निवृत्ती नियोजनाची तयारी

पैसे कमविण्यासोबत सेवानिवृत्तीसाठी बचत करणे आवश्यक आहे, परंतु हा सल्ला सहसा कोणीही गांभीर्याने घेत नाहीत. बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात, निवृत्तीच्या नियोजनाला इतके महत्त्व दिले जावे, असे केवळ ४६% लोकांचे मत आहे. बरेच लोक ४८ ते ५२ दरम्यान सेवानिवृत्तीच्या नियोजनाबद्दल गंभीर असतात. खरे तर या वयात गृहकर्ज फिटलेले असते, आर्थिक जबाबदाऱ्या अंतिम टप्प्यात असतात या वयात माणूस संचयाच्या टप्प्यात असतो. बचतीचा सर्वाधिक दर (डिस्पोजेबल इंकम) या वयात सर्वाधिक असते. म्हणून वसंत एम कुळकर्णी एलएलपी ने वय वर्षे ४८ ते ५४ दरम्यान असलेल्या नोकरी पेशातील मंडळीसाठी एका वेबिनारचे आयोजन केले आहे. या वेबीनार मध्ये भाग घेणाऱ्याच्या बद्दल आम्ही थोडे अधिक जाणून घेऊ इच्छितो. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
Scroll to Top