मानवी प्रज्ञा + कृत्रिम बुद्धिमत्ता = फॅक्टर फंड
‘मल्टी फॅक्टर फंड गुंतवणूकीच्या मर्यादा
मल्टी फॅक्टर फंड गुंतवणुकीत जोखीम अधिक असते. सर्वात लक्षणीय कमतरता म्हणजे बाजार आवर्तने. प्रत्येक घटक दीर्घकाळ नकारात्मक कामगिरीचा अनुभव घेतो. उदाहरणार्थ, २०१७ ते २०२१ पर्यंत ‘व्हॅल्यु’ गुंतवणूकीला सुगीचे दिवस नव्हते. तर २०२२ मध्ये निधी व्यवस्थापक फक्त ‘व्हॅल्यु’ गुंतवणूकीचा मागोवा घेत होते. तर २०२१ मध्ये ‘मुमेंटम’ला पसंती मिळाली परंतु पुढच्या वर्षी ‘मुमेंटम’ कंपन्या थंड पडल्या. २०२२ मध्ये ‘अल्फा’ला कोणी पसंत केले नाही. परंतु २०२४ मध्ये पुन्हा अल्फा रणनीतीचे पुनरागमन झाले. ही आवर्तने गुंतवणूकदारांच्या शिस्तीचा कस तपासतात. टेम्पलटनच्या सादरीकरणानुसार ते भविष्यवेधी’ विदेचा (‘फॉरवर्ड लुकिंग डेटाचा) अवलंब करीत असले तरी संगणक प्रणालीमध्ये प्रत्येक घटकाचे वजन कमी अधिक करणार नाहीत. ज्यामुळे पोर्टफोलिओ अस्थिरता अधिक असणारे उद्योग क्षेत्र किंवा गुंतवणूक शैली पूर्वाग्रहदुषित असण्याची शक्यता नाकारू शकत नाही.
बहु-घटक (मल्टी फॅक्टर) गुंतवणूकीचे फायदे
बहु-घटक गुंतवणूक एकाच पोर्टफोलिओमध्ये अनेक घटक एकत्र करून या सर्व मर्यादांना न्याय दिल्याचे टेम्पलटनच्या सादरीकरणात सांगितले आहे. त्यामुळे ही संगणक प्रणाली, अधिक वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करते. हा दृष्टिकोन विविध घटकांमधील कमी सहसंबंधाचा फायदा घेत विविधीकरण फायदे प्रदान करतो. सध्या, म्युच्युअल फंड घराण्यांनी एकल घटक किंवा द्वि-घटक धोरणांवर आधारित फंड उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या वर्ष भरात पाच फंड घराण्यांनी ‘मल्टी फॅक्टर’फंड उपलब्ध करून दिले (सुंदरम, बरोडा बीएनपी, बंधन सक्रीय व्यवस्थापित) तर मिरे आणि आयसीआयसीआय निष्क्रिय व्यवस्थापित फंड उपलब्ध आहेत. तथापि, मल्टी-फॅक्टर गुंतवणूकित अनेक त्रुटी (ट्रॅकिंग एरर) आहेत. त्यात जटिल घटक संयोजनांचा समावेश आहे आणि गुंतवणूक निर्णय मोठ्या प्रमाणात मागील विदेवरुण चाचणी केलेल्या प्रारुपांवर अवलंबून असतात जे भविष्यात टिकू शकतीलच याची खात्री देता येत नाही. हे सर्व फंड नव्याने आलेले असून आणि त्यांची ऐतिहासिक कामगिरी उपलब्ध नाही. ज्यामुळे वेगवेगळ्या बाजार आवर्तांमध्ये त्यांच्या सुसंगततेचे मूल्यांकन करणे आव्हानात्मक बनते. गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी हे फंड विविध बाजार परिस्थितीत कसे कामगिरी करतात हे गुंतवणूकदारांनी थोडे पाहण्याची आवश्यकता आहे.
तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:
Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.