अर्थ वल्लभ

‘आनंदा’चे डोही आनंदतरंग

20 Nov 2022 • 1 min read

‘आनंदा’चे डोही आनंदतरंग

फ्रँकलीन इंडिया फ्लेक्झीकॅप फंड वैविध्यपूर्ण गुंतवणुकीमुळे अन्य फ्लेक्झीकॅप फंडांपेक्षा उजवा ठरला आहे. गुंतवणूक असलेल्या कंपन्यांचा व्यवसाय आणि बाजारातील मूल्यांकनांवर आधारित गुंतवणूक करून ही गुंतवणूक दीर्घकाळ राखून ठेवणे ही फंडाची रणनीती आहे. फंडाच्या शीर्ष गुंतवणुकीचे ध्रुवीकरण नसूनही यातील काही समभागांनी गेल्या काही महिन्यांत कामगिरीत सातत्य राखल्यामुळे फंड कमी-अस्थिर परंतु मागील वर्षभराच्या कामगिरीत अव्वल ठरला आहे. २२ फेब्रुवारी २०२० ते २२ मे २०२० हा नावाड दिवसांचा कालावधी (थ्री मंथ्स रोलिंग रिटर्न्स) सर्वात जास्त नुकसान देणारा होता. जून २०२१ मध्ये फंडाच्या पोर्टफोलिओत मोठ्या प्रमाणावर केलेल्या सुधारणांमुळे (इंफोसिस आयसीआयसीआयय बँक आणि स्टेट बँकेची मात्रा वाढविणे) या फंडाच्या कामगिरीत मोठी सुधारणा दिसून आली. मागील तिमाहीत (जुलै सप्टेंबर) कालावधीत फ्लेक्झीकॅप फंड गटात रेग्युलर ग्रोथ एनएव्हीत सर्वाधिक वाढ नोंदविणारा फंड ठरला आहे.
मॉर्निंगस्टार डीरेक्ट मधील अॅसेट फ्लोज डेटा विशिष्ठ फंड गटातील मालमत्ता स्तरांमधील बदल समजून घेण्यासाठी वापरला जातो. वापरकर्ते फंडातील निधीची आवक आणि जावक पाहून या फंड गटात कोणत्या फंडाला अधिक पैसे मिळत आहेत हे पाहू शकतो. मागील तिमाहीत फ्लेक्झीकॅप फंड गटात नवीन गुंतवणूक आकर्षित करणरा एचडीएफसी फ्लेक्झीकॅप नंतर फ्रँकलीन इंडिया फ्लेक्झीकॅप फंड दुसऱ्या क्रमांकावर असलेला फंड होता. ‘निफ्टी ५०० टीआरआय’च्या तुलनेत गेल्या तिमाही सहामाही आणि वर्षभराच्या कामगीरीशी तुलना करता कामगिरीतील फरक कमी झाल्याचा संकेत देत आहे. एका वर्षाच्या चलत सरासरी परताव्याने निफ्टी ५०० टीआरआयला मागे टाकले आहे. सहा महिन्यापूर्वी हा फरक ३ टक्के होता.
गुंतवणुकीसाठी निवड करतांना फंडाची कामगिरी निधी व्यवस्थापकाने घेतलेली जोखीम पोर्टफ़ोलिओ टर्नओव्हर (मंथन) खर्चाचे गुणोत्तर (एक्सपेन्स रेशो) आणि मानदंड सापेक्ष फंडाची कामगिरी या निकषांवर फ्रँकलीन इंडिया फ्लेक्झीकॅप फंड हा नव्याने गुंतवणुकीसाठी एक उत्कृष्ट फंड आहे.
आनंद राधाकृष्णन हे या फंडाचे निधी व्यवस्थापक असून या फंड घराण्यांचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. ते या फंड गटातील निधी व्यवस्थापकांपैकी सर्वाधिक अनुभवी निधी व्यवस्थापक आहेत. हा सक्रीय व्यवस्थापित फंड असला तरी गुंतवणूक राखून ठेवण्याच्या रणनीतीमुळे फंड गटात पोर्टफ़ोलिओ टर्न ओव्हर रेशो कमी असलेला हा फंड आहे. मागील सहा महिन्यांत निधी व्यवस्थापकांनी नव्याने कोणत्याही कंपनीचा नव्याने समावेश केलेला नसून गुंतवणुकीतून करुर वैश्य बँकेला वगळले. आयसीआयसीआय बँक इंफोसीस एचडीएफसी बँक, अॅक्सीस बँक यांची मात्रा कमी केली तरभारती एअर टेल युनायटेड स्पिरीट्स युनायटेड ब्रेवरेजेस आदित्य बिर्ला फॅशन्स यांची मात्रा वाढवली. फंडाचा पोर्टफ़ोलिओ ५२ कंपन्यांचा असून बँका, आयटी आणि टेलिकॉम ही सर्वाधिक गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे असून पोर्टफोलिओचा ४४ टक्के हिस्सा या तीन उद्योग क्षेत्रांनी व्यापला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत ३० ओक्टोबर रोजी ७३.६४ टक्के लार्ज कॅप १६.४३ टक्के मिड कॅप आणि ४.३७ टक्के स्मॉल-कॅप्सची व्याप्ती होती.
जे गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये फ्लेक्सी-कॅप फंडाचा समावेश करण्याचे नियोजन असलेल्या गुंतवणूकदारांनी फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंडाचा विचार करावा. सातत्यपूर्ण कामगिरी व्यतिरिक्त पोर्टफोलिओमध्ये मिड आणि स्मॉल-कॅप समभाग असूनही मुद्दल कमी न होऊ देण्यात हा फंड फ्लेक्झीकॅप फंड गटात अव्वल ठरला आहे. फंडाने, तीन- आणि पाच वर्षांच्या कालावधीत मानदंड सापेक्ष , अनुक्रमे ४.९२ टक्के आणि ८.२६ टक्के अधिक वार्षिक परतावा मिळवला आहे. एक वर्ष वगळता या फंडाची कामगिरी या फंड गटात सर्वाधिक मालमत्ता असलेल्या एचडीएफसी फ्लेक्झीकॅप पेक्षा सरस ठरली आहे. वरील कालावधीत या फंडातील एसआयपीद्वारे केलेल्या गुंतवणुकीवर ऊत्कृष्ट परतावा देणाऱ्या फंडांमध्ये फ्रँकलीन इंडिया फ्लेक्झीकॅप फंडाचा समावेश आहे. सध्याची बाजाराची पातळी पाहता या फंडात एसआयपीद्वारा गुंतवणूक करण्याची शिफारस आहे.

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top