अर्थ वल्लभ

कम्प्युटरजी ‘लॉक’ किया जाय

17 Jun 2024 • 1 min read

कम्प्युटरजी ‘लॉक’ किया जाय

एक उत्कृष्ट पोर्टफ़ोलिओ तयार करण्यासाठी, आणि पराताव्यातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी, गुंतवणुकीला शिस्त आणि संयम आवश्यक आहे. गुंतवणूकदरांचा कल हा मालमत्ता विभाजनपेक्षा गुंतवणुकीसाठी फंड निवडण्याकडे असतो. निर्देशांक रोज नवीन नवीन शिखरे पादाक्रांत करीत असतांना वाचकांना काही सल्ला देण्याचा मोह होत आहे. लिक्विड फंड किंवा ओव्हरनाइट फंडात गुंतवलेले पैसे कधीही गमवावे लागणार नाहीत. तर फ्लोटिंग रेट, अल्ट्रा-शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि डायनॅमिक बाँड फंड कॉर्पोरेट बॉंड फंड यांसारख्या इतर डेट फंडांमध्येही तात्पुरते पैसे गमावण्याची थोडीफार शक्यता असते. डेटफंड हे मुद्दल राखण्याचे आणि अल्प परतावा मिळविण्याचे साधन आहे. सगळ्याच वयोगटात गुंतवणुकदाराचे उद्दिष्ट मोठी जोखीम घेऊन मोठा परतावा कमवणे हे नसते, तर आजपर्यंत तुम्ही जे कमावलेत ते राखून ठेवणे हे देखील असते. हे गुंतवणुकीला एक प्रकारचे सुरक्षा कवच पुरविण्याचे काम डेट फंड करीत असतात. वाढत्या महागाईमुळे संपत्तीचे मूल्य डेट फंडात कमी होऊ शकते परंतु किमान भांडवल गमाविण्यापासून डेट फंड सुरक्षित असतात. अधिक वृद्धीदर असणाऱ्या समभागासारख्या मालमत्तेची गरज आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात नसते.
डेट म्युच्युअल फंड हे सक्रियपणे व्यवस्थापित केलेले फंड आहेत जे कॉर्पोरेट बाँड, नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (एनसीडी), सरकारी रोखे (जी-सेक), राज्य विकास कर्ज (एसडीएल), ट्रेझरी बिल (टी-बिल) कामार्षिअल पेपर (सीपी) आणि सर्टीफिकेट ऑफ डीपोझीट (सीडी) यांसारख्या विविध साधनांमध्ये गुंतवणूक करतात. डेट फंड हे पोर्टफोलिओमध्ये अस्थिरतेमुळे येणारी जोखीम कमी करण्याचे काम करतात. डायनॅमिक बाँड फंड हे डेट फंडांचा असा प्रकार आहे, जे गुंतवणूक असलेल्या रोख्यांची उर्वरित मुदत लवचीकतेने व्यवस्थापित करता येते. व्याज दर कमी अधिक होण्याच्या शक्यते नुसार कमी अधिक करता येतो. या फान गटाचे प्राथमिक उद्दिष्ट अर्थव्यवस्थेतील व्याजदरांमधील बदलांचा फायदा घेत अधिक परतावा कमविण्याच्या संधी हुंद्कून त्यानुसार गुंतवणूक करणे हे असते. फंड व्यवस्थापक प्रचलित व्याजदराच्या ट्रेंडनुसार फंडाच्या पोर्टफोलिओमधील रोख्यांचा कालावधी चतुराईने समायोजित करून हे साध्य करतात. डायनॅमिक बॉण्ड फंडामध्ये विविध प्रकारचे बाँड, मॅच्युरिटी आणि क्रेडिट गुण यांच्यात बाजारातील बदल आणि व्याजदराच्या हालचालींच्या अनुषंगाने संक्रमित करण्याची क्षमता असते. डायनॅमिक बाँड फंड त्यांच्या पोर्टफोलिओचे ड्यूरेषन फंड व्यवस्थापकाच्या व्याजदरांबाबतच्या दृष्टिकोनावर आधारित असतात. या बदलांमुळे हे फंड वेगवेगळ्या व्याजदर आवर्तनांच्या दिशा बदलाला संरेखित करतात. व्याजदर आणि रोख्यांची मुदत यामध्ये व्यस्त सह्सामंध लक्षात घेता व्याजदर कमी होणारच दृष्टीकोन असेल तर दीर्घ मुदतीच्या रोख्यांचे प्रमाण वाढविले जाते आणि व्याजदर वाढणार असतील तर दीर्घ मुदतीचे रोखे विकून अल्प मुदतीचे रोखे खरेदी केले जातात.
किरकोळ महागाई दर सरलेल्या मे महिन्यात किंचित घटून ४.७५ टक्क्यांवर म्हणजेच वर्षभरातील नीचांकी पातळीवर पोहचला आहे. किरकोळ महागाई दराची आकडेवारी बुधवारी जाहीर केली. त्यानुसार, एप्रिल महिन्यात ४.८३ टक्के असलेला किरकोळ महागाई दर घसरण होऊन मे महिन्यात तो ४.७५ टक्क्यांवर आला आहे. दुसऱ्या बाजूला, निर्मिती क्षेत्राची वाढ जूनमध्ये ३.९ टक्क्यांवर सीमित राहिली आहे. घटती महागाई आणि निर्मिती क्षेत्राने अल्प बाध नोंदविणे हे रिझर्व्ह बँकेस व्याजदर कपातीस सबळ कारण ठरण्याची शक्यता आहे. फेडचा व्याज दर कपातीचा निर्णय झाल्यावर ऑक्टोबर किंवा डिसेंबरच्या पत धोरण आढावा बैठकीत रिझर्व्ह बँक व्याज दर कपातीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
सेबीने डेट फंडांची विभागणी एकूण १६ फंड गटात केली आहे. फंड निवडताना, गुंतवणुकीच्या कालावधीचा विचार केला पाहिजे. अगदी कमी कालावधीसाठी, ३ ते ६ महिन्यांपर्यंत, कोणीही लिक्विड किंवा अल्ट्रा-शॉर्ट टर्म फंडांमध्ये गुंतवणूक करता येईल. एक वर्ष आणि त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी शॉर्ट ड्युरेशन तीन ते पाच वर्षांसाठी बँकिंग पीएसयु, कॉर्पोरेट बॉंड फंड तर मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी गिल्ट फंड आणि टेन यिअर कॉस्टंट मॅच्युरीटी फंड योग्य असतात. या पैकी मागील वर्षभरात गिल्ट आणि लॉंग ड्युरेशन फंडांना सर्वाधिक पसंती लाभल्याचे दिसते. मागील एका वर्षात ८.१९ टक्के नफा कमाविणारा आयटीआय डायनॅमिक बॉंड फंड हा या फंड गटात अव्वल रेटिंग असणारा एक फंड आहे. व्हॅल्यु रिसर्चने या फंडाला फोरस्टार रेटिंग दिले आहे. (मॉर्निंग स्टारने अद्याप रेटिंग केलेले नाही, मॉर्निंगस्टार तीन वर्षे पूर्ण झाल्यावर रेटिंग करते) किसील डायनॅमिक बाँड फंड एएलएलएल हा फंडाचा निर्देशांक आहे. फंड स्थापनेपासून म्हणजे १४ जुलै २०२१ पासून विक्रांत मेहता हे या फंडाचे व्यवस्थापन करत आहेत. स्थापनेपासून हा फंड निर्देशांक सापेक्ष चांगली कामगिरी करीत आहे. विक्रांत मेहता व्यवस्थापित करीत असलेल्या आयटीआय बँकिंग पीएसयु डेट फंडाला सुद्धा व्हॅल्यु रिसर्चने फोर स्टार रेटिंग दिले आहे. डेट फंडाच्या एकूण परताव्यापैकी ८५ टक्के परतावा फंडाची गुंतवणूक असलेल्या रोखे गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजातून तर उर्वरित मार्क-टू-मार्केट नफ्यातून येते. कर्ज आणि मनी मार्केट साधनांचा समावेश असलेल्या पोर्टफोलिओचे सक्रियपणे व्यवस्थापन करून जास्तीत जास्त परतावा मिळवणे हा फंडाचा उद्देश आहे. फंड संरचित धोरणाचा अवलंब करेल जे गुंतवणूकदारांना लवचिक मालमत्ता वाटप आणि सक्रिय कालावधी व्यवस्थापनाद्वारे डायनॅमिक फंड व्यवस्थापनाचा लाभ देते. कमी अस्थिर फंडाच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांच्या गरजा पूर्ण करणारा हा फंड रोखे आणि मनी मार्केट साधने आणि सरकारी रोखे (जी-सेक) मध्ये गुंतवणूक करून स्थिर परतावा कमाविण्यात यशस्वी झाला आहे. जे गुंतवणूकदार ३ ते ५ वर्षे कालावधीत बँकेच्या मुदत ठेवी प्रचलित व्याज दरा पेक्षा १ ते १.५० टक्का अधिक परतावा मिळविणाऱ्या गुंतवणूक साधनांच्या शोधात असतील त्यांच्यासाठी हे उत्कृष्ट साधन आहे. सध्या १८ ते २४ महिन्यांसाठी सर्वाधिक दर बँका डेट आहेत. याचा अर्थ रिझर्व्ह बँकेने व्याजदरकपात केल्या नंतर बँकांच्या मुदत ठेवींचे दर मोठ्या प्रमाणावर कमी होतील. वरच्या व्याजदरात आपली गुंतवणूक लॉक करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top