अर्थ वल्लभ

फ्लेक्झीकॅप मधील दोन दशकांचा साथीदार

15 Jul 2024 • 1 min read

फ्लेक्झीकॅप मधील दोन दशकांचा साथीदार

ज्या म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांच्या पदरात दोन दशके भरघोस परताव्याचे माप टाकले त्या फंडात एचएसबीसी फ्लेझीकॅप फंडाचा समावेश आहे. फंड अस्तित्वात येऊन २० वर्षे आणि ७ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. फंडाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारी २००४ रोजी गुंतविलेल्या १ लाखाचे ११ जुलै रोजी रेग्युलर ग्रोथ मध्ये २१.४१ लाख झाले असून पहिल्या दिवशी पासून ५०००ची एसआयपीला सुरवात केलेल्या १२.२५ लाख गुंतवणुकीचे ११ जुलै रोजी रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसार ७०.८१ लाख झाले आहेत. एसआयपी परताव्याचा वार्षिक दर १५.०६ टक्के तर एक रक्कमी गुंतवणुकीचा वार्षिक दर १६.२१ टक्के आहे. फंडाची मालमत्ता जून २०२४ रोजी ४४३५ कोटी होती. फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा १ एप्रिल २०२४ पासून अभिषेक गुप्ता आणि वेणुगोपाल मंगत हे सांभाळत आहेत. फंडाच्या कामगिरीचा इतिहास थोडा बाजूला ठेवला आणि मागील दहा वर्षाचा विचार केला कर १० वर्षात फंडाने एक रक्कमी गुंतवणुकीवर १४.९७ टक्के तर १० वर्षात एसआयपी गुंतवणुकीवर १६.९९ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. प्रदीर्घ काळापासून हा एक लार्ज-कॅप केंद्रित आणि व्हॅल्यू इंव्हेस्टमेंट वर आधारित गुंतवणूक करणारा फंड आहे. ‘अॅम्फी’च्या ताज्या आकडेवारीनुसार सर्व फंड गटात फ्लेक्झीकॅप हा सर्वात मोठा फंड गट आहे. ज्या फंड गटात अनेक नवीन आणि जुने दिग्गज फंड चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करीत असले तरी हा फंड हा गुंतवणूकदारांसाठी मागील दहा वर्षात जोखीम समायोजित परतावाकर्मवारीत ‘टॉप क्वारटाइल’ मध्ये असणारा फंड आहे. जे गुंतवणूकदार नव्याने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) साठी नवीन फंडाच्या शोधात असतील अशा गुंतवणूकदारांसाठी हा एक आदर्श पर्याय होऊ शकतो.
एचएसबीसी फ्लेझीकॅप फंडाने दीर्घ कालावधीत मानदंड सापेक्ष जास्त परतावा दिला आहे. मागील दहा वर्षाचा विचार केल्यास (१ जुलै २०१४ ते ३० जून २०२४) फंडाने ३ वर्षाच्या चलत सरासरीनुसार २२.५४ टक्के वेळा १० ते १५ टक्के २१,५६ टक्के वेळा १५ ते २० टक्क्यांदरम्यान, आणि १,३८ टक्के वेळा २० टक्यांहून अधिक परतावा दिला आहे. केवळ ८.३२ टक्के वेळा ८ ते १२ टक्के दरम्यान परतावा दिला असून तीन वर्षे कालावधीत एकदाही तोटा नोंदविलेला नाही. गेल्या काही वर्षांपासून हे सातत्याने फंडाच्या कामगिरीत गुणात्मक सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. फंडाच्या पोर्टफोलिओची रचना अशी आहे की बाजाराच्या व्यापक तेजीत फंडाचा परतावा वाढतो. परंतु बाजार घसरणीत मुद्दल वाचविण्यात फंड यशस्वी होतो . २०१७ मध्ये पुनर्वर्गीकरणा नंतर फंडाची कामगिरी स्पर्धक आणि मानदंडाच्या तुलनेत, मागे पडलेला दिसला. परंतु जुलै २०२० नंतर मागील खड्डा भरून काढत व्यापक तेजीत एक अव्वल कामगिरी असलेला फंड म्हणून उदयास आला. गेल्या १० आणि ५ वर्षांच्या कालावधीत, फंडाने अनुक्रमे १८.०१ आणि १७.९२ टक्के पॉइंट-टू-पॉइंट परतावा दिला आहे. या कामगिरीमुळे ते या श्रेणीतील फंड आज ‘टॉप क्वारटाइल’ स्थान राखून आहे.
गेल्या १५ वर्षाचा (१ जुलै २००८ ते ३० जून २०२४) विचार केल्यास या फंडाने एचडीएफसी फ्लेक्सिकॅप, फ्रँकलिन फ्लेक्सी कॅप, आदित्य बिर्ला एसएल फ्लेक्सी कॅप आणि एसबीआय फ्लेक्सी कॅपपेक्षा सरस आहे. याच कालावधीत पाच वर्षांच्या रोलिंग रिटर्नस आधारावर, एचएसबीसी फ्लेक्सी कॅपने त्याचा मानदंड असलेल्या ‘निफ्टी ५०० टीआरआय’ला जवळपास ८४ टक्के वेळा मागे टाकले आहे. या कालावधीत जवळपास निम्म्या वेळेत १२ ते १७ टक्क्यांदरम्यान परतावा दिला आहे. फंडाचा अपसाइड कॅप्चर रेशो ११३.७ आहे, जो तेजीत मानदंड सापेक्ष अधिक कामगिरी करतो. डाउनसाइड कॅप्चर रेशो ८७.६७ असे सूचित करतो की तो घसरणी दरम्यान मुद्दलाला निर्देशांकापेक्षा कमी हानी पोहोचवतो.
फंडाच्या पोर्टफोलिओची बांधणी बांधणीत सामान्यतः सुदृढ ताळेबंद असलेल्या लार्ज-कॅप कंपन्यांच समावेश आहे. आघाडीच्या दहा गुंतवणुका लार्जकॅप आहेत. फंडाने सर्वाधिक २४ टक्के गुंतवणूक बँकांत केली असून एचडीएफसी बँक, आयसीआयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, अॅक्सीस बँक, पॉवर फायनांस कोर्पोरेषन यांचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्र असून तिसऱ्या क्रमांकावर औद्योगिक वापराच्या वस्तू आहेत. या व्यतिरिक्त आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एल अँड टी यांचा आघाडीच्या गुंतवणुकीत समावेश आहे. फंडाच्या निधी व्यवस्थापकात अलीकडच्या काळात दोनवेळा मोठे बदल झाले परंतु फंडाची व्यापक रचना आणि त्याचे मूल्य अबाधित राहिले. अलीकडच्या काळात लार्ज कॅप्सचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढलेले दिसते. पोर्टफोलिओमध्ये मिड आणि स्मॉल कॅपचा वाटा प्रत्येकी ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. एकंदरीत, भारताचा अर्थसंकल्प आणि अमेरिकेच्या अध्यक्षपादाची निवडणुकीमुळे बाजारात अस्थिरता येण्याचा संभव आहे. त्यामुळे मध्यम जोखमीसह दीर्घकालीन परताव्याच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड योग्य वाटतो

तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top