अर्थ वल्लभ

जगाच्या संक्रमणाचा लाभार्थी

22 Nov 2020 • 1 min read

सत्ता पलट झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (निकाल लागण्या आधी) फेडरल ओपन मार्केट्स कमिटीची (एफओएमसी) ४ आणि ५ नोव्हेंबररोजी बैठक झाली. या बैठकीत व्याज दर ० ते ०.२५ टक्के  ठेवण्याचा निर्णय घेतला. हे पत धोरण अमेरिकेच्या सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी असल्याचे नमूद करतांना फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरॉम पॉवेल यांनी सांगितले. प्रसंगी महागाई वाढली तरी बेरोजदारीचा दर नियंत्रणात आणला जाण्यासाठी दीर्घकाळ निच्चांकी व्याजदर ठेवणे  आवश्यक असल्याचे समितीचे म्हटणे आहे.  त्यांच्या या ताज्या वार्तालापाचा व्हिडीओ युट्यूबवर उपलब्ध असून ‘डीआयवाय’ सांप्रदायिकांनी हा व्हिडीओ आवर्जून पहावा असा आहे.  अमेरिकन मध्यवर्ती बँकेने चलन आणि रोकड सुलभतेसह सर्व प्रमुख धोरणात बदल घडवून आणला आहे. या धोरणाचे समर्थन करतांना  जेरॉम पॉवेल यांनी हे धोरण  निम्न-उत्पन्न कुटुंबांच्या हिताचे असून त्यामुळे अधिक रोजगार उत्पन्न होईल  असा आशावाद व्यक्त केला आहे. जेरॉम पॉवेल यांनी भाषणात असे ही सांगितले की, काही काळ महागाई वाढीचा दर २ टक्क्यांपेक्षा अधिक राहिला तरी रोजगाराची निर्मिती हे  फेडचे उद्दीष्ट असल्याने महागाई आणि बेरोजगारी वाढ या पैकी वाढत्या महागाईने रोजगारीचा दर वाढणार असेल तर व्याजदर न वाढवणे आवश्यक आहे.

समष्टी अर्थशास्त्र (मॅक्रो इकोनॉमिक्स) आणि मुद्रा अर्थशास्त्र (मॉनेटरी इकोनॉमिक्स) या अर्थशास्राच्या दोन शाखांचा असा सिद्द्धांत आहे की अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यासाठी लोकांना कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक असते. कमी व्याजदर हे इच्छुक कर्जदारांना कर्जघेण्यास प्रोत्साहित करतात. परंतु कमी व्याजदरामुळे अधिक परताव्यासाठी गुंतवणूकदार अधिक साहसी गुंतवणुकांचा मार्ग चोखाळतात. प्रगत अर्थव्यवस्थेतील निच्चांकी व्याजदरामुळे या अर्थवस्थांतील गुंतवणूकदार त्यांच्या देशाबाहेर गुंतवणुक करण्याच्या संधीचा शोध घेत असतात. अमेरिकेतील साहसी गुंतवणूकदरांच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी पीजीआयएम (प्रूडेंशियल ग्लोबल इंव्हेस्टमेंट मॅनेजर) या अमेरिकेतील आघाडीच्या म्युच्युअल फंडाने २०१४ मध्ये  पीजीआयएम जेनिसन इमर्जिंग मार्केट्स इक्विटी ऑपोर्च्यूनीटीज फंड सुरु केला. मागील महिन्यांत हा फंड पीजीआयएमच्या भारतातील उपकंपनीच्या मार्फत हा फंड भारतीय गुंतवणूकदारांना पीजीआयएम इंडिया इमर्जिंग मार्केट्स इक्विटी ऑपोर्च्यूनीटीज फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना नुकताच उपलब्ध झाला आहे.

 पीजीआयएम जॉन्सन इमर्जिंग मार्केट्स इक्विटी ऑपोर्च्यूनीटीज फंड हा उभरत्या अर्थव्यवस्थांमधील लार्जकॅप समभागात गुंतवणूक करणारा फंड आहे. मागील पाच वर्षात फंडाने १२० टक्के भांडवली वृद्धी दिली आहे. ‘एमएससीआय ईएम’  हा फंडाचा मानदंड असून, हा निर्देशांक उभरत्या १० अर्थव्यवस्थांचे प्रतिनिधित्व करत असून या निर्देशांकात संमंधीत अर्थव्यावास्थांतील  लार्जकॅप आणि मिडकॅप कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिकेत फंडांची पत निश्चित करणाऱ्या ‘लिपर’ आणि ‘मॉर्निंगस्टार’ या दोनही पत निश्चिती कंपन्यांनी या फंडाला ‘फाईव्ह स्टार’ रेटिंग दिले आहे.  फंड गुंतवणुकांच्या ताज्या उपलब्ध आकडेवारी नुसार फंडाच्या  चीन (४८.०६%), तैवान (११.७%), ब्राझील (६.५%), अमेरिका (६.२%), दक्षिण कोरिया (६.१%), भारत (५.१२%), अर्जेंटिना (२.१%), पोलंड (१.६%) हॉगकाँग (१.४%) इंडोनेशिया (०.९%) आणि थायलंड(०.६%) अशा भौगोलिक प्रदेशात गुंतवणुका आहेत. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक विवेकी ग्राहकाभिमुख (३२%) आणि आरोग्य निगा (२४%) या उद्योगात आहे. उर्वरित गुंतवणुका इंटरनेट आधारित उद्योग, दळणवळण या क्षेत्रात आहेत.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या  निवडणुकानंतर भू-राजकीय जोखीम कमी होत असल्याने अमेरिकी डॉलर कमकुवत होण्याची शक्यता आहे. बायडन प्रशासन आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणाबाबत असुरक्षितता (टेरिफ हाईक) कमी झाल्याने कमकुवत डॉलरची अपेक्षा आहे.  जगाची कठोर व्यापार धोरणातून सुटका झाल्याचा सर्वाधिक फायदा उदयोन्मुख बाजारपेठेला होईल.  शुक्रवारी डॉलरचा अन्य प्रमुख देशांच्या चलनांच्या तुलनेत मागोवा घेणारा ‘युएस डॉलर इंडेक्स’ तीन महिन्याच्या निच्चांकी पातळीवर आला आहे.   निवडणूक निकालानंतर चायनीज युआन) आणि अन्य आशियाई चलन डॉलरच्या तुलनेत वधारलेले आढळते. शुक्रवारी अमेरिकेत बाजार बंद होतांना चीनी युवान दोन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. घसरत्या डॉलरचा परिणाम  गुंतवणूकदार डॉलर-नामांकित मालमत्तांतून बाहेर पडून आपला मोर्चा उदयोन्मुख बाजारपेठांकडे वळवतील. बायडन प्रशासनाचा कल चीनबरोबर संघर्षापेक्षा व्यापारी समंध सुधारण्यावर असल्याने ‘रिस्क प्रीमियम’ कमी होण्यात होईल.  

गेल्या आठ दहा महिन्यांतील निरनिराळ्या देशांच्या आर्थिक प्रगतीचा (वा अधोगती) आढावा घेतल्यास, ज्या देशांचा मृत्युदर कमी आहे त्या देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात कमी घट झाली असल्याचे दिसते. अमेरिका, स्वीडन, डेन्मार्क व पोलंड या देशांमध्ये साधारण सारख्याच प्रमाणात सकल राष्ट्रीय उत्पन्नात घट झाली. या देशांचे मानवी जीव वाचविण्यासाठी अर्थव्यवस्थांकडे दुर्लक्ष झाले.  ज्या देशांनी नागरिकांचे जी व वाचविण्यात तसेच आर्थिक घसरण कमीतकमी पातळीवर ठेवण्यात यश मिळविले,त्या देशांनी उपाययोजनांमधील तत्परता, अल्पकालीन टाळेबंदी, सरकारकडून पुरेशा प्रमाणात मिळालेली आर्थिक मदत याच सोबत  निर्यातक्षेत्राला लवकरात लवकार गतिमान करण्युआत यश मिळविल्याचे दिसते. अधिक रोजगार निर्मिती करण्यावर चीनने लक्ष दिल्याने असंख्य तरुणांसाठी रोजगार निर्माण केला; यात मुख्यत्वे  वस्त्रोद्योग, तयार कपडे, पादत्राणे घरगुती वापराच्या वस्तू निर्यात प्रधान वस्तूंच्या उत्पादनाचा समवेश आहे. भारत मात्र निर्यातीसाठी माहिती तंत्रज्ञांनासारख्या बुद्धी कौशल्यावर आधारित मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची क्षमता नसलेले उद्योग सुरू झाल्यामुळे सोसाव्या लागणाऱ्या नुकसानाविषयी आपण मौन बाळगून अत्मानिर्भारातेचा डंका वाजवत आहोत. सैन्य जसे भाकरीवर चालते आणि अन्नाची रसद तोडली की शत्रू शरण येतो. तसेच अर्थवृद्धी साठी राजगार निर्मिती करण्याऱ्या  उद्योगांची गरज असते.  चीनने उच्च तंत्रज्ञानाशी संबंधित निर्यातीत पाय रोवण्यापूर्वी अनेक दशके किमान कौशल्यांवर आधारित वस्तू  निर्यातीसाठी निर्माण करण्यावर भर दिला व रोजगारनिर्मितीतून तसेच विदेशी चलनाच्या कमाईतून आर्थिक प्रगती साधली. सध्याचे सरकार आत्ममग्न असल्याने ‘व्होकल फॉर लोकल’चे तुणतुणे वाजवत आहे.

यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी ‘टिप्स’नाही तर कठोर परिश्रम, सखोल विश्लेषण, बाजारपेठेचा कल समजणे आवश्यक असते. देशातील मुद्रा बाजारात विपुल रोकडसुलभता आणि निच्चांकी व्याज दर असतांना रुपया वधाणार नाही. गुंतवणुकीत परतावा हा दृश्य असतो तर पोर्टफोलीओतील जोखीम ही अदृश्य असते. यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी बाजाराप्रती नम्रता आवश्यक असते. अनेक यशस्वी गुंतवणूकदार समभाग निवडीच्या पद्धतीविषयी बढाया मारत नाही. समभाग गुंतवणुकीतील भविष्यातील अनिश्चितेमुळे त्यांची विद्यमान रणनीती भविष्यात अयशस्वी ठरू शकेल याची त्यांना पूर्ण जाणीव असते. आजची शिफारस बायडन प्रशासनाच्या अपेक्षित धोरणांवर आधारित आहे. या अंदाजाला वर उल्लेख केलेल्या आधार बिंदूंचा भक्कम पुरावा आहे. महामारीपश्चात जग एका संक्रमणातून जात आहे.  १० ते १५ टक्के गुंतवणूक २७ एप्रिलची शिफारस असलेल्या ‘पीजीआयएम ग्लोबल इक्विटी ऑपोर्च्यूनीटीज फंड’ आणि आजची शिफारस असलेल्या पीजीआयएम इंडिया इमर्जिंग मार्केट्स इक्विटी ऑपोर्च्यूनीटीज फंडात गुंतवणूक करण्याची रणनीती गरजेची वाटते.

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top