निप्पॉनचा दबदबा तर अॅक्सीसची हराकिरी
लोकसत्ता शिफारस प्राप्त फंडाचा तिमाही आढावा घेण्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली जूलै सप्टेंबर तिमाही बाजाराने या तिमाहीत टोकाची अस्थिरता अनुभवली. बफे यांच्या ‘ओन्ली व्हेन द टाइड गोजआउट डू यु डिस्कव्हर हुज बीन स्विमिंग नेक्ड” या वाक्याची आठवण करून देणारी ही तिमाही होती. तिमाहीची सुरवात मंदीने तर तिमाहीच्या अंती बाजारात तेजी अवतरली. सहाजिकच शिफारसप्राप्त फंडांचे पुनरावलोकन केले, तेव्हा तेजीत कमाई करणारे (अप साईड कॅप्चर रेशो) आणि मंदीत मुद्दलाला कमीत कमी हानी पोहोचणारे फंड कोणते ते बाजारातील अस्थिरतेमुळे दिसून आले. सरलेल्या तिमाहीत फारच कमी फंड आढळले ज्या फंडांनी त्यांच्या मानदंड सापेक्ष चांगली कामगिरी केली. तीनवर्षे पूर्ण केलेल्या फंडांच्या परिघातील ९२ टक्के फंडांची कामगिरी त्यांच्या मानदंड सापेक्ष खराब होती. शिफारशी आणि फंडांचे पुनरावलोकन केल्यानंतर दर तिमाहीत गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करणे अपेक्षित आहे. पुनरावलोकनात वगळलेल्या, एखाद्या फंडातून बाहेर पडणे आवश्यक आहे. त्या फंडातील एसआयपी थांबवणे आणि आतापर्यंत केलेली गुंतवणूक राखून ठेवणे किंवा काढून घेणे हा निर्णय वैयक्तिक असून याचा निर्णय गुंतवणूकदारांनी करावयाचा आहे. पुनरावलोकन अहवालांमध्ये, केवळ अशाच पोर्टफोलिओचा उल्लेख आहे जिथे प्रत्यक्ष बदल किंवा पोर्टफोलिओ आहेत ज्याकडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो. तुमच्या पोर्टफोलिओमधील काही मालमत्ता वर्ग बाजारातील तेजीमुळे किंवा मंदीमुळे मालमत्ता विभाजनात बदल झाला असेल तर मालमत्तेचे संतुलन साधण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. वर्षातून किमान एकदा प्रत्येकाने आपल्या पोर्टफोलीओची तपासणी करणे आवश्यक आहे. पोर्टफोलीओच्या पुनर्संतुलनाची संकल्पना या पूर्वीच्या लेखात तपशीलवार स्पष्ट केली आहे. तुमचा पोर्टफोलिओ सुस्थितीत ठेवण्यासाठी तुम्ही किती वेळ देता या वर तुमचे यश अवलंबून आहे.
तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:
Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.