अर्थ वल्लभ

दिवाळी विशेष

05 Nov 2023 • 1 min read

दिवाळी विशेष

सर्वसाधारणपणे उच्च जोखम सहिष्णुता असलेले गुंतवणूकदार सेक्टरल फंडांची निवड करतात. सेक्टरल फंड हे एकाच उद्योग क्षेत्रातील कंपन्यांत गुंतवणूक करणारे फंड असतात. सेबीच्या नियमानुसार सेक्टरल फंडांना त्यांच्या एकूण गुंतवणुकीपैकी ८० टक्के गुंतवणूक त्याच उद्योग क्षेत्रात करणे आवश्यक असते. गुंतवणूकदार जेव्हा सेक्टरल फंड निवडतात जेव्हा त्यांना विश्वास असतो की त्या उद्योग क्षेत्रात गुंतवणूक केल्यास त्यांना ते उद्योगक्षेत्र विस्तृत बाजारापेक्षा (निफ्टीपेक्षा) अधिक नफा मिळवून देईल. किंवा पोर्टफोलिओमधील अन्य गुंतवणूक हेज करण्यासाठी विषिष्ठ उद्योग क्षेत्र मदत करेल. गुंतवणूक शास्त्रात याला नकारात्मक सह समंध (निगेटिव्ह कोरिलेशन) असे म्हणतात.

आयटी किंवा टेक्नॉलॉजी सेक्टर फंडांकडून पुढील वर्षभरात चांगल्या कामगिरीची अपेक्ष आहे. भारतातल्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या एकूण विक्रीच्या ७०-८० टक्के विक्री अमेरिका आणि युरोप मधून येते. अमेरिकका आणि युरोप मधील वाढत्या महागाई आणि उच्चांकी व्याजदरामुळे अमेरिका आणि युरोपच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीदराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. निफ्टी आयटी इंडेक्स जानेवारी -जुलै २०२२ दरम्यान ३३टक्यांनी घसरला. तेव्हापासून त्याचे निर्देशांक एका ठराविक टप्प्यात रेंगाळत होता. हा लेख लिहीत असतांना हा निर्देशांक २०२२ नंतरच्या घसरणीतील तळापासून २२ टक्के वर आला आहे. अमेरिका आणि युरोपमधील कंपन्यांनी आपल्या आयटी खर्चात सर्वाधिक कपात जागतिक वित्तीय संकटांनंतर २००९ मध्ये केली. त्या नंतर दुसरी मोठी कपात २०२१ मध्ये केली. आयटी कंपन्या या हाय ग्रोथ कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. भारतीय आय टी कंपन्यांनी मागील दहा वर्षात सरासरी १३.२ टक्के वार्षिक वाढ नोंदली आहे. वर्ष २०१८ हे आयटी कंपन्यांसाठी सर्वाधिक वाढ नोंदविणारे वर्ष ठरले. अमेरिका आणि युरोपमधील कंपन्यांना सतत तिसऱ्या वर्षी आयटी खर्चात कपात करणे या कंपन्यांना परवडणारे नाही. जानेवारीपासून सुरु होणाऱ्या नवीन वर्षात आयटी कंपन्यांना माविन प्रोजेक्ट्स मिळू लागतील. आयटी कंपन्यांची ‘ऑर्डर बुक’ची वार्षिक वाढ संथ झाली असली तरी, त्याचा परिमाण नफ्यातील वाढीवर झालेला नाही. आतटी किंवा टेक्नॉलोजी फंड प्रकारात पाच फंड उपलब्ध आहेत. या चार फंडांपैकी फ्रॅकलीन इंडिया टेक्नॉलोजी फंडाचा वाचकांनी तीन ते चार वर्षांसाठी विचार करायला हवा.

वरूण शर्मा हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. हा फंड सेक्टरल फंड असल्याने फंडाच्या गुंतवणुकीत १० कंपन्या असून या कंपन्यांतून निधी व्यवस्थापकांनी वैविध्य जपले आहे. या फंडाच्या गुंतवणुकीचे तीन भाग आहेत. पहिला भाग भारतातील आयटी सर्व्हिसेस कंपन्या (टीसीएस, टेक महिंद्रा,झेन्सार इत्यादी) ‘बीटूसी’ कंपन्या ज्यांची अॅप असून ज्या कंपन्या थेत ग्राहकांना सेवा देतात ( झोमॅटो, पीबी फिनटेक) आणि तिसऱ्या प्रकारात अमेरिकेतील कंपन्या (फ्रॅकलीन टेक्नॉलोजी फंड क्लास जे, कॉग्नीझंट टेक्नॉलोजी सोल्युशन) यांचा समावेश होतो. फंडाच्या गुंतवणुकीत २५.४९ टक्के लार्जकॅप ३४.९७ टक्के मिडकॅप आणि २८.५ टक्के स्मॉलकॅप कंपन्यांचा समावेश आहे. उद्योगक्षेत्र निहाय गुंतवणुकीचा आढावा घेतल्यास ५०.५२ टक्के आयटी, तर उर्वरित गुंतवणुकीत रिटेल, टेलीकॉम, रसायने, वित्तीय सेवा यांचा समावेश होतो. मागील वर्ष भरात निधी व्यावास्थापाक्की टीसीएस, एचसीएल, इंफोसीस, भारती एअरटेल, यांच्यातील गुंतवणूक लक्षणीय कमी करून आणि त्याऐवजी बिर्लासॉफ्ट, पीबी फिनटेक (पॉलिसी बजार) झोमॅटो, सीई इंफो सिस्टीम, सारख्या स्मॉलकॅप आयटी कंपन्यांतून गुंतवणूक वाढविली. परंतु अंतरराष्ट्रीय गुंतवणूक ९ टक्के दरम्यान कायम राखली. फ्रँकलिन इंडिया टेक्नॉलॉजी फंडाचा अन्य ४ फंडाशी पोर्टफोलिओ ओव्हरलॅप केवळ २५ ते ३० टक्के आहे. येत्या वर्षभरात फंडाने नव्याने गुंतवणूक केलेल्या लहान ई-कॉमर्स, फिनटेक कंपन्या एनएव्ही वाढीत आपले काम चोख बजावतील. परंतु जानेवारी पासून आयटी कंपन्यांना प्रोजेक्ट्स मिळू लागतील हे गृहीतक चुकीचे ठरले तर आयटी कंपन्यांत घसरण होईल आणि त्याचा फटका फटका गुंतवणुकीस बसू शकतो. ही शिफारस पोर्टफोलिओ आणि सेक्टर रोटेशन रणनीतीवर आधारित आहे. सेक्टरल फंड हे उच्च जोखम सहिष्णूता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी असतात. वाचकांपैकी कोणी नाव गुंतवणूकदार असतील तर ही शिफारस त्यांच्यासांठी नाही. आमचा संशोधन चमू दिवाळी निमित्त वाचकांना चांगली शिफारस देण्याचा प्रयत्न करीत असतो. मागील पाच पैकी चार वर्षे दिवाळी निमित्ताने शिफारस केलेल्या फंडांनी चांगला नफा गुंतवणूकदारांच्या पदरात टाकला आहे. असाच प्रयत्न या वर्षी केला असता फ्रॅकलीन इंडिया टेक्नॉलोजी फंडाचे जोखीम परतावा गुणोत्तर गुंतवणूकदारांच्या बाजूला झुकलेले दिसून आले. पुढील एका वर्षात हा फंड किमान दोन आकड्यात परतावा देईल अशी चिंन्हे दिसत असल्याने या फंडाची शिफारस केली. या फंडात गुंतवणूक करीत असतांना म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजार जोखीमिंच्या अधीन असते गुंतवणूक करण्यापूर्वी माहिती पत्रक सखोल अभ्यासाने आवश्यक आहे हे विसरू नये.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top