अर्थ वल्लभ

महिंद्रा मनूलाईफ अग्रेसिव्ह हायब्रीड फंड एक चांगला पर्याय का आहे?

04 Apr 2026 • 1 min read

महिंद्रा मनूलाईफ अग्रेसिव्ह हायब्रीड फंड एक चांगला पर्याय का आहे?

सध्याच्या युद्धजन्य वातावरणात ॲग्रेसिव्ह हायब्रीड फंड दोन प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय आहे. पहिल्या प्रकारचे गुंतवणूकदार ज्यांनी नव्याने गुंतवणूकीला सुरवात केली आहे, आणि दुसऱ्या प्रकारचे गुंतवणूकदार ज्यांना निवृत्त होण्यास अद्याप एक दोन वर्ष शिल्लाक आहेत आणि निवृत्ती पश्चात जे आपला पोर्टफोलिओ जास्त जोखमीच्या गुंतवणुका टाळून अधिक सुरक्षित पर्यायांकडे वळवू इच्छितात. जर तुम्ही म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या जगात नवीन असाल, तर समभाग गुंतवणूक करणे आव्हानात्मक वाटू शकते. उच्च परताव्याचे आकर्षण टाळता येत नाही आणि अस्थिरता सहन होत नाही. त्यामुळे असा चुकीचा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो की तुम्ही गुगलच्या मदतीने तुमची गुंतवणूक व्यवस्थापित करू शकता. याचा अर्थ असा नाही की नवीन गुंतवणूकदारांनी समभाग गुंत्वानुकीपासून दूर रहावे, परंतु सावधगिरीने आणि आपल्या जोखीम साहिष्णूतेच्या क्षमतेबद्दल जागरूक राहून पाऊल उचलल्यास असे प्रसंग टाळता येतात, जिथे तुम्ही योग्य वेळी योग्य प्रकारे कृती करू न शकल्यामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होते. भांडवली बाजारातील चढघट अत्यंत संवेदनशील असते, आणि अनुभवी गुंतवणूकदारसुद्धा प्रत्येक वेळी बाजाराचा अचूक अंदाज लावू शकत नाहीत. जर तुम्ही अजूनही गुंतवणुकीचे व्यवस्थापन कसे करायचे हे शिकत असाल, तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हायब्रीड फंडांपासून सुरुवात करणे हा एक शहाणपणाचा दृष्टिकोन असू शकतो आणि त्यासाठी एक मार्ग म्हणजे ॲग्रेसिव्ह हायब्रीड फंडांमध्ये गुंतवणूक करणे. हे फंड अनुभवी तसेच नवशिक्या गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.
ॲग्रेसिव्ह हायब्रीड फंड प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या फंडांपैकी एक म्हणजे महिंद्रा मनूलाईफ अॅग्रेसिव्ह हायब्रीड फंड . फंडाने स्थापनेपासून म्हणजे २३ जुलै २०१९पासून वार्षिक १४.५८ टक्के दराने परतावा दिला आहे. सेबीच्या ॲग्रेसिव्ह हायब्रीड फंडांसाठीच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून एकूण मालमत्तेपैकी ६५ ते ८० टक्के समभाग गुंतवणूक आणि उर्वरित भाग रोख्यांत गुंतविला जातो. समभाग आणि रोखे यांचे वाटप समष्टी अर्थशास्त्राच्या निर्देशानानुसार सुनिश्चित होते. गेल्या पाच वर्षांत, बाजाराच्या परिस्थितीनुसार समभाग गुंतवणूक ६३ ते ७२ टक्क्यांच्या दरम्यान राहिली आहे.
समभाग रणनीती फंडाने सुरवातीला म्हणजे २०१९ आणि २०२० मध्ये या फंडाने टेलिकॉम, विद्युत निर्मिती, धातू आणि खनिकर्म, तेल आणि वायू आणि अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय गुंतवणूक केली होती. सध्या फंडाच्या गुंतवणुकीत बँका आणि गैर बँकिंग वित्तीय कंपन्या मिळून ३३ टक्के गुंतवणूक आहे त्याखालोखाल माहिती तंत्रज्ञान, (७.३१ टक्के) ग्राहकउपयोगी वस्तू (६.१९ टक्के) टेल आणि वायू (५.९३ टक्के) स्थावर मालमत्ता (४.४७ टक्के) या आघाडीच्या गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे आहेत. या गुंतवणुकींनी गेल्या काही वर्षांत फंडाला स्थैर्य आणि परताव्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. सध्या, हा फंड ऊर्जा, दूरसंचार, आरोग्यनिगा आणि बँकिंग यांसारख्या क्षेत्रांकडे अधिक झुकलेला आहे, तर आयटी आणि एफएमसीजीमध्ये त्याची गुंतवणूक मानदंड सापेक्ष कमी आहे. स्मॉल-कॅप विभागात, फंड व्यवस्थापक बॉटम-अप रणनीती वापरून कंपन्यांची निवडक करतात स्मॉलकॅप विभागात प्रामुख्याने आदरातिथ्य आणि बांधकाम क्षेत्रातील कंपन्या आहेत. या फंडाच्या पोर्टफोलीओत लार्ज-कॅप (५८.६० टक्के) मिड-कॅप (१६.२३ टक्के) स्मॉल-कॅप (२.४७ टक्के) आणि उर्वरित गुंतवणूक रोकड सदृश्य(२३.२५टक्के ) आहे.

समभाग रणनीती
फंडाने सुरवातीला म्हणजे २०१९ आणि २०२० मध्ये या फंडाने टेलिकॉम, विद्युत निर्मिती, धातू आणि खनिकर्म, तेल आणि वायू आणि अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय गुंतवणूक केली होती. सध्या फंडाच्या गुंतवणुकीत बँका आणि गैर बँकिंग वित्तीय कंपन्या मिळून ३३ टक्के गुंतवणूक आहे त्याखालोखाल माहिती तंत्रज्ञान, (७.३१ टक्के) ग्राहकउपयोगी वस्तू (६.१९ टक्के) टेल आणि वायू (५.९३ टक्के) स्थावर मालमत्ता (४.४७ टक्के) या आघाडीच्या गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे आहेत. या गुंतवणुकींनी गेल्या काही वर्षांत फंडाला स्थैर्य आणि परताव्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. सध्या, हा फंड ऊर्जा, दूरसंचार, आरोग्यनिगा आणि बँकिंग यांसारख्या क्षेत्रांकडे अधिक झुकलेला आहे, तर आयटी आणि एफएमसीजीमध्ये त्याची गुंतवणूक मानदंड सापेक्ष कमी आहे. स्मॉल-कॅप विभागात, फंड व्यवस्थापक बॉटम-अप रणनीती वापरून कंपन्यांची निवडक करतात स्मॉलकॅप विभागात प्रामुख्याने आदरातिथ्य आणि बांधकाम क्षेत्रातील कंपन्या आहेत. या फंडाच्या पोर्टफोलीओत लार्ज-कॅप (५८.६० टक्के) मिड-कॅप (१६.२३ टक्के) स्मॉल-कॅप (२.४७ टक्के) आणि उर्वरित गुंतवणूक रोकड सदृश्य(२३.२५टक्के ) आहे.

रोखे गुंतवणूकरणनीती
रोखे गुंतवणुकीत किमान २० टक्के गुंतवणूक कायम ठेवण्याच्या आपल्या उद्दिष्टानुसार, हा फंड आपल्या रोखे गुंतवणुकीचे सक्रियपणे व्यवस्थापन करतो. हा फंडअल्पकालीन आणि दीर्घकालीन मुदत असलेल्या रोख्यांमध्ये समतोल राखतो आणि व्याजदराच्या संभाव्य बदलांवर आधारित ‘अक्रूअल’ व ‘ड्युरेशन’ या धोरणांमध्ये गतिमान बदल करतो. व्याजदर वाढत असतानाच्या परिस्थितीत, हा फंड ‘ट्रिपल ए’पेक्षा कमी पत असलेल्या रोख्यांमध्ये गुंतवणूक वाढवून अधिक परतावा मिळवितो हे रोखे आकर्षक व्याजदरावर उपलब्ध असतात. व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा असते, तेव्हा हा फंड ‘ड्युरेशन’मधील लाभांचा फायदा घेण्यासाठी सरकारी रोख्यांमधील गुंतवणूक वाढवतो.

फंडाची १ एप्रिल २०२०ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत महिंद्रा मनूलाईफ अॅग्रेसिव्ह हायब्रीड फंडाची कामगिरी लक्षणीय राहिली आहे. फंडाने वार्षिक १८.७३ टक्के दराने वार्षिक परतावा दिला आहे. याचे श्रेय त्याच्या ‘मूल्य-जागरूक गुंतवणुकी’ला आणि ‘आवर्तानाशी सहसबंध न राखणाऱ्या उद्योगात केलेल्या गुंतवणुकीला द्यावे लागेल. गेल्या सात वर्षांतील बहुतांश तिमाहीत फंड गटातील अन्य फंडांच्या तुलनेत या फंडाने ‘टॉप’ किंवा ‘अप्पर मिडल क्वारटाइल’ मध्ये स्थान अबाधित राखले आहे. विशेष म्हणजे, या कालावधीतील ७८ टक्के वेळा ३ वर्षाचा ‘रोलिंग रिटर्न या फंड गट सरासरीपेक्षा अधिक आहे. गेल्या ५ वर्षांतील( १एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२६) ३ वर्षाच्या रोलिंग रिटर्नची आकडेवारी खाली दिली आहे.
एसआयपी आणि एकरकमी गुंतवणुकीचे पर्याय तुमच्या आर्थिक गरजा आणि क्षमतेनुसार, तुम्ही ॲग्रेसिव्ह हायब्रीड फंडांमध्ये गुंतवणूक करताना एकरकमी गुंतवणूक करू शकता किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा मार्ग निवडू शकता. एसआयपी पद्धतीमुळे जर तुमच्याकडे एकाच वेळी मोठी रक्कम नसेल, तर नियमित अंतराने कमी रकमेची गुंतवणूक करणे सोपे होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अस्थिरतेत रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा फायदा घेता येतो. ॲग्रेसिव्ह हायब्रीड फंडांचा एक प्रमुख फायदा, विशेषतः नवशिक्या गुंतवणूकदारांसाठी, हा आहे की मालमत्ता वाटप विहित मर्यादेत ठेवण्यासाठी फंड व्यवस्थापकांकडून वेळोवेळी कठोर पुनर्संतुलन केले जाते. सध्याच्या सेबीच्या नियमांनुसार या म्युच्युअल फंडांना किमान २०% रोखे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यामुळे बाजाराच्या अस्थिरतेचा सर्वात कमी परिणाम होतो. सर्व ॲग्रेसिव्ह हायब्रीड फंड आपअपल्या परीने वेगळे आहेत. गुंतवणूकदारांनी “या वस्त्रांते विणीते कोण ? एक सारखे नसती दोन” असे विचारावे अशी परिस्थिती आहे. सध्याच्या अस्थिरतेच्या वातावरणात नवीन एक रक्कमी किंवा एसआयपी पद्धतीने गुंतवणुकसाठी या इतरांपेक्षा वेगळा असणाऱ्या या फंडाची शिफारस करीत आहे.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top