अर्थ वल्लभ

सशक्त परंतु दुर्लक्षित ….

05 May 2025 • 1 min read

सशक्त परंतु दुर्लक्षित ….

hdfc value fund

सप्टेंबरमध्ये बाजार निर्देशांकांनी नवीन शिखर गाठल्या नंतर घसरणीस सुरवात झाली. या घसरणीत सर्व बाजार भांडवलीकरणातील कंपन्यांत घसरण झाली. या घसरणीमुळे अनेक शेअर्सचे अवास्तव मूल्यांकन झपाट्याने कमी होऊन गुंतवणूक योग्य पातळीवर आल्याचे दिसत आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी, सध्या बाजारात मूल्य खरेदीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. म्युच्युअल फंड गुंतवणूकदार व्हॅल्यु फंडांच्याद्वारे या संधीचा फायदा घेऊ शकतात.एचडीएफसी व्हॅल्यू फंड (जुने नांव – एचडीएफसी कॅपिटल बिल्डर व्हॅल्यू फंड) ही अशीच एक संधी आहे. एचडीएफसी व्हॅल्यू फंड हा व्हॅल्यू फंड गटातील सर्वात जुना फंड आहे १ फेब्रुवारी १९९४ रोजी हा फंड सेंच्युरियन क्वांटम फंड म्हणून अस्तित्वात आला. सेंच्युरियन म्युच्युअल फंडाचे झुरीचने अधिग्रहण केल्यामुळे हा फंड झुरीच इंडिया व्हॅल्यू फंड म्हणून ओळखला जाऊ लागला. झुरीच म्युच्युअल फंडाचे एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे अधिग्रहण केल्या पश्चात हा फंड एचडीएफसी कॅपिटल बिल्डरम्हणून ओळखला जाऊ लागला, फंड सुसूत्रीकरणा पश्चात एचडीएफसीम्युच्युअल फंडाने या फंडाला व्हॅल्यू फंड गटात संक्रमित केले. या फंडाला १५ मार्च २०२५ पासून एचडीएफसी व्हॅल्यू फंड ही ओळख मिळाली. या फंडाने गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत त्याच्या मानदंड सापेक्ष चांगली कामगिरी केली असली तरी व्हॅल्यू फंड गटातील अनेक स्पर्धक फंडांपेक्षा कमी परतावा मिळविला आहे. फंडाची कामगिरी नवीन निधी व्यवस्थापकांच्या व्यवस्थापनाखाली सुधारली असल्याने या फंडाची शिफारस करावीशी वाटली.

आनंद लढ्ढा हे या फंडाचे १ फेब्रुवारी २०२४ पासून नियुक्त निधी व्यवस्थापक आहेत. ‘निफ्टी ५०० टीआरआय’ हा या फंडाचा मानदंड आहे. या फंडाच्या गुंतवणुकीत एकूण मालमत्तेच्या किमान ५० टक्के गुंतवणूक अशा कंपन्यांत करणे सक्तीचे आहे ज्यांचे ‘ट्रेलिंग व्हॅल्यूएशन’ (किंमत-ते-प्रति समभाग कमाई/किंमत-ते-पुस्तक)‘निफ्टी ५०० टीआरआय’मधील कंपन्यांच्या सरासरी मूल्यांकनापेक्षा कमी आहे.सध्याच्या आकडेवारीनुसार फंडाचा पोर्टफोलीओ पीई १८.५ आहे तर मानदंडातील कंपन्यांच्या पीइची सारासारी २४ आहे. या व्यतिरिक्त पोर्टफोलिओ बांधणीसाठी फंडाने ४ मार्गदर्शक तत्त्वे ठरविली आहेत.

(१) वाजवी मुल्यांकन असलेल्या कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश करणे
(२) ‘बॉटम अप’ रणनीतीचा अवलंब
(३) क्षेत्रीय विविधता
(४) जोखीम समायोजित परताव्याची सुसंगती राखणे

एचडीएफसी व्हॅल्यू फंडाच्या कामगिरीचा विचार केल्यास १ फेब्रुवारी १९९४ ते ३० एप्रिल २०२५ या काळात फंडाने १४.३२ टक्के दराने वार्षिक परतावा दिला आहे. मागील पंचवीस वर्षात (१ जानेवारी २००१ ते ३० एप्रिल २०२५) फंडाचा एसआयपी परतावा वार्षिक १७.९९ टक्के दराने दिला आहे. २०१७ ते २०२२ दरम्यान फंडाची कामगिरी सामाधानकारक नव्हती. एचडीएफसी व्हॅल्यू फंड पाच वर्षांच्या कामगिरीच्या तुलनेत आदित्य बिर्ला सन लाईफ प्युअर व्हॅल्यू आणि एचएसबीसी व्हॅल्यू निप्पॉन इंडिया व्हॅल्यू फंडासारख्या स्पर्धक फंडांच्या तुलनेत मागे पडला आहोत. परंतु अलिकडच्या काळात फंडाच्या कामगिरीत सुधारणा होतांना दिसत आहे. एक आणि तीन वर्षांच्या कामगिरीत फंड क्रमवारीत बराच वर आलेला दिसतो.

२०१२च्या मिड-कॅपच्या तेजीपर्यंत फंडाच्या गुंतवणुकीत मिडकॅपची मात्रा कमी होती. परंतु वर्ष २०१२ दरम्यान फंडाने मिडकॅप कंपन्यांची मात्रा ३५ टक्क्यांपर्यंत वाढविली. या वाढीव मिडकॅपच्या जोरावर २०१४ नंतर (सार्वत्रिक निवडणुकांच्या पश्चात) आलेल्या तेजीत फंडाने इतर स्पर्धक फंडांना मागे टाकले. फंडाची कामगिरीतील आघाडी २०१७ पर्यंत टिकली. वर्ष २०१७ ते २०२१ पर्यंत एचडीएफसी व्हॅल्यू फंडाची कामगिरी खालावण्याचा कल सुरूच होता. २०२२ ते २०२५ पुन्हा कामगिरी स्पर्धकांच्या तुलनेत सुधारलेली दिसत आहे. ऑक्टोबर २०२४ पासून सातत्याने फंडाने मानदंड सापेक्ष चांगली कामगिरी केली आहे. आनंद लढ्ढा यांची नेमणूक झाल्यावर बाजाराचा कल ओळखून त्यांनी मिडकॅप स्मॉलकॅप मधील मात्रा वाढविली . फंडाचा पोर्टफोलिओचा ५० टक्के भाग या दरम्यान मिड आणि स्मॉलकॅपने व्यापला होता. ज्या वेगाने मिड आणि स्मॉलकॅपची मात्रा वाढविली त्याच वेगाने मुद्दल सुरक्षिततेसाठी जून २०२४ पासून कमी करण्यास सुरवात केली. सध्या ७० टक्के लार्जकॅप आणि उर्वरित प्रत्येकी १५ टक्के मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांनी व्यापलेला आहे. बाजार मुल्यांकनानुसार कंपन्यांच्या निवडींमध्ये बदल करण्याच्या निधी व्यवस्थापकांच्या धोरणामुळे, फंडाची तीन आणि पाच वर्षांच्या कालावधीची कामगिरी मानदंड सापेक्ष पाऊन ते दीड टक्क्यांनी अधिक आहे. मागील तीन वर्षे कालावधीतील एक वर्षाच्या रोलिंग रिटर्नचा विचार करता बाजारातील उच्च अस्थिरतेमुळे कामगिरी मानदंड सापेक्ष खालावलेली दिसते. परंतु ही अल्पकालीन घसरण चिंतेचे कारण ठरू नये. या काळात बहुतेक सर्धक फंडांची कामगिरी एचडीएफसी व्हॅल्यू फंडापेक्षा खराब झाली आहे. फंडाचा पोर्टफोलिओ वैविध्य साधणारा असून ५० ते ६० कंपन्यांचा समावेश असतो. गेल्या ३१ मार्च २०२५ रोजी एचडीएफसी व्हॅल्यू फंड पोर्टफोलिओमध्ये आयसीआयसीआय बँक (८.१२%), एचडीएफसी बँक लिमिटेड (७.६६%), भारती एअरटेल लिमिटेड (४.८९%) आणि इन्फोसिस लिमिटेड (४.१५%) या आघाडीच्या गुंतवणुका आहेत. या व्यतिरिक्त अ‍ॅक्सिस बँक (४.१३%) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (३.६३%) सारख्या बँकांचा समावेश आहे. बाजारातील अस्थिरता लक्षात घेता, या वर्षी सुरक्षित समजले कंझ्युमर नॉन-ड्युरेबल कंपन्यांतील हिस्सा वाढवला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत नफा कमाविणाऱ्या आणि सुधृढ ताळेबंद असलेल्या कंपन्यांचा समावेश जास्त आहे. अलिकडच्या कालावधीत फंडाने रोकड सुलभ कंपन्यांत गुंतवणूक वाढविली आहे. कमी-तरलता असलेल्या कंपन्या काही काळ अधिक परतावा देऊ शकतात, परंतु मंदीच्या सत्रात या अतरल कंपन्या गुंतवणुकीत राखाल्याची किंमत गुंतवणूकदारांना मोजावी लागते. फंड सर्वच क्षेत्रात मानदंड सापेक्ष अधिक उणे ३ टक्के गुंतवणूक करतो. फंडाने सर्व उद्योग क्षेत्रांमध्ये चांगले वैविध्य राखले आहे. एकंदरीत, हा फंड सरासरीपेक्षा जास्त जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या आणि दीर्घकाळ एसआयपी करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य फंड आहे. दुर्दैवाने या फंडाचे व्हावे तसे मार्केटिंग झाले नाही हा फंड एचडीएफसीच्या लार्जकॅप (जुना टॉप १००) किंवा फ्लेक्झीकॅप सारखा तीस वर्षांहून अधिक कालापासून अस्तित्वात असून देखील या फंडांची मालमत्ता या दोन फंडांच्या तुलनेत अगदीच किरकोळ आहे. एचडीएफसीच्या लार्जकॅप फ्लेक्झीकॅप पेक्षा हा फंड जुना आहे. फंडात १ फेब्रुवारी २०२५ रोजी केलेल्या १० हजाराच्या गुंतवणुकीचे ७.३७ लाख झाले आहेत. या १ फेब्रुवारी १९९४ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत फंडाने १४.०८ टक्के परतावा दिला आहे. याच कालावधीत लार्जकॅपने ११ नोव्हेंबर १९९६ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत १७.८६ टक्के तर फ्लेक्झीकॅपने १ जानेवारी १९९५ ते ३० एप्रिल २०२५५ या कालावधीत १७.८६ टक्के परतावा दिला आहे. हा फंड एचडीएफसीचा सर्वात जुना फंड असून देखील या फंडांची मालमत्ता लार्जकॅप आणि फ्लेक्झीकॅपच्या तुलनेत अगदीच किरकोळ आहे. एचडीएफसीच्या या दोन फंडांना गुंतवणूकदारांचा जसा प्रतिसाद लाभला तसा या फंडास प्रतिसाद लाभला नाही या फंडास हा फंड गेले एकतीस वर्षे नांवा प्रमाणे दीर्घकालीन वित्तीय ध्येयांसाठी संपत्ती निर्मितीतील (‘कॅपिटल बिल्डर’) एक विश्वासू साथीदार आहे हे या निमित्ताने सांगावेसे वाटते.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top