‘सीआरआर’ कपातीचा लाभार्थी आयसीआयसीआय प्रुडेशियल गिल्ट फंड
फंडाची कामगिरी (वार्षिक परताव्याचा दर)
| कालावधी एसआयपी एक रक्कमी |
| १ वर्षे ५.६२ ७.१६ |
| ५ वर्षे ७.०६ ६.१३ |
| १० वर्षे ७.४० ७.९६ |
| १५ वर्षे ७.९२ ८.०५ |
| २० वर्षे ८.१५ ८.३८ |
| २५ वर्षे ८.२८ ९.२५ |
गिल्ट फंडांमधून भविष्यातील निश्चित परताव्याचा अंदाज बांधता येत नाही. इतर डेट म्युच्युअल फंडाप्रमाणे, गिल्ट फंड दोन स्रोतांमधून परतावा देतात – त्यांच्याकडे असलेल्या जी-सेक (सरकारो रोखे) मिळणारे व्याज आणि त्या व्याजदर, महागाई, करसंकलन, चालू खात्यातील तुट यांचा सरकारी रोख्यांच्या किंमतींवर परिणाम होत असतो. बाजारात प्रचलित उत्पन्नावरून जी-सेकवर मिळणाऱ्या व्याजाचा अंदाज बांधता येत असला तरी पुढील एक किंवा तीन वर्षांत व्याजदर कसे वाढतील किंवा कमी होतील, महागाई वाढेल की कमी होईल, याचा अंदाज लावणे काठीण असते. जर रिझर्व्ह बँकेने रेपोदरात कपात केली तर सरकारी रोखे कमी व्याजदराने विकले जातील. परिणामी जास्त व्याजदराचे रोखे अधिमुल्याने (१०० रुपयांपेक्षा अधिक किंमतीत) विकले जातील. उलट व्याजदर वाढले तर आधीच्या रोख्यांच्या किंमती घसरतील आणि जी-सेकच्या किमती कमी होऊ होऊन जीसेक फंडातील गुंतवणूकदाराला गिल्ट फंडातून नुकसान होऊ शकते. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीची आणि गुंतवणुकीतून बाहेर पडण्याची वेळ साधता आली तर जीसेक फंड (किंवा गिल्ट फंड) हा एक सुरक्षित पर्याय आहे. जानेवारी २०१५ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान, पत धोरण आढावा समितीने त्यांचा रेपो दर ८.५ टक्क्यांवरून ४ टक्के पुन्हा वाढवून ६.५ टक्के पुन्हा कमी करून ५.५ टाक्यांवर आणला आहे. जानेवारी २०१५ ते जून २०२५ दरम्यान व्याजदाराची दोन आवर्तने झाली. या दरम्यान आयसीआयसीआय प्रुडेशियल गिल्ट फंडाने दहा वर्षात ८.०५ टक्के परतावा दिला आहे. कोविड दरम्यान मोठ्या व्याजदर कपातीमुळे त्या वेळी एक वर्षाचा परतावा १२-१३ टक्के होता. परंतु हा परतावा व्याजदरात झालेल्या तीव्र घसरणीमुळे होता. पुढील १, ३ किंवा ५ वर्षांत या हाच परतावा मिळेल याची खात्री देता येत नाही. तेव्हा ज्या वेळी परतावा १२-१३ टक्के होता तेव्हा बाहेर पडणे योग्य होते. सध्या स्टेट बकेच्या ३ ते ५ वर्षे दरम्यान मुदत ठेवीचे दर सामान्य नागरिकांसाठी ६.३० टक्के आहेत. ज्या कोणाला थोडी जोखीम घेऊन या पेक्षा थोडा अधिक (६.५०-६.६५) टक्के परतावा मिळविण्याची इच्छा असेल तर त्यांनी या फंडाचा विचार करावा.
(परताव्याची टक्केवारी ११ सप्टेंबरच्या ‘रेग्युलर ग्रोथच्या एनएव्ही’ नुसार)
तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:
Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.