अर्थ वल्लभ

“जिच्या” हाती गुंतवणुकीची दोरी

07 Mar 2026 • 1 min read

“जिच्या” हाती गुंतवणुकीची दोरी

‘लोकसत्ता’च्या जाणत्या वाचकांसाठी एक ‘एआय’ प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या सहाय्याने उत्तम कामगिरी असणारे फंड शोधून त्या फंडाचा वाचकांना परिचय करून देणे हा स्थंभाचा उद्देश आहे. या संशोधनातून डीएसपी व्हॅल्यु फंड हाती लागलेला. अपर्णा कर्णिक (देशांतर्गत गुंतवणूक) आणि कैवल्या नाडकर्णी (परदेशातील गुंतवणूक) या दोन महिला फंडाच्या निधी व्यवस्थापिका आहेत. अपर्णा कर्णिक या डीएसपीच्या हेड क्वांटीटेटीव्ह इंव्हेस्टमेंटस अॅण्ड अॅनेलीटीक्स आहेत. कालच उत्साहात साजरा झालेल्या महिला दिनाच्या निमित्ताने महिला निधी व्यवस्थापिका असलेल्या फंडाची ही शिफारस.
या फंडाची सुरवात २ डिसेंबर २०२० रोजी झाली. तीन वर्षात १५ टक्के आणि पाच वर्षात १२ टक्के परतावा देणारे आणि १ पेक्षा अधिक शार्प रेशो असणारे फंड कोणते हा प्रश्न ‘एआय’ला विचारल्यावर ५ वर्षे पूर्ण केलेल्या १७५६ फंडातून ७२२ फंड सुचविले. निकषांची संख्या वाढविली आणि निकष अधिक कठोर केले असता फंडांची संख्या कमी होत गेली. या प्रक्रियेतून मोजके जे १२ फंड हाती लागले त्यापैकी हा एक फंड आहे. या फंडाचा शार्प रेशो अधिक असल्याचे कारण म्हणजे गुंतवणुकीत परकीय कंपन्यांचा समावेश असणे. हा फंड ‘व्हॅल्यु इंव्हेस्टिंग’ तत्त्वांचे पालन करतो आणि अशा कंपन्यांत गुंतवणूक करतो जे व्यवसाय त्यांच्या वास्तविक मूल्यापेक्षा सवलतीच्या किंमतीत उपलब्ध आहेत. कंपन्या निवडतांना निवडताना, निधी व्यवस्थापक खराब दर्जाचे आणि उच्च-मूल्य असलेल्या कंपन्यां वगळण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालेले दिसत आहेत. गुणवत्तेच्या बाबतीत, फंड कर्जाचे अतिरिक्त प्रमाण असलेले, महाग, अती अस्थिर, कमकुवत ताळेबंद आणि कमजोर अनुपालन असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक करत नाही.
मूल्यांकनाच्या बाबतीत, नफा किंवा भांडवली परतावा समायोजित केल्यानंतर बाजारातील किंमतीचे पुस्तकी किंमतीशी उच्च गुणोत्तर असलेल्या कंपन्या वगळल्या जातात. काही क्षेत्रीय मूल्यांकन जास्त असते, जसे की एफएमसीजी कंपन्यांचे मुल्यांकन आणि जिन्नास कंपन्यांचे (सिमेंट पोलाद, खते) मुल्यांकन कमी असते. याचा विचार करून, ही रणनीती अंमलात आणली जाते. भांडवली परतावा जितका जास्त असेल तितके मूल्यांकन अधिक असेल. फंड घराण्याच्या मते बीएसई २०० निर्देशांकाचा भाग असलेल्या कंपन्यांचा गेल्या १० वर्षांतील सांख्यिकी विचारात घेऊन कंपन्यांची निवड केली जाते. सेबीने या फंडाला ६५-१०० टक्के मालमत्ता देशांतर्गत कंपन्यांत तर ०-३५ टक्के मालमत्ता परदेशी कंपन्यांत गुंतविण्यास मान्यता दिली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या २४ टक्के मालमत्ता परदेशातील कंपन्यांत , ‘इटीएफ’मध्ये गुंतविण्यात आली आहे. देशांतर्गत गुंतवणुकीसाठी हा फंड ‘निफ्टी ५००’ परिघातील कंपन्यांची निवड करतो. आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी फंड घराणे मूल्य-गुंतवणूक धोरणात बसणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांत गुंतवणूक करतो.

‘निफ्टी ५०० टीआरआय’ हा निर्देशांक फंडाचा मानदंड आहे.
डीएसपी व्हॅल्यु फंडाचा पोर्टफोलिओ फ्लेक्सिकॅप घाटणीचा आहे. पोर्टफोलीओत ६० ते ६५ कंपन्यांचा समावेश असतो. ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार फंडाच्या गुंतवणुकीत ४७.८८ टक्के लार्जकॅप १४.३० टक्के मिडकॅप आणि १९.३८ टक्के स्मॉलकॅप कंपन्यांचा समावेश आहे. फंडाच्या गुंतवणुकीत वाहन आणि वाहन पूरक उत्पादने, वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान, धातू आणि खाणकाम, आणि तेल, वायू आणि इंधन ही गुंतवणूक असलेली आघाडीची उद्योग क्षेत्रे आहेत. दीर्घकाळ एसआयपी करून संपत्ती निर्मितीची आस असलेल्या गुंतवणूकदारांसाठी या फंडाची शिफारस आहे.

आघाडीच्या पाच परदेशी गुंतवणुका%
हार्डिंग लोएव्हनर ग्लोबल इक्विटी फंड४.५६
एसके हायनिक्स इंक३.४९
डब्ल्यूसीएम ग्लोबल इक्विटी फंड२.३१
मायक्रोसॉफ्ट कॉर्प१.४३
अलिबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड१.३९
आघाडीच्या पाच देशांतर्गत गुंतवणुका%
रिव्हर्स रेपो गुंतवणूक७.२२
एचडीएफसी बँक३.९४
भारती एअरटेल३.११
लार्सन अँड टुब्रो लिमिटेड२.८९
इन्फोसिस२.८६

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top