अर्थ वल्लभ

ग्रोथ की  व्हॅल्यु Mutual Fund Strategy for 2023

09 May 2022 • 1 min read

ग्रोथ की व्हॅल्यु (Mutual Fund Strategy for 2023)

Mutual Fund Strategy for 2023

समभाग गुंतवणुकीत ग्रोथ आणि व्हॅल्यु  या दोन मूलभूत गुंतवणूक पद्धती आहेत. ‘ग्रोथ’ पद्धतीत गुंतवणूकदार अशा कंपन्यांचा शोध घेतात ज्या उत्सर्जनात (अर्निंग) सातत्याने  वाढ होत असते. तर व्हॅल्यु गुंतवणूकदार अशा कंपन्यांच्या शोधात असतात ज्यांचे मूल्य (बाजार भाव नव्हे) गुंतवणूक पातळीवर आहे. या दोन्ही शैली एकमेकांना पूरक असल्यामुळे, सर्वसाधारणपणे त्यांचा एकत्र  वापर होतांना दिसतो. या शैली पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यात मदत करतात.  ढोबळमानाने मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंड हे ‘ग्रोथ’ पद्धतीचे प्रतिनिधित्व करतात तर लार्जकॅप आणि व्हॅल्यू फंड हे व्हॅल्यू रणनीतीची उदाहरणे आहेत. विस्तृत बाजार मुल्यांकनापेक्षा कमी मुल्यांकन असलेल्या कंपन्यांचा शोध घेत निधी व्यवस्थापक गुंतवणूक करतात. अनेकदा कंपन्यांच्या उत्सर्जनात अपेक्षित वृद्धी न दिसणे, नकारात्मक प्रसिद्धी किंवा कायदेशीर समस्या, या व अशा  अनेक कारणांनी कंपनीच्या नजीकच्या काळातील उसर्जनाबाबत शंका निर्माण होऊन बाजार भावात झालेली घसरण  झाल्याने ‘ग्रोथ स्टॉक’चे परिवर्तन ‘व्हॅल्यू स्टॉक’मध्ये होते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या कोरोनाच्या सुरवातीच्या काळात ‘व्हॅल्यू स्टॉक’ होत्या. कोरोन ऐन भरात असतांना त्यांच्या मूल्यांत झालेल्या वाढीमुळे त्या कंपन्या ‘ग्रोथ स्टॉक’ झाल्या. आणि अलीकडच्या घसरणीने पुन्हा ‘व्हॅल्यू स्टॉक’ झालेल्या दिसत आहेत.  सतत उतर्जानात वाढ झाल्याने कंपन्यांचे बाजार भावात पराकोटीची वाढ होते. एखाद्या तिमाहीत समाधानकारक वाढ न झाल्याने बाजार भावात घसरण संभवते. व्यापक बाजारपेठ अस्थिर असतांना ग्रोथ स्टॉक विकत घेण्यात  धोका असतो. कंपनीबद्दलच्या एखादी नकारात्मक बातमी कंपनीच्या बाजारभावात मोठ्या घसरणीला कारण ठरू शकते.  

नवीन आर्थिक वर्ष सुरु होतांना निफ्टीने १८००० चा टप्पा ओलांडला. ही तेजी जेमतेम आठवडाभर टिकली नसली तरी, कंपन्यांच्या भविष्यातील उत्सर्जनाबाबत गुंतवणूकदारांना  खात्री वाटत नसल्याने विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. सहाजिकच निर्देशांकांचा ‘पीई’ वरच्या पातळीवर असल्याने नव्याने गुंतवणूक करण्याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. सातत्याने मागील दोन वर्षांत, एमएससीआय ग्रोथ निर्देशांकाने आर्थिक वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये अनुक्रमे ९० टक्के आणि १६ टक्के नफा मिळवून दिला आहे.  एमएससीआय व्हॅल्यू निर्देशांकाने आर्थिक वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये अनुक्रमे ५६ टक्के आणि १७ टक्के नफा मिळवून दिला आहे.  एमएससीआय ग्रोथ निर्देशांक रोज नवीन उच्चांक गाठत असतांना गुंतवणूकदरांनी आर्थिक वर्ष २०२३ साठी कोणत्या रणनीतीचा अवलंब करावा, ‘ग्रोथ’ की ‘व्हॅल्यू ?

समष्टी अर्थशास्त्राचा विचार केल्यास जगभरात महागाई आणि व्याजदर दोन्ही वाढत असल्याने रोख्यांवरील परतावा वाढेल. गेल्या दशकात, रोखे गुंतवणुकीवरील उत्पन्न आणि ‘व्हॅल्यू इंव्हेस्टिंग’मध्ये सकारात्मक सहसंबंध दिसून आला आहे. ज्या ज्यावेळी केंद्र सरकारच्या १० वर्षांच्या उत्पन्नात (यील्ड) वाढ झाली आहे, त्या काळात एमएससीआय व्हॅल्यू निर्देशांकाने एमएससीआय ग्रोथ निर्देशांका सापेक्ष सरस कामगिरी केली आहे. तसेच १० वर्षाच्या रोखे उत्पन्नाच्या घसरण झाली तेव्हा च्या काळात, एमएससीआय व्हॅल्यू निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरलेला दिसून आला. पुढे, सध्याच्या समष्टी अर्थशास्त्राचे (मॅक्रो इकोनोमिक्स) चलन भविष्यात महागाई आणि व्याज दोन्ही वाढल्याने पुरवठा साखळीत व्यत्यय, त्यामुळे संभाव्य मागणीतील घट यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर अशंत: परिणाम होऊन कंपन्यांच्या उत्सर्जन वाढीला खीळ बसेल. कोरोन पश्चात मजबूत पुनर्प्राप्तीची अपेक्षा होती. त्यामुळे उत्सर्जनातील वाढीचा अंदाज घेत कंपन्यांची  भाववाढ गृहीत धरण्यात आली होती. या भाववाढीची परिपूर्ती झाल्याने आणि वाढत्या महागाई मुळे उत्सर्जनाला खिळ बसल्याने कंपन्यांच्या भावात घसरण संभवते. ‘स्टॉक प्राईसेस आर स्लेव्ज ऑफ अर्निंग’ अशी सुवचन आहे. त्यामुळे  ग्रोथ कडून व्हॅल्युकडे संक्रमित होण्याची हीच वेळ आहे.

भारतीय गुंतवणूकदरांसाठी व्हॅल्यु इंव्हेटिंगचा अवलंब करणारे १६ फंड उपलब्ध आहेत या पैकी चार फंडांची शिफारस करीत आहे.

Value funds for 2023

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top