अर्थ वल्लभ

यशाची पुढे दिव्य आशा असे

31 Mar 2025 • 1 min read

यशाची पुढे दिव्य आशा असे

फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप हा लार्जकॅप फंड गटातील युटीआय लार्जकॅप नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जुना फंड आहे. एकेकाळी ‘टॉप क्वार्टाइल’मध्ये असणारा हा फंड सध्याच्या घसरणीमुळे कामगिरी क्रमवारीत खाली घसरला असला तरी मागील ३३ वर्षात (स्थापने पासून १ डिसेंबर १९९३ ते १२ मार्च २०२५) सर्वाधिक वार्षिक १८.०९ टक्के दराने परतावा दिलेला फंड आहे. फ्रँकलिन ब्लूचिप हा लार्जकॅप फंड असल्याने एकूण मालमत्तेपैकी ८० टक्के मालमत्ता लार्जकॅप कंपन्यांत गुंतविणे अनिवार्य आहे. वेंकटेश संजीवी हे ऑक्टोबर २०२१ पासून या फंडाचे नियुक्त निधी व्यवस्थापक आहेत. मुलभूत संशोधनाअंती वाजवी मुल्यांकन असलेल्या आणि सुदृढ ताळेबंद असलेल्या दर्जेदार कंपन्यांत गुंतवणूक करण्याची या फंडाची रणनीती आहे. बाजारातील मोठ्या घसरणी नंतर सर्वात आधी पुनर्प्राप्ती लार्ज-कॅप कंपन्यांत होत असल्याने ‘अॅम्फी आकडेवारी’नुसार जानेवार आणि फेब्रुवारीत चाणाक्ष गुंतवणूकदारांनी सर्वाधिक गुंतवणूक लार्जकॅप फंडात झालेली दिसत आहे. मोठ्या घसरणी नंतर निफ्टी ५० आणि बीएसई १०० मधील लार्ज कॅप, व्यापक बाजारापेक्षा चांगली कामगिरी करण्याचा इतिहास असल्याने लार्जकॅपची कास धरणे योग्य ठरेल.

फंडाची डिसेंबर १९९३ ते फेब्रुवारी २०२५ या काळातील व्यापक कामगिरी काही काळाचा (२००८-२००९, २०१३-२०१४ आणि २०२०-२०२१) अपवाद वगळता चांगली झाली असल्याने गुंतवणूकदाराच्या मुख्य पोर्टफोलिओमध्ये (कोअर पोर्टफोलीओ) समावेश करण्यायोग्य हा फंड आहे. बाजाराची सद्य थिती पाहता गुंतवणूकदारांनी या फंडात पद्धतशीर गुंतवणूक योजना(एसआयपी) करावी. मागील पाच वर्षांमध्ये फ्रँकलिन इंडिया ब्लूचिपमध्ये एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदाराला वार्षिक १२.८९ टक्के दराने तर १० वर्षे एसआयपी करणाऱ्याला वार्षिक ११.२५ टक्के दराने परतावा दिला आहे, अशा लखलखीत कामगिरीमुळे भूतकाळात हा फंड प्रदीर्घकाळ ‘टॉप क्वार्टाइल’मध्ये होता. गेल्या दोन वर्षात फंडाच्या कामगिरीमध्ये (जोखीम समायोजित परतावा) लक्षणीय सुधारणा झाली आहे, फंडाची कामगिरी फंडाला लवकरच गतवैभव प्राप्त करून देईल अशी आशा वाटते. फंडाच्या कामगिरीचा (१ डिसेंबर १९९३ ते २८ फेब्रुवारी २०२५) रोलिंग रिटर्नच्या आधारावर अभ्यास केला असता उपलब्ध झालेली आकडेवारी सोबतच्या कोष्टकात दिली आहे.

फ्रँकलिन इंडिया ब्लूचिपची २००८-०९ मधील तीव्र घसरणीमध्ये चांगल्या प्रकारे उतार-चढावांचा सामना केला आहे. आणि घसरणी पश्चातच्या तेजीत चांगली कामगिरी केली आहे. पाच, सात दहा, पंधरा वीस आणि तीस वर्षांच्या कालावधीत, फंडाने मानदंड सापेक्ष आणि फंड गट सरासरी सापेक्ष चांगली कामगिरी केली आहे. तीस वर्षांहून अधिक कालावधीचा विचार केला तर एचडीएफसी लार्जकॅप (एचडीएफसी टॉप १००) टाटा लार्जकॅप, फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप टोरस लार्जकॅप जेएम लार्जकॅप, एलआयसी एमएफ लार्जकॅप या फंडात सर्वाधिक संपत्ती निर्मिती करणाऱ्या लार्जकॅप मध्ये फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप दुसऱ्या क्रमांकावर आहे. फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये ४७ ते ४८ कंपन्या असतात. आघाडीच्या ५ कंपन्यांचे प्रमाण ३० टक्के तर आघाडीच्या १० कंपन्यांचे प्रमाण ५० टक्के असते. मागील साठ महिने एचडीएफसी बँक, आयसीआयसीआयसीआय बँक एक्सीस बँक सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या बँका होत्या. गुंतवणुकीत १२ ते १३ उद्योग क्षेत्रांचा समावेश असतो. मागील १२ तिमाहीत बँका आणि वित्तीय सेवा (बीएफएसआय) सर्वाधिक पसंतीचे उद्योग क्षेत्र आहे. फ्रँकलिन इंडिया ब्लूचिपच्या गुंतवणुकीत माहिती तंत्रज्ञान ऑटोमोबाईल्स आणि ग्राहक उपयोगी वस्तू आरोग्य निगा क्षेत्रात मानदंड सापेक्ष अधिक गुंतवणूक आहे. फंडाची जानेवारी अखेरीस ७४०८ कोटीची मालमात्त असून खर्चाचे हे प्रमाण १.८९ टक्के आहे. फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंडाने मागील एका वर्षात ३.२३ टक्के परतावा दिलेला असला तर मागील ३२ वर्षात फंडाने १८.०९ टक्के वार्षिक वृद्धी दर राखला आहे. फंडाची स्थिर परतावा देण्याच्या दीर्घकालीन कामगिरी लक्षात घेता, पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी या फंडाची शिफारस करीत आहे.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top