशाल यांच्या भविष्य निर्वाह निधीतून येतील उर्वरित ३.७० कोटींची तरतूद त्यांना करावी लागेल. या साठी त्यांन २३ हजाराची एसआयपी २६ वर्षांसाठी करावी लागेल.
  • मुलीचे उच्च शिक्षणाला २०३९ मध्ये सुरवात होईल २०३९ ते २०४४ दरम्यान २८ लाखांची आवश्यकता भासेल. याची तरतूद करण्यासाठी १२ हजाराची एसआयपी करावी लागेल.    
मा (हजार रुपये)खर्च (हजार रुपये)
वेतनघर खर्च ३०
विशाल जोशी ५५शैक्षणिक कर्जचा हप्ता १८
प्रिती दाते जोशी ४५बचत ५२
एकूण जमा १००एकूण खर्च १००

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top