आहे मनोहारी तरी …

देशातील पहिला म्युच्युअल फंड असलेल्या युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे सध्याची रूप असलेली युटीआय एएमसी उद्यापासून प्राथमिक विक्री ५५२-५२४ या किंमत पट्ट्यात करीत आहे. युटीआय एएमसीचे प्रवर्तक २१५२ ते २१६० कोटी मूल्याचे समभाग विकत असून सुचीबद्धते नंतर कंपनीचे बाजार मूल्य ७ हजार कोटी अपेक्षित आहे. या प्राथमिक विक्रीची नोंद घेणारा हा लेख

युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना १९६३ मध्ये लहान गुंतवणूकदारांकडून निधी संकलन करण्याच्या उद्देशाने झाली. तत्कालीन परिस्थितीत औद्योगिक आणि पायाभूत सुविधा विकासासाठी ज्या अर्थसंस्थांची स्थापन झाली त्यात युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया एक प्रमुख अर्थसंस्था होती. मातृकंपनीचे विभाजन दोन कंपन्यांत करून सध्याच्या रूपातील मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (एएमसी) १४ नोव्हेंबर २००२ रोजी अस्तित्वात आली. म्युच्युअल फंड मालमत्तेचे व्यवस्थापना व्यतिरिक्त संस्थात्मक गुंतवणूकदारानां पोर्टफोलिओ व्यवस्थापन (पिएमएस), कर्मचारी भविष्य निधी, राष्ट्रीय कौशल्य विकास निधी, पोस्टाच्या विमा योजना, एनपीएस, ऑफशोअर फंड, या सारख्या प्रत्येकी काही हजार कोटींच्या निधीच्या व्यवस्थापन करते. एप्रिल-जून तिमाहीतील मालमत्ता क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेली ही कंपनी क्रिसिल आकडेवारीनुसार व्यवस्थापनाखालील मालमत्ता क्रमवारीत देशातील दुसऱ्या क्रमांकाची मालमत्ता कंपनी आहे. म्युच्युअल फंडांच्या १.५४ लाख कोटीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन युटीआय करत असली तरी म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेत तळाच्या ३० शहरातील (बी-३०) मालमत्तेचा सर्वाधिक वाटा असलेली कंपनी आहे. केशरी आणि निळ्या रंगातील कलाशाचा अंतर्भाव असलेली युटीआयचे व्यापारचिन्ह भारतीय गुंतवणूकदारांना मागील अनेक वर्षांपासून परिचित आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी ७२.७ टक्के वाटा मालमत्ता व्यवस्थापन शुल्काच्या रुपात येतो. भारतीय म्युच्युअल फंड बाजारपेठेतील १२.८ टक्के खाती (फ़ोलिओ) कंपनीची असून खात्यांची संख्या १.०९ कोटींपेक्षा अधिक आहे. तालुक्यात आणि खेडेगांवात म्युच्युअल फंड म्हणजे युटीआय हे समीकरण गुंतवणूकदारांच्या मनात पक्के ठसले आहे. देशातील ५१ हजार विक्रेत्यांनी (एआरएन होल्डर्स) युटीआय कडे नोंद केली असून ही संख्या अन्य फंड घराण्यांच्या कडे नोंद असलेल्या संख्येत सर्वाधिक आहे. या सर्वांना व्यवहार करण्यासाठी युटीआय ताज्या आकडेवारीनुसार १६३ यूटीआय फायनान्शियल सेंटर, (शाखा)  २७३ व्यवसाय विस्तार प्रतिनिधी बिझिनेस डेव्हलपमेंट असोसिएट्स आणि मुख्य व्यवसाय प्रतिनिधी व ३३ अधिकृत विक्री सेवा स्थानके (पॉईंट ऑफ सेल्स) उपलब्ध आहेत. या व्यतिरिक युटीआय एएमसीच्या वेगवेगळ्या व्यवसायासाठी चार उपकंपन्या आहेत.

प्रवर्तकसध्याचा हिस्सा (%) विक्री करीत असलेल्या समभागांची संख्या (कोटी) प्राथमिक विक्री नंतरचा हिस्सा (%)
स्टेट बँक ऑफ इंडिया१८.५१.०५ ६.९८
आयुर्विमा महामंडळ१८.५१.०५ ६.९८
बँक ऑफ बरोडा १८.५१.०५ ६.९८
पंजाब नॅशनल बँक१८.५ ३८.०४२.५२
टी रोव२६३८.०४२५.९८

मालमत्ता व्यवस्थापन हा भारतात वेगाने वाढणारा व्यवसाय असला तरी या व्यवसायत कमालीची नियंत्रणे आणि उच्च अनुपालन आहे. युटीआय एएमसी ही स्थापन झाल्यापासून नफ्यात असलेली कंपनी आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये व्यवस्थापन खर्चावर (टीईआर) बाजार नियंत्रकांनी मर्यादा सतत वाढणाऱ्या नफ्याचा वृद्धीदर घटला. साधरणपणे मानदंडापेक्षा सरस कामगिरी करणाऱ्या फंडांना अधिक निधी मिळतो आणि वाढीव निधीमुळे कंपन्या व्यवस्थापन शुल्क लावू शकतात. सेबीकडे दखलकेलेल्या विक्री प्रस्तावासोबतच्या माहितीपत्रकानुसार ३१ मार्च २०१४ ते ३० जून २०२० या कालावधीत मालमत्ता ७४ हजार कोटींवरून १.३३ लाख कोटी होऊन देखील बाजार पेठेतील हिस्सा ८.२ टक्यांवरून ५.४ टक्क्यांवर आला. युटीआय म्युच्युअल फंडाच्या विविध फंडांची कामगिरी स्पर्धक फंड घराण्यांच्या फंडांच्या तुलनेत विशेष दखल घ्यावी अशी नसल्याने म्युच्युअल फंडांच्या मालमत्ता वाढीच्या दरात आणि बाजार हिश्यात घसरण झाली. मालमत्ता वाढीच्या वृद्धीदर घसरणीचा कंपनीच्या नफा क्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे. बाजार नियंत्रक सेबीचा व्यवस्थापन शुल्कात कपात हा एक कलमी कार्यक्रम राहिल्याने कंपनीच्या नफा क्षमतेवर परिणाम झाला आहे भविष्यात निष्क्रिय व्यवस्थापन असलेल्या फंडांची वाढती लोकप्रियतेमुळे युटीआयची नफा क्षमता कमी होईल दिसेल. विक्रेत्यांच्या मोबदल्यात कपात केल्यास मालमत्तेचा ओघ आटेल. युटीआय फंड घराण्याची ओळख तंत्रस्नेही अशी नाही कोरोन पश्चात युटीआयफंड घराण्याने परिचालन पद्धतीत सुधारणा केल्या तरी बाजार हिस्सा टिकविण्यासाठी  तंत्रज्ञान सुधारणा विक्री आणि विपणन खर्च आणि शाखा, कार्यालये सारख्या परिचलन सुविधांवर वाढीव भांडवली खर्च, मोठ्या प्रमाणावर करावा लागेल. प्रवर्तक विक्रीतून समभाग विकणार असल्याने आणि नवीन समभाग विक्रीसाठी उपलब्ध होणार नाहीत त्यामुळे या समभाग विक्रीचा भांडवली लाभ कंपनीला होणार नाही.

स्टेट बँकेच्या पाठबळामुळे  एसबीआय म्युच्युअल फंडाची मालमत्ता ८०८३ लाख कोटींवर पोहचली आहे मागील वर्षी एसबीआय एएमसीचा नफा वर्ष २०२० मध्ये ४३० कोटी तर युटीआयचा याच वर्षी नफा ३४८ कोटी होता. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांच्या परिचलन गुणोत्तरात युटीआय एएमसी निप्पॉन लाइफ असेट मॅनेजमेंट आणि एचडीएफसी असेट मॅनेजमेंट या दोन सूचीबद्ध स्पर्धकांपेक्षा उजवी असली तरी नफाखर्च पत्रकाच्या गुणोत्तरात निप्पॉन लाइफ असेट मॅनेजमेंटच्या तुलनेत युटीआय एएमसी कोसो मैल दूर आहे. असेट मॅनेजमेंट कंपन्यांची नफा क्षमता त्यांच्या मालमत्तेत असलेले समभाग आणि रोखे यांचे प्रमाण ठरवत असते. व्यवस्थापन शुल्क अधिक असल्याने समभाग गुंतवणूक रोख्यांपेक्षा अधिक नफा देणारी असते. युटीआयच्या मालमत्तेत रोखे मालमत्तेचे प्रमाण अधिक असल्याने स्पर्धकांपेक्षा युटीआयच्या मालमत्तेशी नफ्याचे प्रमाण कमी आहे. मालमत्ता व्यवस्थापन शुल्काचा मोठा वाटा विक्रेत्यांचा मोबदला देण्यात खर्च होतो. एचडीएफसी म्युच्युअल फंडाने आपली नफा क्षमता टिकविण्यासाठी विक्रेत्यांच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात कपात केली. युटीआयच्या मागे शाखांचे विस्तृत जाळे असलेल्या एखाद्या बँकेचे पाठबळ नसल्याने विक्रेत्यांच्या मोबदल्यात कपात केल्यास निधीचा ओघ आटेल. सहाजिकच बाजारपेठेतील वाटा टिकविण्यासाठी युटीआय म्युच्युअल फंड एचडीएफसी म्युच्युअल फंडासाराखे विक्रेत्यांच्या मालमत्तेचे निष्ठुरपणे पुनर्मूल्यांकन करू शकणार नाही. नफा क्षमता कमी असल्याने व्यावसायिक निधी व्यवस्थापक म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी युटीआयचा लगेच विचार करण्याची शक्यता कमी असल्याने सुचीबद्धतेनंतर स्पर्धक कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना जशी भांडवली वृद्धी मिळाली तशी भांडवली वृद्धी युटीआय एएमसीच्या गुंतवणुकीतून लगेच मिळण्याची शक्यता नाही. सबब या समभाग विक्रीची शिफारस सूचीबद्धते नंतर मिळणाऱ्या भांडवली लाभापुरती सिमित आहे. किरकोळ गुंतवणूकदार एका लॉटसाठी १४९५८ ते १३ लॉटसाठी १.९४ लाख ‘असबा’ पद्धतीने अर्ज करू शकतील. युटीआय एएमसीने समभाग विक्रीसाठी चढे मुल्यांकन केले नसल्याचा लाभ सूचीबद्धते पश्चात  १० ते १५ टक्के अधिमुल्य देऊ शकेल. थोडक्यात सुचीबद्धतेनंतर मिळणारा प्रतिसमभाग भांडवली लाभ १२० ते १३५ दरम्यान असेल. हे लक्षात घेऊन आणि जोखीमांक लक्षात ठेऊन अर्ज करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घ्यावा.

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top