अर्थ वल्लभ

विचारल्याविण हेतू कळावा (सातत्य की अतिरिक्त जोखीम)

01 Jan 2024 • 1 min read

शिफारसप्राप्त फंडांचा त्रैमासिक आढावा घेतला जातो. या वर्षी १ जानेवारी सोमवारी आल्याने आणि ‘लोकसत्ता’कडे लेख शुक्रवारी पाठवायचा असल्याने २८ डिसेंबर रोजी हा आढावा घेतला. साहजिकच २७ डिसेंबरच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’ नुसार हा आढावा घेतला आहे. जानेवारी २०१४ पासून ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ ही शिफारसप्राप्त म्युच्युअल फंडांची यादी प्रसिद्ध होण्यास सुरवात झाली. मागील दहा वर्षात फंडांची मानदंड सापेक्ष कामगिरी आणि अस्थिरता (प्रमाणित विचलन) या दोन निकषांना फंड निवडीत प्राधान्य दिले. फंडांच्या रणनीतीत वेळोवेळी झालेले बदल आणि कामगिरीतील सातत्य हे सुद्धा विचारत घेतले जातात. या यादीत पंचतारांकित फंड नसतील कारण फंडाचे तरांकन  गत कामगिरीवर ठरते. हे फंड पंच तरांकित नसले तरी या फंडांनी कामगिरीत सातात्य राखलेले आढळेल. वाचकांना या यादीत बहुसंख्य फंड तीन किंवा चार तारांकन असलेले फंड आढळतील. सामान्यपणे असे दिसते की कामगिरी खालावते त्यावेळी निधी व्यवस्थापक कामगिरी सुधारण्यासाठी अतिरिक्त जोखीम घेऊन परतावा वाढवत असतात. असे फंडांकची निवड टळली जाते. विशेष प्रसंगी एखादा फंड वगळण्यापूर्वी किंवा एखाद्या फंडाचा समावेश करण्यापूर्वी त्या फंडाच्या कंपन्यांच्या निवड पद्धतीबाबत अधिक माहिती घेण्यासाठी निधी व्यवस्थापकाशी चर्चा केली जाते. बहुतेक निर्णय पोर्टफोलिओचे दीर्घकालीन स्वरूप आणि रचना लक्षात घेऊन फंड वगळले जातात किंवा फंडाचा समावेश केला जातो. 

सरलेले वर्ष नि:संशय स्मॉलकॅपचे वर्ष होते. लार्ज-कॅपच्या तेजीला २०२२ च्या जुलै ऑगस्ट पासून सुरवात झाली. परंतु वर्षाच्या सुरवातीपासूनच स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांमध्ये तेजी सुरु झाली आणि वर्ष अखेरपर्यंत या तेजीची व्याप्ती वाढली. ‘लोकसत्ता कर्ते’ म्युच्युअल प्राइम फंडांच्या यादीत लार्ज-कॅप, फ्लेक्सी-कॅप, व्हॅल्यू/कॉन्ट्रा मल्टीकॅप मिडकॅप स्मॉलकॅप आणि फोकस्ड इक्विटी फंड गटातील शिफारसींचा समावेश असतो. त्रैमासिक आढावा घेतांना शक्य तितके कमीत कमी बदल करण्याचा प्रयत्न असतो. कारण या शिफारसी स्थिर आणि दीर्घकालीन कामगिरीवर निवडलेल्या आहेत.  तथापि, खालील कारणांमुळे जुलै सप्टेंबर तिमाहीत शिफारसींमध्ये बदल झाले. फंड रणनीतीत वैविध्य आणण्यासाठी, विशेषत: साहसी फंडांसह काही उच्च-परताव्याचे पर्याय समाविष्ट करण्यासाठी. बाजाराने ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत लार्ज-कॅप कंपन्यांमध्ये विस्तृत तेजी अनुभवली. या आधी इंडेक्स वर जात होता परंतु तेजी निवडक समभागांत दिसत होती. साहजिकच निवडक लार्ज-कॅप केंद्रित फंड निफ्टी १०० पेक्षा अधिक परतावा मिळविण्यात यशस्वी ठरले. परंतु ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत तेजी सर्वव्यापी झाल्याने मागील तिमाहीच्या तुलनेत अधिक लार्जकॅप फंडांनी निफ्टी १०० च्या तुलनेत जास्त परतावा मिळविला आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत सरलेल्या तिमाहीतील कामगिरीमुळे अधिक  लार्जकॅप फंडांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. आता गुंतवणुकीत सक्रिय लार्ज-कॅप फंडांचा वाटा वाढविण्याची ही योग्य वेळ आहे.  आजपासून सुरु झालेली तिमाही मतदान पूर्व तिमाही असल्याने लार्ज-कॅप केंद्रित फंड गटात अधिक परतावा मिळण्याची शक्यता वाटते. सरलेले वर्ष व्हॅल्यू/कॉन्ट्रा फंड गटासाठी तुलनेने चांगल्या परताव्याचे वर्ष होते. कर्त्यांच्या यादीत ‘व्हॅल्यू ओरीएंटेड’ फंड’ आहेत आणि या फंडांनी मोठा परतावा दिला आहे. मिरे अॅसेट लार्ज कॅप हा एक मोठी मालमत्ता असलेला फंडाची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी झाली नाही. मागील त्रैमासिक आढाव्यात या फंडाच्या कामगिरी बाबत चिंता व्यक्त केली होती. हा फंड ‘कर्त्यां’च्या यादीतून वागळल्यास ‘कर्त्यां’ची वार्षिक सरासरी कामगिरी २८.९६ टक्के आहे. अलीकडे मिरे अॅसेट लार्जकॅप फंडाची कामगिरी दिवसेंदिवस खालावत असल्याचे दिसते. या फंडाची कामगिरी  इतिहासात भक्कम असली तरी या फंडाची कामगिरी अलीकडे गचाळ होत आहे. हा एक लार्ज-कॅप फंड आहे या फंडाच्या विद्यमान गुंतवणुकदारांनी कामगिरीवर बारीक नजर ठेवावी.  भविष्यात कामगिरी खालावत गेल्यास ‘मिरे’ला ‘कर्त्यां’च्या यादीतून वागळण्यात येईल. 

कर्त्यांच्या या यादीत मिडकॅप आणि स्मॉल कॅपचे सरासरीपेक्षा जास्त प्रमाण असलेले फंड आहेत. अशा फंडांचा विविध फंड गटात समावेश आहे. लार्ज-कॅप्स व्यतिरिक्त, अन्य फंड गटात या फंडांचा समावेश आहे. या यादीत केवळ स्मॉल-कॅप किंवा मिड-कॅपमध्येच गुंतवणूक करणारे फंड नाहीत. ज्यांचे प्रमाणित विचलन जास्त आहे असे फंड अस्थिर समजले जातात. अश्या फंडांचा समावेश यादीत टाळण्याचे आज पर्यंत धोरण होते. जोखीमांक जास्त असलेल्या गुंतवणूकदारांनी थेट स्मॉल-कॅपमध्ये गुंतवणूक न करता ज्या फंडात स्मॉलकॅपचे प्रमाण अधिक आहे अशा फंडांच्या माध्यमातून स्मॉलकॅप गुंतवणुकीचा लाभ घ्यावा अशी भूमिका होती. परंतु असे फंड आणि स्मॉलकॅप फंड यांच्यातील परताव्याची दरी वाढत असल्याने ज्यांनी स्मॉलकॅप मध्ये गुंतवणूक केली त्यांना याचा फायदा झाला. एक विश्लेषक या नात्याने कर्त्यांच्या २०२३ मधील कामगिरीबाबत समाधानाची भावना नाही. याचे कारण बहुसंख्य फंडांनी ‘निफ्टी ५००’ सापेक्ष चांगली कामगिरी केली तरी ‘निफ्टी २५०’ आणि ‘निफ्टी १००’ सापेक्ष कामगिरी समाधान कारक नाही. तथापि, वर्ष भरात ज्या १७ फंडांची शिफारस केली ते फंड ‘टॉप’ आणि ‘अप्पर मिडल क्वारटाइल’ मध्ये स्थान मिळविलेले आहेत ही समाधानाची बाब आहे.  या फंडाला अधिक वाचकाभिमुख करण्यासाठी नवीन वर्षात वाचकांच्या पसंतीच्या फंडांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न असेल. या पाक्षिक सदरातून वर्षभरात १६ ते १७ फंडांचे विश्लेषण प्रसिद्ध होते. या पैकी १० ते १२ फंड वाचक पसंतीचे असतील. तेव्हा संगणकाच्या पडद्यावर कळ फलकाच्या मदतीने तुमच्या पसंतीच्या किंवा चिंतेच्या फंडाबद्दल कळवा अधिकाधिक इमेल्समधून सुचविलेल्या फंडांचे विश्लेषण प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न असेल. तरच खऱ्या अर्थाने ‘विचारल्याविण हेतू कळावा तुमचा माझा स्नेह जुळावा हाती हात धरावे’ अशी परिस्थिती निर्माण होईल.

गुंतवणूक संधिंबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
+91 97024 90900

Keep in Perspective

Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.

Have a Financial Question?

Get greater clarity around your financial goals and investment decisions.

Start a Conversation →
Important Information

This article is intended for general informational and educational purposes only. It should not be treated as a guarantee of returns or a recommendation to invest in any particular mutual fund scheme or financial product. Mutual fund and other market-linked investments are subject to market risks. Investment suitability depends on individual goals, circumstances, time horizon and risk considerations. Please read relevant scheme-related documents carefully before investing.

Scroll to Top