अर्थ वल्लभ

आणीबाणीप्रसंगी करावयाच्या तरतुदीचा फंड

01 Jun 2020 • 1 min read

टाळेबंदीची प्रत्येकाला झळ बसली आहे. प्रत्यक्ष लक्ष्मीपती बालाजीलासुद्धा पोहोचल्याच्या बातमी माध्यमात अनेकांनी वाचली असेल. मंदिर पासष्ट दिवसांपासून बंद असल्याने बालाजीची रोकडसुलभता आटल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे वांदे झाल्याच्या बातम्या होत्या. मागील दोन महिन्यांहून अधिक काळाकरिता दररोज ८० हजार ते १ लाख भक्त दर्शनाला मुकल्याने दानपेटीत जमाही आटली. दानपेटीत रक्कम जमा न झाल्याने मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या न्यासाला रोकड चणचणीला सामोरे जावे लागले. प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार जगातील सर्वात श्रीमंत न्यासाने कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्तिवेतन व इतर निश्चित खर्चावर सुमारे ३०० कोटी रुपये खर्च केले असून मंदिराकडे आठ टन सोन्याचा साठा आणि १४,००० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या मालमत्तेला ‘स्पर्श न करता’ संकटाचे निराकरण करण्याचे न्यासाचे विश्वस्त प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसिद्ध झाल्या आहेत. देवस्थानच्या न्यासाचे मासिक उत्पन्न २०० ते २२० कोटी रुपये आहे. दानपेटीत जमा होणाऱ्या रकमेच्या व्यतिरिक्त तिकीट विक्री, अरिष्टसेवा, प्रसाद विक्री, देणग्या आणि भक्त निवासाचे भाडे यातून दैदंदिन खर्चासाठी रोकडीचा प्रश्न काही प्रमाणात मिटत असतो. टाळेबंदी असली तरी दैनिक षोडशोपचार पूजा नैवेद्य आदी गोष्टी नित्यनेमाने होत असल्याने त्यासाठी खर्च होतो. टाळेबंदी काळात याव्यतिरिक्त न्यासाचा खर्च मुख्यत्वे कर्मचाऱ्यांचे वेतन, न्यास करत असलेल्या सामाजिक बाबी, रुग्णसेवा आणि त्यासाठी दिली जाणारी अनुदाने यावर ४०० कोटी खर्च झाले आहेत. आपण असे समजू की, ५० दिवस मंदिर बंद राहण्याची घटना अभूतपूर्व असली तरी मालमत्तेत किती रोकडसुलभता असावी याबाबतीत स्पष्टता नसल्याने हा गोंधळ झाला असावा.

आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून रोकडसुलभता समजावून घेणे महत्त्वाचे आहे. सोप्या भाषेत, रोकडसुलभता म्हणजे आपल्या गुंतवणूक जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपल्या गुंतवणूक विकून गुंतवणुकीचे रोकड (चलनात) रूपांतर करण्यास किती किंमत मोजावी लागेल आणि त्यासाठी किती वेळ लागेल यावर त्या मालमत्तांची रोकडसुलभता ठरते. अशा रूपांतरणाची प्रक्रिया मालमत्तेपेक्षा भिन्न असते. उदाहरण म्हणून माझी तीन वर्षांची मुदत ठेव मला १२ व्या महिन्यांत रोकडसुलभ करायची असेल तर मला मिळणाऱ्या व्याजापेक्षा कमी व्याज १२ महिन्यांसाठी मिळेल. ही झाली माझी मालमत्ता रोकडसुलभ करण्यास द्यावी लागणारी किंमत. आणि बँकेत रक्कम माझ्या खात्यात जमा होण्यास अर्धा तास लागेल. पण हीच रक्कम भविष्यनिर्वाह निधीतून काढायची असेल तर प्रक्रिया वेळखाऊ , कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर महिन्यानंतर पैसे खात्यात जमा होतील. पण या ठिकाणी पैसे काढून घेतल्याबद्दल नुकसान होणार नाही.

दुसरीकडे, लिक्विड फंड किंवा मनी मार्केट फंड हा फंड प्रकार अतिशय रोकडसुलभ असतो. या फंडातून बाजार मूल्याच्या ९५ टक्के किंवा कमाल ५० हजार २४ तासांत काढता येतात. आणि हे पैसे ३० मिनिटांत गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा होतात. लिक्विड फंडांना ३० दिवसांपेक्षा कमी मुदत असलेल्या रोख्यांत पैसे गुंतवण्याची मुभा असल्याने व्याजदर वाढीमुळे रोख्यांच्या किमतीत घसरण होत नाही. या फंडातून रक्कम काढल्यानंतर त्वरित आणि ‘टी + १’ (म्हणजे कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी) पैसे खात्यात जमा होतात. पोर्टफोलिओचा काही भाग फंडांच्या खात्यात रोख रकमेच्या रूपात ठेवणे सक्तीचे असल्याने या रोख रकमेतून पैसे गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा होते.

प्रत्येक फंड घराण्याला किमान एक फंड ‘इन्स्टंट रिडम्प्शन; या प्रकारे कार्यरत असण्याची ‘सेबी’ने सक्ती केल्याने प्रत्येक फंड घराण्याकडे या प्रकारचा एक फंड असतो. डीएसपी फंड घराण्याचा डीएसपी लिक्विडिटी फंड हा त्वरित पैसे काढून घेण्याची सोय असलेला फंड आहे. डीएसपी फंड घराण्यांचे अ‍ॅप किंवा फंड घराण्याच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपली म्युच्युअल फंडाची युनिट्स विकता येतात. ही विक्री केल्यानंतर ३० मिनिटांत पैसे गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा होतात.

गुंतवणुकीत मुख्यत्वे बँकांच्या ‘सीडी’ कंपन्यांच्या ‘सीपी’ आणि केंद्र सरकारच्या ट्रेझरी बिल्सचा समावेश आहे. केदार कर्णिक आणि राहुल वेकारिया हे या फंडाचे अनुक्रमे निधी व्यवस्थापक आणि सह-निधी व्यवस्थापक आहेत. क्रिसिल लिक्विड फंड इंडेक्स हा या फंडाचा मानदंड आहे.

महिन्याच्या शेवटी शिल्लक रक्कम कायम लिक्विड फंडात गुंतवणूक करावी. या फंडांमुळे वित्तीय नियोजनाला परिपूर्णता येते. लिक्विड फंड उच्च रेटिंग असलेल्या रोख्यांत गुंतवणूक करीत असल्याने गुंतवणुकीत अगदी कमी जोखीम असते. सात दिवसांनंतर पैसे काढल्यास कोणताही अतिरिक्त भार लागत नाही. गुंतवणूकदार किमान ५०० रुपयांची या फंडात गुंतवणूक करू शकतात. ‘रिअल टाइम रीडम्पशन’ असल्याने  ३० मिनिटांत पैसे खात्यात जमा होतात.रोकड सुलभता जपण्यासाठी या फंडाचा विचार करावा.

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top