भेगाळली भुई खोल वल्लं ह्राईली ना कुटं
‘अॅम्फी’ने सोमवार दिनांक ११ मे रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडात ३८,४४० कोटींचा ओघ दिसून आला तरी मार्च महिन्याच्या महिन्याच्या तुलनेत ५ टक्क्यांची घट झाली एसआयपी गुंतवणूकीचे मासिक योगदान मार्च महिन्यातील ३२,०८७ कोटींवरून, एप्रिल महिन्यांत कमी होऊन ३१,११५ कोटींवर आले. एप्रिल महिन्यांत ३.२२ लाख कोटींची गुंतवणूक रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात आली. भुराजकीय परिस्थितीमुळे गुंतवणूकदार कमी जोखमीच्या गुंतवणुकीकडे वाळलेले दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर डीएसपी लार्ज अँड मिडकॅप फंडाने शनिवारी (१६ मे २०२६) २६ वर्षे पूर्ण केली.अस्तित्वात आल्यापासून फंडाने वार्षिक १७.५४ टक्के दराने परतावा दिला असला तरी, अलीकडे फंडाची कामगिरी खालावली आहे. एप्रिल २०२५ पूर्वी हा फंड डीएसपी इक्विटी ऑपोरच्युनीटीज या नांवाने ओळखला जात आसे. विद्यमान निधी व्यवस्थापक रोहित सिंघानिया हे जून २०१५ पासून मागील ११ वर्षे या फंडाचे व्यवस्थापन सांभाळत आहेत. सध्या डीएसपी लार्ज अँड मिडकॅप हा फंड त्याच्या मानदंड सापेक्ष (‘निफ्टी लार्ज मिडकॅप मिड कॅप २५०) गचाळ कामगिरी करणाऱ्या फंडात आघाडीवर असलेला फंड आहे. फंडाने एक, तीन, दहा वर्षात मानदंडापेक्षा थोडा अधिक परतावा मिळविलेला असला तरी पाच आणि सात वर्षाच्या कालावधीत फंड कामगिरी समाधानकारक नाही कामगिरीतील ही तफावत बाजाराची सध्याची परिस्थिती, फंड व्यवस्थापन धोरणे आणि फंड व्यवस्थापकांनी केलेली कंपन्यांची निवड यांसारख्या अनेक घटकांमुळे असू शकते.
गुंतवणूकदारांनी फंडाच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना या घटकांचा विचार करावा आणि माहितीपूर्ण गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी कामगिरीची आणि गुंतवणुकीवरील परताव्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामाची सखोल माहिती मिळवण्यासाठी योग्य साधनांचा वापर करणे उचित ठरेल.

| एक महिना | तीन महिने | एक वर्ष | दोन वर्षे | तीन वर्षे | पाच वर्षे | |
| फंड | ७.५७ | -७.६७ | -९.१७ | -०.४८ | १२.५९ | ९.६९ |
| निफ्टी लार्ज मिड कॅप २५० | १०.३७ | -४.१३ | -५.८७ | ०.६ | ११.७३ | १०.५२ |
| अल्फा | -२.८ | -३.५४ | -३.३३ | -१.०८ | ०.८६ | -०.८३ |
| डीएसपी लार्ज अँड मिडकॅप रेग्युलर ग्रोथ | निफ्टी लार्ज मिड कॅप २५० | |
| शून्यापेक्षा कमी | ३.२२ | ३.१२ |
| ० ते ८ | ११.१४ | १०.३२ |
| ८ ते १२ | ११.५५ | ७.३७ |
| १२ ते १५ | १२.९८ | १४. |
| १५ ते २० | ३१.७३ | ३१.१२ |
| २० पेक्षा अधिक | २९.३८ | ३४.४३ |
तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:
Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.