उधळीत मोती शततारका या
पोर्टफ़ोलिओ रचना
ऑगस्ट २००५ मध्ये त्याच्या आयडीएफसी क्लासिक इक्विटी म्हणून सुरु झालेला हा फंड, सेबीच्या फंड सुसूत्रीकरणानंतर आयडीएफसी कोअर इक्विटी म्हणून ओळखला जावू लागला. फंड घराण्याने १३ जून २०२५ पासून फंडाचे नांव बदलून बंधन लार्ज अँण्ड मिडकॅप फंड असे केले. धोरणात्मकबाबींवर लक्ष केंद्रित करून, बाजार भांडवलानुसार पहिल्या २५० कंपन्यांचा या फंडाच्या गुंतवणूक परिघात समावेश होतो. फंडाला लार्जकॅप आणि मिडकॅपमध्ये प्रत्येकी ३५ टक्के गुंतवणूक राखणे अनिवार्य आहे. फंडाच्या सक्रीय व्यवस्थापन गुंतवणुकीचे मुख्य तीन निकष आहे. पहिला ‘मुमेंटम स्टॉक्स’ सक्रिय पोर्टफोलिओ व्यवस्थापनात गुंतलेले असते, तेव्हा व्यवसायांना योग्य मूल्यांकन मिळते. दुसरा निकष ते मोठ्या संख्येने असलेल्या पोर्टफोलिओतील कंपन्या (जून अखेरीस कंपन्यांची संख्या १०५) विविध ३५ उद्योग क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात. लार्ज अँण्ड मिडकॅप फंड गटात गुंतवणुक असलेल्या कंपन्यांच्या संख्येच्या तुलनेत हा फंड दुसऱ्या स्थानी आहे. तिसरा निकष, हा फंड नव्याने विकसित होत असलेले कल समजून थिंमॅटिक आणि आर्थिक आवर्तनानुसार गुंतवणूक करतो. पोर्टफोलिओ मुख्यत्वे तीन भागांमध्ये विभागलेला असल्याचे दिसतो. पहिला भाग, उच्च-वृद्धीदर राखणाऱ्या कंपन्या. मध्यम कालावधीत विस्तृत अर्थव्यवस्थेच्या सरासरीवाढीपेक्षा अधिक वाढ नोंदविणाऱ्या कंपन्या जसे की खाजगी क्षेत्रातील बँका, इंटरनेट कंपन्या, वाहन पूरक उत्पादक, दुसऱ्या भागात थीमॅटिक बाबींचा समावेश आहे, तिसऱ्या भागात पर्यायी आणि मूल्य गुंतवणूक, उदयोन्मुख तंत्रज्ञान (इव्ही) इत्यादींचा समावेश आहे. निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय पाहता, बंधन लार्ज अँण्ड मिडकॅप फंड पारंपारिक रित्या या फंडाच्या गुंतवणुकीचा ६५ टक्के हिस्सा ‘निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय’मधील कंपन्यांत गुंतवीलेला असतो. याव्यतिरिक्त, फंडाचा ३० ते ३५ टक्के हिस्सा मिड-स्मॉल कॅप कंपन्यांत असतो. सेबीने म्युच्युअल फंड योजनांचे सुसूत्रीकरण करण्यापूर्वी (एप्रिल २०१८ ) बंधन कोअर इक्विटी, प्रामुख्याने लार्ज-कॅपवर केंद्रित फंड होता. फंड सुसुत्रीकरणापूर्वी लार्जकॅपची मात्रा ६० टक्क्यांहून अधिक होती. फंड लार्ज आणि मिडकॅप कंपन्यांत गुंतवणूक करतो. जोखीम व्यवस्थापन निधी व्यवस्थापकांची प्राथमिकता राहिली आहे. फंडाच्या गटाच्या तुलनेत या फंडातील उद्योग क्षेत्रांची आणि कंपन्यांची संख्या जास्त आहे. फंडाने केलेली गुंतवणुकीत खाजगी बँका, आरोग्य निगा वित्तपुरवठा , वाहन आणि वाहन पूरक उत्पादने माहीती तंत्रज्ञान, रिटेलिंग, पेट्रोलियम उत्पादने आणि विद्युत उपकरणे यांचा समावेश आहे. फंडाच्या गुंतवणुकीत एचडीएफसी बँक, अॅणक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, स्टेट बँक, एल अँड टी, रिलायंस इंडस्ट्रीज हिंडाल्को, भारती एअरटेल, अॅव्हेन्यू सुपरमार्ट या आघाडीच्या गुंतवणुका आहेत. फंडाने अलीकडेच डिक्सन टेक्नोलॉजी वेदांत जीइ शिपिंग, सुझलोन यांचा नव्याने सामावेह केला तर पीएनबी हौसिंग, बालकृष्ण इंडस्ट्रीज, क्रिसिल स्टार हेल्थ यांना वगळले आहे.
बंधन लार्ज अँण्ड मिडकॅप फंडाची कामगिरी:
बंधन लार्ज अँण्ड मिडकॅप फंडाच्या कामगिरीत २०१९ पासून जोरदार घसरण झाली, आणि २०२० मध्ये हा फंड बॉटम क्वार्टाइलमध्ये फेकला गेला. बंधन लार्ज अँण्ड मिडकॅप फंडाच्या कामगिरीत मागील ३ वर्षे सातत्याने सुधारणा झालेली दिसत आहे. लोअर मिड क्वार्टाइल (२०२१), अप्पर मिड क्वार्टाइल (२०२२) आणि टॉप क्वार्टाइल (२०२३) असा फंडाचा प्रवास राहिला आहे. पॉइंट-टू-पॉइंट ट्रेलिंग रिटर्न नुसार (३१ जुलै रोजी), फंडाचा एका वर्षात ०.०९ टक्के, तीन वर्षात २७.२९ टक्के आणि पाच वर्षांच्या कालावधीत २६.६५ टक्के परतावा फंड गट आणि मानदंड ‘निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय’ सापेक्ष चांगला आहे. फंड सरासरीपेक्षा जास्त परतावा कमवीत असतांना निधी व्यवस्थापाकांनी सावधगिरी बाळगल्याचे दिसून येते, मिरे अॅसेट लार्ज अँण्ड मिडकॅप, कॅनरा रोबेको लार्ज अँण्ड मिडकॅप आणि एसबीआय लार्ज अँड मिडकॅप सारख्या फंड गटातील मोठी मालमत्ता असणाऱ्या फंडांपेक्षा मासिक चलत सरासरी द्वारा मोजले जाणारे वार्षिक प्रमाणित विचलन अधिक चांगले आहे.
पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा!
तेव्हा या फंडात नव्याने एसआयपी करायची की नाही हे वाचकहो तुम्हीच ठरवा.
तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:
Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.