सम्रुद्धीची तपपुर्ती – प्रिन्सिपल इमर्जिंग ब्लूचिप

फंड संशोधनाची एक सिद्ध पद्धत आहे. ‘क्वारटाईल मेथड’ या नांवाने जगभरात मान्यता असलेल्या या पद्धतीनुसार त्या फंड गटातील फंडांना कामगिरीनुसार उतरत्या क्रमवारीतील पहिले दहा टक्के ‘टॉप क्वारटाइल’ मध्ये उर्वरीत २२ टक्के फंड ‘अपर मिडल क्वारटाइल’मध्ये ३५ टक्के फंड ‘मिडल क्वारटाईल’ उरलेल्यांपैकी २२ टक्के ‘लोअर मिडल क्वारटाईल’मध्ये आणि तळाचे १० टक्के फंड बॉटम क्वारटाईल’मध्ये असतात. आज ज्या फंडाची आहे त्या फंडाने १२ नोव्हेंबर रोजी तेराव्या वर्षात पदार्पण केलेला हा फंड ‘टॉप क्वारटाइल’ मध्ये आहे. लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडाच्या यादीत या फंडाचा समावेश प्रथम  २०१४ साली झाला. सुरवातीची चार वर्षे मिडकॅप फंड म्हणून तर फंड सुसूत्रीकरणानंतर दोन वर्षे लार्ज अॅण्ड मिड-कॅप प्रकारात या फंडाचा अधून मधून समावेश होत होता. मागील दहा वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास टोकाच्या अस्थिरतेमुळे फंडाची कामगिरी कॅलेंडर वर्ष २०१६, २०१८ आणि २०१९ मध्ये समाधानकारक नसल्याने हा फंड या यादीचा भाग नव्हता.परंतु त्या पुढील वर्षात फंडाने जोरदार मुसंडी मारत सहा वर्षांपैकी तीन वर्षे हा फंड या यादीत होता तर तीन वर्षे हा फंड या यादीत नव्हता. मागील तीन वर्षे तीन मानदांडापेक्षा थोडा अधिक परतावा देणाऱ्यां फंडाने मार्च नंतर कामगिरीत झेप घेतलेली दिसते. जानेवारी २०२० पासून सर्व स्पर्धकांना मागे सारून हा फंड फंड गटात अव्वलस्थानी पोहचला आहे. संधोधानाच्या परिघातल ‘मॉर्निंगस्टार इंडिया ओपन एन्डेड इक्विटी फंड’ म्हणजे पाच वर्षे पूर्ण केलेले आणि गुंतवणूकीसाठी कायम खुले असलेल्या फंडापैकी हा फंड ५ वर्षे कालावधीत सर्वोत्तम एसआयपी परतावा दिलेल्या फंडाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. तर १० वर्षे कालावाधित्त या फंडाचे क्रमवारीतील स्थान पाचवे होते.   

रवि गोपालकृष्णन या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत.  समभाग संशोधन आणि निधी व्यवस्थापनाचा सत्तावीस वर्षांचा अनुभव पाठीशी असलेले रवि गोपालकृष्णन या फंड घराण्याचे समभाग गुंतवणूक प्रमुख आहेत. मागील आठ वर्षांपासून त्यांच्याशी नियमित भेट होत असते. या भेटीत ते त्यांच्या बाजाराबातची मते नेहमीच मांडत असतात.  समभाग गुंतवणुकीसाठी निवड प्रकियेची चौकट ठरल्यावर गुंतवणूक करणे सोपे असते असे ते मानतात. गुंतवणुकीतील सर्वात आव्हानात्मक भाग म्हणजे बाजाराच्या परिस्थितचा आढावा घेत समभागाची विक्री कधी हे ठरविणे. तथापि, अनुभवाने आणि एकापेक्षा अधिक व्यापार चक्रे अनुभवल्या नंतर हे काम सोपे होत जाते असे त्यांचे सांगणे असते.

ओपन एन्डेड लार्ज अॅण्ड मिड-कॅप फंड गटात तीनवर्षे पूर्ण झालेले २३ तर पाच वर्षे पूर्ण झालेले २२ फंड आहेत.  या फंडाच्या गुंतवणूक परिघात बाजार भांडवली मुल्यांनुसार पहिल्या २५० कंपन्या असतात. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की लार्जकॅप स्थैर्य तर  मिडकॅप वृद्धी देतात. ढोबळपणे लार्ज अॅण्ड मिड कॅप म्युच्युअल फंडामध्ये दोन प्रकारच्या योजना आहेत – पहिल्या प्रकारात लार्जकॅपची मात्रा अधिक असलेल्या आणि दुसऱ्या प्रकारात मिड कॅपकडे झुकलेले फंड. जागतिक आणि देशी रोकड सुलाभतेमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी रोज नव्या शिखराकडे कूच करीत आहेत. भारतीय निर्देशांकांनी जागतिक बाजारातील कल अनुसरून तेजीचे नवे उच्चांक नोंदवित आहेत या तेजीला मुखत्वे  लार्ज-कॅप समभागांची उसळी तेजीला कारण ठरत आहे. या तेजीत देखील समभागांचे ध्रुवीकरण झालेले दिसत आहे. मिडकॅप  आणि स्मॉलकॅप समभागांनी अजून तेजीत तितका सहभाग नोंदविलेला दिसत नाही.  अस्थिर असतात म्हणून मिड-कॅप फंड नको अशा गुंतवणूकदारांसाठी लार्जकॅपचे स्थैर्य आणि मिडकॅपचा परतावा देणाऱ्या फंडाची ही शिफारस आहे.  सेबीने म्युच्युअल फंडांचे सुसूत्रीकरण केल्यानंतर प्रिन्सिपल इमर्जिंग ब्लूचिप जो आधी मिड-कॅप म्हणून विकला जात होता त्याचा लार्ज अॅण्ड मिड-कॅप प्रकारात समावेश केला. ऑक्टोबर अखेरीस फंड मालमत्ता २११९ कोटी असून एकूण मालमत्तेपैकी ५१ टक्के लार्जकॅप, ३५ टक्के मिडकॅप आणि १०.५ टक्के स्मॉलकॅप घाटणीच्या समभागांत आहे.  या फंडाच्या गुंतवणुकीत वैविध्य जपणाऱ्या ६४ कंपन्यांचे समभाग असून पहिल्या पाच समभागा एकूण गुंतवणुकीच्या २२ टक्के हिस्सा आहे आणि पहिल्या तीन क्षेत्रांत (वित्तीय सेवा, रसायने आणि आरोग्य सेवा)  मिळून ४७ टक्के हिस्सा राखतात. रवि गोपालकृष्णन हे फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. ‘निफ्टी लार्ज अॅण्ड मिड-कॅप २५०’ हा फंडाचा मानदंड आहे. निधी व्यवस्थापकांनी बँकिंग आणि आर्थिक सेवा , रसायने, अभियांत्रिकी उद्योग आणि आरोग्य, यामध्ये  मानदंडाच्या तुलनेत अधिक गुंतवणूक केली आहे. तर निर्देशांकाच्या तुलनेत सॉफ्टवेयर, ऊर्जा आणि ग्राहकोपयोगी वस्तू यांच्यात गुंतवणुकीचे कमी प्रमाण आहे. निधी व्यवस्थापक गुंतवणुक सक्रीय व्यवस्थापित करतात. उदाहरणादाखल सप्टेंबर महिन्यांत फंडच्या गुंतवणुकीत ५ टक्के रोकड सममूल्य गुंतवणूक होती ऑक्टोबर महिन्यांत रोकड सुलभ साधनांचे प्रमाण कमी करून समभाग गुंतवणूक वाढविली.  सर्वाधिक गुंतवणूक १४.८ टक्के गुंतवणूक बँकिंग क्षेत्रात असून एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँक यांना सर्वोच्च स्थान दिले आहे. मागील वर्षभरात फंडाने रिलायंस इंडस्ट्रीज , इन्फोसिस आणि टीसीएस सारख्या ब्ल्यूचिप समभागांमध्ये गुंतवणूक वाढविली आहे. तर मिडकॅप प्रकारात डिक्सन टेक्नोलॉजीज, नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल, बाळकृष्ण इंडस्ट्रीज आणि अतुल या मिड कॅप समभागांनी गेल्या वर्षभरात आपली कामगिरी चोख बजावल्याने फंडाला कामगिरी क्रमवारीत आघाडी राखणे शक्य झाले. फंडाने एक, तीन, पाच, सात आणि दहा वर्षे कालावधीत मानदंडापेक्षा सरस कामगिरी केली आहे. या फंडाची ‘रेग्युलर ग्रोथ’ प्लानच्या एनएव्हीने मागील शुक्रवारी १२० ची पातळी ओलांडलेली असल्याने मागील बारा वर्षात बारा पट वृद्धी देणाऱ्या या फंडाचा  दीर्घकालीन वित्तीय ध्येयांच्या पूर्ततेसाठी वाचक आपल्या गुंतवणुकीत समावेश करू शकतात. 

image.png

रवि गोपालकृष्णन  समभाग गुंतवणूक प्रमुख प्रिन्सिपल म्युच्युअल फंड 

image.png

 

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top