एलआयसी एमएफ टेक्नॉलॉजी फंड
या महिन्याच्या सुरुवातीला निफ्टी आयटी निर्देशांक १० महिन्यांच्या निच्चांकावर पोहचला आहे. या क्षेत्रातील कंपन्या मोठ्या विक्रीला बळी पडत आहे. गुंतवणूकदारांना भीती आहे की अँथ्रोपिकच्या क्लॉडसारखे नवीन एआय टूल्स. इन्फोसिस आणि टीसीएस सारख्या कंपन्यांच्या पारंपारिक आउटसोर्सिंग मधून मिळणाऱ्या महसुलात अडथळा ठरू शकतील. असे असले तरी, गुंतवणूकदार आणि कंपन्यांसाठी एआय हा एक आकर्षणाचा विषय आहे,
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (युयेयडीएआय)ने वितरीत केलेल्या ‘आधार’मुळे ‘डिजिटल ओळख; पटवणे सहज शक्य झाले असून बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक डेटानुसार ही एक अद्वितीय डिजिटल ओळख पद्धती आहे, डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी डिजिटल ओळख हा महत्वाचा पाया आहे. मूलभूत पायाभूत सुविधांच्या उपलब्धते मुळे विशेषतः ग्रामीण भागात इंटरनेट आणि ब्रॉडबँड पोहचल्याने डेटा खर्चात मोठी घट झाली आहे. तसेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय) डिजिटल पेमेंटचा आधारस्तंभ बनला आहे, अब्जावधी व्यवहार युपीआयच्या माध्यमातून होत आहेत. डेटा एक्सचेंज आणि डेटा स्टोरेज हा डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचा घटक आहे. डिजीलॉकर नागरिकांना सत्यापित डिजिटल कागदपत्रे संग्रहित आणि सामायिक करण्याची सोय उपलब्ध करून देत असल्याने डेटा शेअरिंगसाठी एक सुरक्षित मंच उपलब्ध झाला आहे. याचा परिणाम जगभरातील रिअल-टाइम पेमेंट व्यवहारांपैकी सर्वाधिक व्यवहार भारतात होतात. गेल्या दशकात, भारतात एक मोठे डिजिटल संक्रमण झाले असून हा बदल आता एका व्यापक परिवर्तनात रूपांतरित झाला आहे. या डिजिटल क्रांतीमुळे भारत डिजिटल पायाभूत सुविधा आणि कोट्यावधी वापरकर्त्यांमुळे जागतिक पातळीवर आघाडी घेण्यास सज्ज आहे. भारतीयांचा सरासरी स्क्रीन टाईम, ६ तास ४५ मिनिटे आहे. हा जगातील उच्चांकी स्क्रीन टाईम आहे. ज्यामध्ये ई-कॉमर्स वेबसाइट्स, युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक सारखी समाजमाध्यमे आणि अॅमेझोन, फ्लिपकार्ट सारखे ऑनलाइन विक्री मंचासह इतर ठिकाणी सर्वाधिक ट्रॅफिक असतो. हा भारतीयांचा डिजिटल वावर वाढत असल्याचे द्योतक आहे. खर्चाचा मोठा हिस्सा ऑनलाइन द्वारा खर्च होत असल्याचे दिसत आहे. तरुण पिढी डिजिटल अॅप्स वापरात खूप पारंगत आहे. हा कल भारतातील स्थानिक डिजिटल व्यवसायांच्या (स्थानिक न्यूज चॅनेल, रील बनविणारे स्थानिक इंफ्लूअंसर) वाढीस मोठी बळकटी देत असल्याचे दिसते आज रीलस्टार यांना जे वलय प्राप्त झाले आहे ते डिजिटल अर्थव्यवस्थेमुळे. समाज माध्यामांच्यामुळे अनेकांचे कौशल्य त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. नवी दिल्लीत ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’, १९-२० फेब्रुवारी रोजी भारत सरकारने आयोजित केला होता. हा भारतात झालेला पहिलाच एआय समिट होता. जागतिक सहकार्यातून प्रभावी आणि कृतीशील एआयचा वापर करण्यासाठी भारताला जागतिक स्तरावर एआय वापरकर्ता म्हणून उदयास आला आहे. या फंडाच्या एनएफओ कालावधीत, किमान गुंतवणूक ₹ १,००० आहे. ‘एसआयपी’साठी, किमान दैनिक गुंतवणूक ₹१००, मासिक एसआयपी ₹२०० आणि तिमाही एसआयपी ₹१,००० आहे. गुंतवणूकदारांना तंत्रज्ञानाच्या बदलत्या क्षितिजाचा लाभ घेण्यासाठी एलआयसी एमएफ टेक्नॉलॉजी फंड उपलब्ध करून दिला आहे. सेक्टरल फंड असल्याने जोखीमांक विचारात घेऊन आपल्या म्युच्युअल फंड वितरकाच्या सल्ल्याने गुंतवणूक करण्याचा अथवा टाळण्याचा निर्णय घ्यावा.
तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:
Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.