अर्थ वल्लभ

रात्नांची आरास साज मखमली : अॅक्सीस शॉर्ट डयुरेशन फंड

25 Mar 2026 • 1 min read

रात्नांची आरास साज मखमली : अॅक्सीस शॉर्ट डयुरेशन फंड

फेब्रुवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात १.२५ टक्के कपात केली. रेपोदारातील कपात संपुष्टात आली असून भविष्यात प्रदीर्घ काळ रिझर्व्ह बँक व्यादर स्थिर राखेल असा अंदाज आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या १२ महिन्यांत पतधोरणात अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. आर्थिक विकासाच्या उद्दिष्टांना अत्यंत ही धोरणे पूरक ठरली आहेत. गेल्या १२ महिन्यांत रिझर्व्ह बँकेने ‘ओपन मार्केट ऑपरेशन्स’ रोख राखीव प्रमाणात (‘कॅश रिझर्व्ह रेशो’) कपात, ‘फॉरेक्स स्वॅप्स’ इत्यादी विविध उपाययोजनांद्वारे अर्थव्यवस्थेत १८ लाख कोटी रुपयांहून अधिकची रोकड सुलभता निर्माण केली. गेल्या काही वर्षातील ही रोकडसुलभता खूप मोठी रोकड सुलभता आहे. गेल्या बारा महिन्यांत केंद्र सरकारनेदेखील नागरिकांच्या क्रयशक्तीला चालना देण्यासाठी फेब्रुवारी २०२५ मध्ये करमुक्त उत्पन्नाची मर्यादा १२ लाखांपर्यंत वाढवली आणि सप्टेंबर मध्ये वस्तू आणि सेवा करदरात महत्वपूर्ण बदल केले. पुढील वर्षीसाठीचा अर्थसंकल्प देखील आर्थिक विकासाला चालना देणारा ठरला आहे. भांडवली गुंतवणुकीवरील खर्चात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे; तसेच विविध प्रमुख योजनांवरील खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे, आर्थिक विकासाला नवी चालना मिळण्याबाबत रिझर्व्ह बँकेला आता फारशी चिंता करण्याची गरज उरलेली नाही. होऊ घातला अमेरिकेसोबतच्या व्यापार करारा तूर्तास स्थगित झाला नसता तर २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीतील आर्थिक वाढीला चालना मिळाली असती. सध्या आयात शुल्काचे प्रमाण ५० टक्क्यांवरच कायम राहिले असल्याने भारताच्या निर्यातीवर विपरीत परिणाम झाला आहे. या सर्व बदलांच्या पार्श्वभूमीवर आर्थिक वर्ष २०२७ मध्ये देशाचा विकास दर ६.७५ ते ७ टक्के दरम्यान राहू शकेल. महागाईचा विचार करता, एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाईच्या दरात थोडी वाढ दिसू शकते; परंतु ती महागाईत वाढ झाली तरी महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या सहिष्णू दरा दरम्यान असेल. महत्वाचा आणखी एक मुद्दा म्हणजे महागाईच्या मोजमापाची नवीन पद्धत बदललेले संदर्भ वर्ष आणि वस्तूंच्या वाढलेल्या किमती आणि इतर काही घटकांमुळे वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाईचा दर काहीसा वाढण्याची शक्यता अधिक आहे. आहे. तथापि आगामी वर्षात म्हणूनच रिझर्व्ह बँकेचे व्याज दराबाबत धोरण ‘जैसे थे’ कायम राहण्याची शक्यता अधिक आहे. जर समाधानकारक पाउस पडला नाही किंवा भुराजकीय अस्थिरतेमुळे महागाईच्या दरात अचानक आणि मोठ्या प्रमाणात वाढ झाली, तर कदाचित या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत रिझर्व्ह बँक व्याजदरात थोडी वाढ करण्याचा विचार करू शकते. रोखे बाजाराच्या दृष्टिकोनातून पाहता, अर्थसंकल्पात प्रस्तवित चालू खात्यावारीन तूट आणि कर्ज उभारणी विचार करता अर्थसंकल्पातील आकडेवारी बऱ्यापैकी ‘सावध’ पवित्रा घेणारी असल्याचे दिसत आहे. कर महसुलाबाबत असो, किंवा वृद्धीदराबाबतची असो, निर्गुंतवणुकीबाबत असो. महसुली तूट आणि ‘सरकारचे कर्जाचे सकल घरेलू उत्पादनाचे गुणोत्तर कमी करण्याच्या दिशेने आखलेला मार्ग समाधानकारक वाटतो. पुढील वर्षात केंद्र सरकार कडून एकूण कर्ज उभारणी १७.२५ लाख कोटी प्रस्तावित असून ‘ब्लूमबर्ग ॲक्टिव्ह ग्लोबल ॲग्रीगेटर इंडेक्स’मध्ये भारतीय रोख्यांचा समावेश झाल्यामुळे, मागणी आणि पुरवठ्यातील तफावत काही प्रमाणात भरून काढण्यास मदत होऊ शकते; कारण यामुळे २५ अब्ज डॉलर्सचा भांडवली गुंतवणूक देशात येण्याची शक्यता आहे. तथापि, ही भांडवली गुंतवणूक पुढील वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत किंवा वर्ष २७-२८ मध्ये प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. एकूण कर्ज उभारणी १७.२५ लाख कोटी प्रास्तावित असल्याने मागणी आणि पुरवठ्यामध्ये सुमारे २ ते २.५ लाख कोटी रुपयांची तफावत सध्या दिसत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ४ ते ५ लाख कोटी रुपयांची रोकड सुलभता ‘ओपन मार्केट ऑपरेशन’च्या माध्यमातून करेल असा रोखे बाजारात अंदाज व्यक्त होत आहे. जोपर्यंत ब्लूमबर्ग इंडेक्सशी संबंधित भांडवली गुंतवणूक प्रत्यक्षात येत नाही, तोपर्यंत या मोठ्या कर्ज उभारणीचा परिणाम सरकारी रोख्यांच्या परताव्याच्या दरावर (यिल्ड) होईल. जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत, मानदंड रोख्यांचा परतावा ६.६० ते ६.८० टक्क्यांच्या पट्ट्यात राहिला. साधारण आर्थिक वर्षाच्या अखेरच्या पंधरवड्यात (अग्रिम कराच्या चवथ्या हप्त्याच्या पूर्ततेनंतर) रोकड सुलभता आटते असा अनुभव आहे. पुरेशी रोकड सुलभता राखण्यासाठी येत्या आठवड्यात १० ते १५ हजार कोटींच्या ‘ओपन मार्केट ऑपरेशन’ची घोषणा रिझर्व्ह बँकेकडून होईल अशी अपेक्षा आहे. तसेच पुढील वर्षासाठीचा रोखे लिलावाचा तपशील (बॉरोइंग कॅलेंडर) रिझर्व्ह बँक येत्या आठवड्यात जाहीर करेल. रिझर्व्ह बँक १७.२५ लाख कोटींची कर्ज उभारणी कोणत्या मुदतीच्या रोख्यातून अशी करते ते स्पष्ट झाल्यावर एप्रिल महिन्यापासून मानदंड रोख्यांच्या परताव्याचा दर वाढून ६.८० ते ७ टक्क्यांच्या राहील.
अमेरिकेच्या १० वर्ष मुदतीच्या रोख्यांचे दर २०२२ मध्ये २ टक्क्यांच्या आसपास होते. आज ते ४.२५ टक्क्यांवर पोहचले आहेत. त्याच वेळी, भारताच्या १०-वर्षे रोख्यांवरील परतावा ७.५ टक्के होता. आज तो ६.७५ टक्क्यांवर आहे. त्यामुळे, दरांमध्ये वारंवार वाढ होऊनही आणि फेडच्या रोख्यांच्याबाबत चिंता व्यक्त केली जात असूनही, आपल्या रोखे बाजारांनी प्रत्यक्षात लक्षणीय परतावा दिला आहे. वेगवेगळ्या देशांच्या मध्यवर्ती बँका व्याजदर कपातीबाबत ‘विराम’ घेण्याच्या भूमिकेत आहेत. गेल्या १२ ते १८ महिन्यांत त्यांनी व्याजदरांमध्ये बऱ्याच प्रमाणात कपात करून अर्थव्यवस्थेतील तणाव दूर करून शिथिलता आणली आहे. जगात आणि भारतात व्याजदर कपातीचे आवर्तन पूर्ण झाल्याचे मानण्यात येते. आर्थिक वर्ष २०२४ हे वर्ष दीर्घ मुदतीच्या रोख्यांचे वर्ष होते,त्या वर्षात दीर्घ मुदतीच्या रोख्यांनी सर्वाधिक परतावा दिला; २०२५ हे वर्ष रोकड सुलभतेचे वर्ष होते, ज्यामुळे ‘शॉर्ट एंड’ रोख्यांनी दीर्घ मुदतीच्या रोख्यांपेक्षा जास्त परतावा दिला. आर्थिक वर्ष २०२७ चा विचार करता भुराजकीय तणावामुळे महागाई बद्दल काळजी वाटू लागली, तर व्याजदर वाढीची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शॉर्ट टर्म बॉंड फंडात गुंतवणूक करणे हे फायद्याचे ठरेल. गुंतवणूकदारांनी रोखे गुंतवणूक करतांना दोन पैलूंवर लक्ष केंद्रित केले पाहिजे: गुंतवणूकीचा कलावधी आणि जोखीम-परतावा गुणोत्तर. जर एखादा गुंतवणूकदार कमी कालावधीसाठी (३० ते ३६ महिने, बँकांच्या सर्वाधिक मुदत ठेवी या ‘बकेट’ मध्ये असतात) गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी अॅक्सीस शॉर्ट डयुरेशन फंडाचा विचार करावा. २२ जनेवारी २०१० रोजी सुरु झालेल्या या फंडाने स्थापनेपासून १४ मार्च २०२६ पर्यंत ८.१३ टक्के दराने वार्षिक परतावा दिला आहे. देवांग शहा हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. या फंडाची २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ११८५९ कोटींची मालमत्ता होती. गेल्या तीन वर्षात फंडाने ७.५९ टक्के दराने वार्षिक परतावा दिला आहे. अॅक्सीस शॉर्ट डयुरेशन फंड, ‘ड्युरेशन’चे सक्रिय व्यवस्थापन करणारा फंड आहे. वाजवी पत जोखीम घेतात. त्यांची कामगिरी तुलनेने चांगली असते. ॲक्सिस शॉर्ट ड्युरेशन फंड या दृष्टिकोनाचे एक उत्तम उदाहरण आहे. शॉर्ट टर्म फंड गटात मालमत्ता क्रमवारीत ॲक्सिस शॉर्ट ड्युरेशन फंड सहाव्या क्रमांकावर आहे. या फंड गटात पोर्टफोलिओचा मॅकॉले ड्युरेशन एक ते तीन वर्षांच्या दरम्यान ठेवणे, आणि त्याच वेळी व्याजदर आवर्तन आणि रोकड सुलभतेनुसार पोर्टफोलीओ व्यवस्थापित केला जातो. फंडाचा मागील १५ वर्षाची कामगिरी आणि कुशल निधी व्यवस्थापक लक्षात घेता या फंडाची शिफारस केली आहे.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top