तृप्तीचें धन घनांत बघुनी मन निवाले……
कोष्टक क्रमांक १ फंडाचे पोर्टफ़ोलिओ विवरण
*पोर्टफ़ोलिओ ३१ ऑक्टोबर २०२५
| आघाडीची उद्योग क्षेत्रे | टक्केवारी | आघाडीच्या गुंतवणुका | टक्केवारी |
| आर्थिक सेवा | २९.०७ | डिव्हीज लॅब | ३.१७ |
| आरोग्य निगा | १५.६६ | आयसीआयसीआय बँक | ३.१२ |
| भांडवली वस्तू | १०.५३ | ग्लेनमार्क | ३.०९ |
| वाहन निर्मिती आणि पूरक उत्पादने | ६.८९ | इंडस टॉवर्स | २.७ |
| माहिती तंत्रज्ञान | ५.६६ | फोर्टिस हेल्थकेअर | २.४८ |
| ग्राहकोपोयोगी वस्तू | ४.३१ | अल्ट्राटेक सिमेंट | २.४७ |
| ग्राहक सेवा | ३.९८ | एंजल वन | २.४६ |
| दळणवळण | ३.७ | पॉलीकॅब इंडिया | २.४६ |
| तेल आणि नैर्सगिक वायू | ३.२२ | स्टेटबँक | २.४१ |
| स्थावर मालमत्ता विकास | २.१९ | जेएसडब्लू स्टील | २.३९ |
फंडाची कामगिरी
विशाल जाजू आणि फातिमा पाचा हे महिंद्रा मनूलाईफ मल्टीकॅप फंडाचे नियुक्त निधी व्यवस्थापक आहेत. हा फंड एक वैविध्यपूर्ण, मानदंड -जागरूक दृष्टिकोन अवलंबतो ज्या उद्योगांमध्ये वाढ होण्याची संधी अधिक आहे त्या उद्योगातील कंपन्यांत मानदंड सापेक्ष जास्त गुंतवणूक करणारा फंड आहे. ज्या उद्योगात मिडकॅप मध्ये संधी उपलब्ध आहेत,(उदाहरणार्थ वाहन पूरक उद्योग, वित्तीय सेवा) त्या उद्योगात मिडकॅप कंपन्यात गुंतवणूक करतो. गेल्या काही वर्षांपासून, आणि विशेषत: आर्थिक वर्ष २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीपासून या फंडाची कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्यामुळे हा फंड मल्टीकॅप फंड गटात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांपैकी एक फंड आहे. जर गेल्या पाच वर्षांत (नोव्हेंबर २०२० –ऑक्टोबर २०२५) या कालावधीतील तीन वर्षांची चलतसरासरीचा आढावा घेतला असता, महिंद्रा मॅन्युलाइफ मल्टीकॅपने सरासरी २१.१८ टक्के दिला आहे. ही कामगिरी या फंडगटात दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी आहे. या कालावधीत या फंडाची चलत सरासरी ६१ टक्के वेळा २० टक्क्यांहून अधिक आहे.
याच कालावधीतील ‘पॉइंट-टू-पॉइंट’ तपासले असता, महिंद्रा मॅन्युलाइफ मल्टीकॅपने गेल्या पाच वर्षांत (ऑक्टोबर २०२५ पर्यंत) फंडाने वार्षिक १८.७ टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एक वर्ष हे भांडवली बाजारासाठी सर्वात अस्थिर वर्ष समजले जाईल. अस्थिरतेच फंडाची खरी कसोटी लागते. म्युच्युअल फंडांमध्ये, अपसाइड कॅप्चर रेशो निर्देशांकाच्या तुलनेत फंडाची कामगिरी मोजतो. निर्देशांकाच्या तुलनेत घसरत्या बाजारपेठांमध्ये फंडाची कामगिरी मोजण्यासाठी डाउनसाइड कॅप्चर रेशो वापरला जातो. महिंद्रा मॅन्युलाइफ मल्टीकॅपचा अपसाइड कॅप्चर रेशो ११२ आहे, जो दर्शवितो की तो तेजीच्या बाजारपेठेतील बेंचमार्कपेक्षा खूपच जास्त वाढतो. या फंडाचा डाउनसाइड कॅप्चर रेशो ९८.३ आहे, याचा अर्थ असा की घसरत्या बाजारपेठेतील मानदंड सापेक्ष कमी घसरतो. सर्वसाधारणपणे, गेल्या पाच वर्षांपासून हा फंड टॉप किंवा अप्पर मिडल क्वार्टाइल मध्ये आहे.
फंडाचा पोर्टफोलीओ
अलीकडे फंडाच्या गुंतवणुकीत लार्जकॅपचे प्रमाण कमी होऊन मिडकॅप आणि स्मॉलकॅपचे प्रमाण वाढले आहे. अलीकडे कंपन्यांचे पुनर्वर्गीकरण झाल्यामुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅपचे प्रमाण पूर्वी राखले जात होते त्यापेक्षा जास्त झाले आहे, हे केवळ पुनर्वर्गीकरणामुळे झालेले बदल आहेत आणि पोर्टफोलिओमध्ये मिड/स्मॉलकॅपचे प्रमाण वाढवण्याचा निधी व्यवस्थापकांचा अजिबात प्रयत्न नाही. भविष्यात हे वाढलेले मिडकॅप स्मॉलकॅपचे प्रमाण कमी होईल. महिंद्रा मॅन्युलाइफ मल्टीकॅप पोर्टफोलिओवरून असा निष्कर्ष काढता येतो की, निधी व्यवस्थापक दीर्घकालीन उच्च आर्थिक वृद्धीदर राखणाऱ्या उद्योग क्षेत्रांवर मानदंड सापेक्ष अधिक गुंतवणूक करतात. निधी व्यवस्थापकांचा ओढा आवर्ती (सायकलीकल) उद्योग क्षेत्रांकडे अधिक आहे. वित्तीय सेवा आणि भांडवली वस्तू ही दोन क्षेत्रे फंडाच्या गुंतवणुकीत गेली पाच वर्षे आघाडीची गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे आहेत. कोविड-१९ नंतर फंडाने आरोग्यनिगा क्षेत्रात अतिरिक्त गुंतवणूक केली नाही. २०२० आणि २०२१ मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आघाडीची गुंतवणूक असलेले उद्योग क्षेत्र होते. अमेरिकेत व्याजदरवाढू लागल्यावर २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीपासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक सातत्याने कामी केली आहे. आयटी कंपन्यातील मोठ्या घसरणी आधी गुंतवणूक कमी करण्यास सुरवात केली होती. आयटी क्षेत्राने तळ गाठला असे वाटून निधी व्यवस्थापक सध्या गुंतवणूक वाढवित आहेत. तेल आणि वायू उद्योग क्षेत्र निधी व्यवस्थापाकांचे पसंतीचे उद्योग क्षेत्र आहे. फंडाची शैली व्हॅल्यू आणि ग्रोथ यांचे सुयोग्य मिश्रण असलेली आहे. महिंद्रा मॅन्युलाइफ मल्टीकॅप फंडाची गुंतवणूक माफक वैविध्य राखणारी आहे. आघाडीच्या ३ कंपन्या वगळता अन्य कंपन्या ३ टक्यांपेक्षा कमी आहेत. अशा प्रकारे, फंड जोखीम संतुलित करण्याचा प्रयत्न करतांना दिसतो. मल्टी-कॅप फंड असल्याने या फंडात लार्जकॅप मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचे सुयोग्य संतुलन दिसते. लार्ज-कॅप कंपन्यांचे पोर्टफोलिओमध्ये प्रमाण ४३-४५ टक्के असून मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्या प्रत्येकी २५ ते २९ टक्क्यांदरम्यान असतात. सध्या बाजार सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श करून खाली घसरला असण्याने गुंतवणूकदार ७-९ वर्षांच्या एक रक्कमी गुंतवणूक कालावधीसाठी फंडाचा विचार करू शकतात. तर पाच वर्षांच्या कालावधीत फंडातील सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) गुंतवणुकीने २०.२ टक्के वार्षिक परतावा दिला असून या फंड गटातील हा एक सर्वोत्तम परतावा आहे. म्हणून या फंडाची शिफारस मुखत्वे पद्धतशीर गुंतवणूकदारांसाठी (एसआयपी) गुंतवणुकीसाठी करण्यात येत आहे.
तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:
Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.