अर्थ वल्लभ

बकुळीचे झाड

29 May 2023 • 1 min read

बकुळीचे झाड

\‘कर्त्यां’च्या तिमाही आढाव्यात स्मॉल कॅप फंड गटात कोटक स्मॉलकॅप फंडाची जागा फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंडाने घेतली. जोखीम परतावा गुणोत्तर हा फंड निवडीत मह्तावाचा घटक आहे. उदाहरणार्थ, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये संपत्ती निर्मितीचा दर आणि वैविध्य हे वेगवेगळे असतात. तथापि, बहुतेक गुंतवणूकदार फंडांच्या मागील कामगिरीचे मूल्यांकन करून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा किंवा पैसे काढून घेण्याचा निर्णय घेतात. म्युच्युअल फंडाचे मूल्यमापन करण्यासाठी किंवा त्याच्या फंड गटातील अन्य स्पर्धक फंडांची तुलना करण्यासाठी ते त्या त्या फंडांनी परताव्यांना एक मापदंड मानतात. परंतु बाजारातील अस्थिरतेमुळे पराताव्यावर विसंबून फंड निवड करणे घटक ठरू शकते. गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांच्या जोखमीचाही (अस्थिरतेचा) विचार केला पाहिजे, प्रमाणित विचलन (स्टॅडर्ड डेव्हीएशन) हे जोखीम मोजण्याची पद्धत आहे. परतावा आणि जोखीम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणूनच, गुंतवणुकीच्या जोखमींचे मूल्यांकन करून परताव्याचे अर्थपूर्ण मूल्यांकन करणे महत्त्वाचे असते. जोखीम-परतावा गुणोत्तर हे दिलेल्या गुंतवणूकीतून संभाव्य नफा ते संभाव्य तोटा यांचे दिशा दर्शन करते. उच्च जोखीम-उच्च परतावा गुणोत्तर हे सामान्यतः श्रेयस्कर असते. कारण ते अनावश्यक जोखीम न घेता गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळण्याची क्षमता देते. जोखीम परतावा जास्त असलेले गुणोत्तर असे सूचित करते की गुंतवणूक जास्त धोकादायक असू शकते. गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओसाठी योग्य गुणोत्तर ठरवताना त्यांची जोखीम सहनशीलता आणि गुंतवणुकीची उद्दिष्टे उपलब्ध कालावधी यांचा विचार केला पाहिजे. गुंतवणुकीत विविधता आणणे, संरक्षणात्मक रणनीतीचा अवलंब करणे आवश्यक असते. म्यूच्युअल फंडातील जोखमीची पातळी निधी व्यवस्थापक कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात यावर अवलंबून असते. प्रत्येक मालमत्ता वर्ग, जसे की समभाग रोखे अन्य मौल्यवान धातू जिन्नस यावर ठरत असते. साधारणपणे, म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओमधील रोखे आणि मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये सर्वात कमी जोखीम असते, तर समभाग जोखीम-परताव्याच्या दुसऱ्या टोकाला असतात. त्यातही स्मॉलकॅप आणि थिमॅटिक फंड यांच्यात तीव्र जोखीम असते. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की उच्च जोखीम म्हणजे उच्च परतावा नव्हे. आज कोटल स्मॉलकॅप फंड परतावा मिळविण्यासाठी सतत उच्च जोखीम घेत असूनही कमी परतावा मिळवीत आहे.

जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक वाढ भारताच्या अर्थव्यवस्थेने नोंदली आहे. फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंडचे उद्दिष्ट पुरेशी नफा क्षमता आणि व्यवसाय वृद्धीक्षम अशा कंपन्यांत गुंतवणूक करण्याची संधी शोधण्याचे आहे . हा फंड येत्या काही वर्षांत भारताच्या विकासात महत्वाचे योगदान देतील अशा कंपन्यांत गुंतवणूक करतो. मूलभूतपणे मजबूत ताळेबंद असलेल्या स्मॉल-कॅप कंपन्यांवर लक्ष केंद्रित करणे हे या फंडाच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ठ आहे. फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड प्रामुख्याने ज्यांचा दीर्घ कालावधीसाठी वाढीचा प्रवास सुरू आहे अशा प्रारंभी आणि कमी प्रमाणात गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करतो. फंडाची बहुतांश गुंतवणूक स्मॉल-कॅप कंपन्यांत आहे. या फंडाची सुरवात १३ जानेवारी २००६ रोजी झाल्यापासून, फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंडाने ७५९२ कोटींच्या मालमत्तेवर १४.४८ टक्के वार्षिक परतावा कमावला आहे. याच कालावधीत फंडाचा मानदंड असलेल्या निफ्टी स्मॉल कॅप २५० ने १२.४५ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. चलत परतावा ( रोलिंग रिटर्न्स) हे निश्चित काळखंडासाठी जसे की प्रत्येक दिवशी/ साप्ताहिक /मसिक / वार्षिक या विशिष्ट कालावधीसाठी (रोलिंग रिटर्न्स पिरीयड) घेतलेले आणि कालावधीच्या शेवटच्या दिवसापर्यंत घेतलेले वार्षिक परतावा आहे. खाली दिलेल्या आलेखात या दहा वर्षासाठी तीन वर्षाची चलत सरासरी दिली आहे. तीन वर्षाच्या परताव्याचा आणि त्याच्या मानदांडाने दिलेल्या पराताव्याशी तुलना केली असता चलत परतावा हे फंडाच्या कामगिरीचे सर्वोत्तम मोजमाप आहे. दुसरीकडे, रोलिंग रिटर्न्स, कोणताही पक्षपात न करता, सर्व कालावधीत फंडाची परिपूर्ण आणि सापेक्ष कामगिरीचे मोजमाप करते. परिणामी, म्युच्युअल फंड गुंतवणुकीशी संबंधित जोखीम विविध गुणोत्तरे जसे की शार्प गुणोत्तर, सॉर्टिनो गुणोत्तर, मानक विचलन आणि ट्रेनर गुणोत्तर वापरून परिमाण करता येतात. या गुणोत्तरांचे मूल्यांकन केल्यास हा फंड सर्व स्मॉलकॅप फंडात अव्वल ठरतो.
फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा आर जानकीरामन आणि कृष्ण प्रसाद नटराजन यांच्याकडे आहे. फंडाच्या पोर्टफ़ोलिओची रचना निधी व्यवस्थापकांनी अत्यंत काळजीपूर्वक केली आहे. फंडाची गुंतवणूक विविध क्षेत्रांमध्ये वैविध्यपूर्ण आहे. त्यापैकी, एकूण गुंतवणुकी पैकी सर्वाधिक ३३ टक्के गुंतवणूक बँकांत आहे, त्यानंतर औद्योगिक उत्पादने २१ टक्के , ग्राहक टिकाऊ वस्तू १५ टक्के आणि बांधकाम १३ टक्के आहे. उर्वरित क्षेत्रांमध्ये पेट्रोलियम उत्पादने, एरोस्पेस आणि संरक्षण, किरकोळ, वित्तीय सेवा आणि आरोग्य सेवा यांचा समावेश आहे. फंडाच्या गुंतवणुकीत ७४.९२ टक्के स्मॉलकॅप ११.८५ टक्के मिडकॅप आणि ६.१९ टक्के लार्जकॅप कंपन्यांचा समावेश आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, ब्रिगेड एंटरप्राईस, दिपक नायट्राईट आयडीआयसीआय बँक, जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स, कार्बोरंडम युनिव्हर्सल, करुर वैश्य बँक फिनोलेक्स केबल, सीसीएल प्रोडक्टस आणि एचडीएफसी बँक या शीर्ष १० कंपन्या फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत ७८ कंपन्यांचा समावेश आहे. निधी व्यवस्थापकांनी ३० एप्रिलच्या तपशिलानुसार सिएट लिमिटेडला गुंतवणुकीतून वगळले तर हिताची एनर्जीचा नव्याने समावेश केला.

निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांकाने २०१७ ते २०२३ या कालावधीत दीर्घकाळ एकाच टप्प्यात रेंगाळत होता. निर्देशांकाने २०१७ मध्ये शिखर गाठून खालच्या दिशेने प्रवास केला. पुन्हा जानेवारे २२ मध्ये नवीन शिखर गाठून पुन्हा निर्देशांक खाली आला आहे.  तांत्रिक विश्लेषणानुसार निर्देशांक सहा आठ महिन्यांत नवे शिखर गाठेल असा अंदाज व्यक्त होत आहे. स्मॉलकॅप कंपन्यांसाठी सरकारी धोरणे सकारत्मक ठरत आहेत. फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड त्याच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओसह या तेजीचा लाभ घेण्यास सज्ज झाल्याचे दिसत असल्याने ज्या गुंतवणूकदारांना जोखीम स्वीकारून मोठा परतावा मिळविण्याची आस असलेल्या गुंतवणूकदारांनी या फंडाची निवड करावी.  बकुळीची फुले जशी नाजूक असतात परंतु सुकल्यावर सुद्धा सुगंध देतात तसा हा फंड स्मॉलकॅप मधून परताव्याचा रतीब घालेल अशी शक्यता आहे.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top