अर्थ वल्लभ

पायी घागऱ्या करिती रुणझुण

09 Sep 2024 • 1 min read

पायी घागऱ्या करिती रुणझुण

मागील अनेक दिवसांत सेन्सेक्स नवीन शिखर गाठतो तिथून घसरतो आणि पुन्हा नवीन शिखराला स्पर्श करतो. सध्या बाजार वेळेला विक्रमी उच्चांकाच्या जवळ आहे. हा लेख लिहित असतांना मागील वर्ष भरात सेन्सेक्सने २५.७२ टक्के बीएसइ मिडकॅपने ५८.३२ आणि बीएसइ स्मॉलकॅपने ५४.८७ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी ज्यांनी “प्रोफीट बुकिंग’च्या निमित्ताने बाजारातून गुंतवणूक काढून घेतली त्यांना ४ जूनचा अपवाद वगळता बाजाराने गुंतवणुकीची संधी दिलेली नाही. म्हणूनच बाजारात गुंतवणुकीसाठी वेळ साधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, ‘जाणत्या जनांनी’ सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) द्वारे आज शिफारस केलेल्या उभरत्या लार्ज अँण्ड मिडकॅप फंडात गुंतवणूक करून आपली वित्तीय ध्येये साध्य करावी, हा या लेखाचा उद्देश आहे. पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी हा फंड भविष्यात १२ ते १५ टक्के संभाव्य परतावा देऊ शकेल अशी शक्यता असल्याने हा फंड एक आशादायक विकल्प आहे. मागील तीन वर्षांच्या चलत सरासरीनुसार एक साधारण कामगिरी असूनही ‘रिस्क रिवॉर्ड परफॉर्मर’ म्हणून या फंडाची निवड केली आहे.
बरोडा बीएनपी पारिबा लार्ज अँण्ड मिडकॅप फंडाने मागील शुक्रवारी म्हणजे ४ सप्टेंबर रोजी कारकीर्दीची ५ वर्षे पूर्ण केली. लार्ज आणि मिडकॅप फंडांना त्यांच्या ७० टक्के पोर्टफोलिओ हा आघाडीच्या २५० कंपन्यांत गुंतवावा लागतो. (लार्जकॅप मध्ये ३५ टक्के आणि मिड-कॅपमध्ये ३५ टक्के). ‘बीएसइ २५० लार्ज अँण्ड मिड कॅप टीआरआय’ हा फंडाचा मानदंड असून, संजय चावला हे या फंडाचे सुरवातीपासूनचे नियुक्त निधी व्यवस्थापक आहेत. ते मानदंड सापेक्ष जागरूक निधी व्यवस्थापक असून त्यांना ३० वर्षांचा समभाग संशोधन आणि निधी व्यवस्थापनाचा अनुभव आहे. गुंतवणुकीत ते कोणतेही साहसी निर्णय घेत नाहीत. परंतु रिस्क रिवॉर्ड विचार करून नफा देणारे कॉल घेण्यास ते कचरत नाहीत. हा फंड कंपन्यांच्या निवडीसाठी मिडकॅपसाठी बॉटम-अप आणि लार्जकॅपसाठी टॉप-डाउन रणनीतीचा अवलंब करतात.

बरोडा बीएनपी पारिबा लार्ज अँण्ड मिडकॅप ३ वर्षे चलत सरासरी

या फंडाची सुरवात करोना ऐन भरात असतांना म्हणजे ४ सप्टेंबर २०२० रोजी झाली. सुरवातीपासून या फंडाच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसार वार्षिक २९.३२ टक्के परतावा दिला आहे. सुरवातीपासून या फंडात ५००० ची एसआयपी केलेल्या गुंतवणूकदाराला २४००००च्या गुंतवणुकीचे ४२१०७० झाले असून परताव्याच्या दर २९.९४ टक्के आहे. फंडाच्या पहिल्या जाहीर झालेल्या पोर्टफ़ोलिओ नुसार ३० सप्टेंबर २०२० च्या पोर्टफ़ोलिओ नुसार ६० टक्यांहून अधिक गुंतवणुका लार्जकॅप होत्या. मिडकॅपची मात्रा ३७ टक्के होती. जानेवारी २०२१ पासून निधी व्यवस्थापकांनी मिड-कॅपमध्ये वाढ करणे सुरू केले. ताज्या आकडेवारी नुसार लार्जकॅप आणि मिडकॅप यांची समान मात्रा आहे. या फंडाच्या गुंतवणुकीत मालमत्तेच्या ४५.३४ टक्के लार्जकॅप आणि ४५.८५ टक्के मिडकॅप ४.६ टक्के स्मॉलकॅप आणि उर्वरित रोकड संलग्न गुंतवणुका आहेत. गेल्या एका वर्षात फंडाने मिड आणि स्मॉल-कॅपची मात्रा वाढवून, लार्ज-कॅप गुंतवणुका कमी केल्या होत्या. आता पुन्हा मिडकॅप आणि स्मॉलकॅपचे प्रमाण कमी करून निधी व्यवस्थापक लार्जकॅपचे प्रमाण वाढावीतांना दिसत आहेत
या फंडाची सुरवात करोना ऐन भरात असतांना म्हणजे ४ सप्टेंबर २०२० रोजी झाली. सुरवातीपासून या फंडाच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसार वार्षिक २९.३२ टक्के परतावा दिला आहे. सुरवातीपासून या फंडात ५००० ची एसआयपी केलेल्या गुंतवणूकदाराला २४००००च्या गुंतवणुकीचे ४२१०७० झाले असून परताव्याच्या दर २९.९४ टक्के आहे. फंडाच्या पहिल्या जाहीर झालेल्या पोर्टफ़ोलिओ नुसार ३० सप्टेंबर २०२० च्या पोर्टफ़ोलिओ नुसार ६० टक्यांहून अधिक गुंतवणुका लार्जकॅप होत्या. मिडकॅपची मात्रा ३७ टक्के होती. जानेवारी २०२१ पासून निधी व्यवस्थापकांनी मिड-कॅपमध्ये वाढ करणे सुरू केले. ताज्या आकडेवारी नुसार लार्जकॅप आणि मिडकॅप यांची समान मात्रा आहे. या फंडाच्या गुंतवणुकीत मालमत्तेच्या ४५.३४ टक्के लार्जकॅप आणि ४५.८५ टक्के मिडकॅप ४.६ टक्के स्मॉलकॅप आणि उर्वरित रोकड संलग्न गुंतवणुका आहेत. गेल्या एका वर्षात फंडाने मिड आणि स्मॉल-कॅपची मात्रा वाढवून, लार्ज-कॅप गुंतवणुका कमी केल्या होत्या. आता पुन्हा मिडकॅप आणि स्मॉलकॅपचे प्रमाण कमी करून निधी व्यवस्थापक लार्जकॅपचे प्रमाण वाढावीतांना दिसत आहेत
फंडाची कारकीर्द ५ वर्षाची असल्याने या फंडाची निवड करतांना केवळ तीन वर्षांच्या चलत सरासरी परताव्याचा विचार केला आहे. फंडाने ‘बीएसइ २५० लार्ज अँण्ड मिड कॅप टीआरआय’ ला १०० टक्के वेळा मागे टाकले आहे, कदाचित फंडाची कारकीर्द केवळ ५ वर्षाची असल्यामुळे हे असू शकेल परंतु म्हणून या फंड गटात अशी कामगिरी करणारे जे मोजके फंड आहेत, त्यापैकी हा एक फंड आहे. ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे असे म्हणता आले नाही तरी, मागील पाच वर्षात तीन वर्षाच्या चलत सरासरीनुसार किमान २०.२२ टक्के आणि कमाल २५.४८ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. मागील पाच वर्षाचा विचार करता ३ वर्षे चलत सरसरीचे ४३५ डेटा पॉईंट्स मिळाले. हे डेटा पॉईंट्स स्पष्टपणे सूचित करतात की लार्ज अँण्ड मिडकॅप फंड गटात हा फंड एक सातत्यपूर्ण कामगिरी करणारा फंड आहे. फंडाचा ‘अपसाईड कॅप्चर रेशो’ १०२.४६ असल्याने तेजीत हा फंड ‘बीएसइ २५० लार्ज अँण्ड मिड कॅप टीआरआय’ पेक्षा खूप अधिक जास्त वाढू शकत नाही. विशेष म्हणजे, ‘डाउनसाइड कॅप्चर रेशो केवळ’ ९२.०८ आहे, हे असे सूचित करते की बाजार घसरणी दरम्यान फंडाची एसअव्ही बेंचमार्कसापेक्षा खूप कमी होत नाही. फंडाच्या गुंतवणुकीत क्लिअरिंग कॉर्पोरेषन ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, इंफोसीस, लार्सन अँण्ड टुब्रो एनएचपीसी या आघाडीच्या पाच गुंतवणुका आहेत. फंडाच्या गुंतवणूकीत खाजगी बँका, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य निगा, वाहन आणि वाहन पूरक उत्पादने, सेवा, ही आघाडीची उद्योग क्षेत्रे आहेत. फंडाच्या सुरवातीपासून निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीत एकूण ५२-५५ कंपन्यांचा समावेश केला आहे. या कंपन्या पोर्टफोलीओला वैविध्य प्रदान करतात. ‘ग्रोथ अॅट रिझनेबल प्राइस’ हे फंडाच्या गुंतवणुकीचे सूत्र आहे. प्रत्येक फंड गटात फंडामध्ये सामान्यतः दोन किंवा तीन फंड असतात जे दहा वर्षे त्या फंड गटात आपला दबदबा राखून असतात. या फंडाची मालमत्ता जरी १३३८ कोटी असली तरी भविष्यात हा फंड या फंड गटात आपला दबदबा निर्माण करेल, किंवा एक सातत्य राखणारा फंड म्हणून उदयास येईल. अनेक गुंतवणूकदार मोठी एनएव्ही असलेल्या फंडाट गुंतवणूककरणे टाळतात., अशा गुंतवणूकदारासाठी हि शिफारस आहे. भविष्यात सातत्य राखण्याची शक्यता असलेला हा फंड गुंतवणूकदार किमान ५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी या फंडाचा त्यांच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओत एकरक्कमी गुंतवणुकीसाठी समावेश करू शकतात, किंवा पाच वर्षासाठी एसआयपी करू शकतात.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top