अर्थ वल्लभ

लाख नक्षत्रे उराशी नभ तरीही हळहळे…..

09 Feb 2026 • 1 min read

लाख नक्षत्रे उराशी नभ तरीही हळहळे.....

गेल्या रविवारी सदर झालेल्या अर्थ संकल्पात केंद्र सरकार पुन्हा भाजपच्या आवडत्या विकास दिसेल अशा पायाभूत सुविधा क्षेत्राकडे वाळलेले दिसत आहे. ज्या उद्योग क्षेत्रांना अर्थसंकल्पाचे लाभार्थी मानले जात आहे अशा उद्योग क्षेत्रात गुंतवणूक असलेला फ्रँकलिन बिल्ड इंडिया फंड हा एक इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे.
केंद्र सरकारचे धोरण २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात क्रय शक्तीला चालना देण्याकडून पुन्हा पायाभूत सुविधांकडे वळलेले स्पष्ट दिसत आहे. पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात १२.२ लाख कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात भांडवली खर्चात मोठी वाढ करण्यात आली आहे. प्रमुख पायाभूत सुविधांमध्ये ७ नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर, पायाभूत सुविधांच्या विकासकांसाठी जोखीम हमी निधी आणि शहर पुनर्विकासासाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रेल्वे विस्तार: सात नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावित आहेत: मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बेंगळुरू, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बेंगळुरू, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलीगुडी.

शहरी आणि ग्रामीण विकास: जल जीवन मिशनचा २०२८ पर्यंत विस्तार करण्याबरोबरच शहर पुनर्विकासासाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.

लॉजिस्टिक्स आणि जलमार्ग: २०४७ पर्यंत २० नवीन राष्ट्रीय जलमार्ग कार्यान्वित करून अंतर्देशीय जलमार्ग आणि किनारी जहाजांचा वाटा ६% वरून १२% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आले आहे.

वित्तपुरवठा यंत्रणा: कर्जदारांना ‘क्रेडिट गँरेंटी’ देण्यासाठी एक नवीन पायाभूत सुविधा जोखीम हमी निधीसाठी तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक मालकीच्या कंपन्यांच्या मालमत्तेच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी समर्पित रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REITs) स्थापन केले जातील.

शाश्वतता आणि तंत्रज्ञान: बंदर विद्युतीकरण, अक्षय ऊर्जा आणि वैज्ञानिक संशोधनासाठी नवीन दुर्बिणींच्या स्थापनेसह पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आली आहे.

राज्य सरकारांना भांडवली प्रकल्पांसाठी राज्यांना ५० वर्षांच्या व्याज मुक्त कर्जात १.५ लाख कोटी रुपयांची योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांवर आधारित इन्फ्रास्ट्रक्चर फंडात गुंतवणूक करणे हा एक चांगला विकल्प आहे. २०२४ मधील भरघोस परताव्यापश्चात कंपन्यांच्या मूल्यांकनात घसरण झाल्याने मुल्यांकन नवीन गुंतवणुकीसाठी आकर्षक पातळीवर आले आहे. व्याजदरसुद्धा सर्वकालीन निच्चांकी पातळीच्या जवळ आहेत. उत्पादन क्षेत्रात सुधारणा करण्यावर भर दिल्याने खाजगी गुंतवणूकीला वेग मिळण्याची अशा आहे. याचा फायदा अभियांत्रिकी क्षेत्राला होईल. इन्फ्रास्ट्रक्चर फंड हे सेक्टरल फंड नसून ते एक थीमॅटिक फंड प्रकार आहे. सुरुवातीची तीन वर्षे अधिक जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांनी या फंडाचा विचार करावा. जे गुंतवणूकदार जोखीम घेण्यास सिद्ध आहेत त्या गुंतवणूकदारांनी फ्रँकलिन बिल्ड इंडिया फंडात आपल्या गुंतवणुकीचा लहान हिस्सा गुंतविण्याची ही शिफारस आहे. फंडाची १७ वर्षांची दैदिप्यमान कारकीर्द आहे. फंडाने ४ सप्टेंबर २००९ ते ६ फेब्रुवारी २०१६ दरम्यान १७.८४ टक्के वार्षिक दराने परतावा दिला आहे. याच कालावधीत फंडाच्या तीन वर्षाच्या चलत सरासरीचा (थ्री यिअर्स रोलिंग रिटर्न्स) तपशील पुढीलप्रमाणे आहे.
 फ्रँकलिन बिल्ड इंडिया फंडनिफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर टीआरआय
सरासरी१९.६४९.४४
कमाल४२.७९३६.०५
किमान-१०.१३-१७.२४
० पेक्षा कमी७.४२१८.२३
० ते ८%१४.८७३०.८९
८ ते १२१०.७२१२.१४
१२ ते १५७.५४५.६९
१५ ते २०१०.५७९.९३
२०% पेक्षा अधिक४८.८८२३.११
गेल्या पाच वर्षांत,(१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२५) या फंडाने मानदंड सापेक्ष ९८ टक्केवेळा जास्त परतावा दिला आहे. या कालावधीत फंडाने आयसीआयसीआय पृडेंशिअल इन्फ्रास्ट्रक्चर, निप्पॉन इंडिया पॉवर अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर, डीएसपी ‘टायगर’, एसबीआय इन्फ्रास्ट्रक्चर या सारखे मालमत्ता क्रमवारीत पुढे असणाऱ्या फंडांच्या तुलनेत सातत्य राखले आहे. म्हणून ३१ डिसेंबर २०२५ रोजी ३०३५ कोटींची मालमत्ता असणाऱ्या या फंडाला मॉर्निंग स्टारने ‘फाईव्ह स्टार रेटिंग’ दिले आहे.

फंडाच्या गुंतवणुकीचा तपशील

उद्योग क्षेत्रटक्केवारी
तेल आणि इंधन१६.७५
भांडवली वस्तू१५.८७
वित्तीय सेवा१५.०२
उर्जा११.४८
बांधकाम११.२३
सेवा९.५५
दूरसंचार६.८९
स्थावर मालमत्ता२.६३
धातू आणि खनिकर्म२.३४
ग्राहाक्पोयोगी वस्तू२.

गेल्या पाच वर्षांत,(१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२५) या फंडाने मानदंड सापेक्ष ९८ टक्केवेळा जास्त परतावा दिला आहे. या कालावधीत फंडाने आयसीआयसीआय पृडेंशिअल इन्फ्रास्ट्रक्चर, निप्पॉन इंडिया पॉवर अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर, डीएसपी ‘टायगर’, एसबीआय इन्फ्रास्ट्रक्चर या सारखे मालमत्ता क्रमवारीत पुढे असणाऱ्या फंडांच्या तुलनेत सातत्य राखले आहे. म्हणून ३१ डिसेंबर २०२५ रोजी ३०३५ कोटींची मालमत्ता असणाऱ्या या फंडाला मॉर्निंग स्टारने ‘फाईव्ह स्टार रेटिंग’ दिले आहे.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top