उदायोन्मुख मल्टीकॅप

एप्रिल ते जून या कालावधीतील कामगिरीनुसार लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडांच्या शिफारस मल्टीकॅप गटात पीजीआयएम इंडिया इक्विटी डायव्हर्सीफाईड या फंडाचा पहिल्यांदा समावेश झाला. फंडाची शिफारस तीन महिन्यांतील कामगिरीवर असली तरी ३३ टक्के गुण एक वर्षाच्या कामगिरीला ४२ टक्के गुण २५ टक्के  टक्के गुण ५ वर्षाच्या कामगिरीला दिले जातात. पीजीआयएम इंडिया इक्विटी डायव्हर्सीफाईड फंडाने जुलै सप्टेंबर तिमाहीत टॉप क्वार्टाईल मध्ये स्थान मिळविले आहे.   हा फंड गेल्या एप्रिल जून या तिमाहीत अपर मिडल क्वार्टाईलमध्ये स्थान राखून होता त्या आधीच्या तिमाहीत मिडल क्वार्टाईलमध्ये आणि मागील वर्षीं ऑक्टोबर डिसेंबर  तिमाहीत फंड लोअर मिडल क्वार्टाईल मध्ये होता. मागील वर्षभरात फंडाने लोअर मिडल क्वार्टाईल  ते टॉप क्वार्टाईल अशी प्रगती केली आहे. लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड यादीत समावेशापूर्वी फंडाच्या कामगिरीवर बारकाईने नजर ठेवण्याचा प्रघात आहे. सहा तीमाहिंच्या कामगिरीच्या निरीक्षणानंतर एप्रिल जून तिमाहीतील कामगिरीनुसार या फंडाचा पहिल्यांदा कर्ते म्युच्युअल फंडात समावेश झाला. अनिरुद्ध नाहा पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाचे वरिष्ठ निधी व्यवस्थापक आहेत. पीजीआयएम इंडिया डायव्हर्सीफाइड इक्विटी फंड आणि पीजीआयएम इंडिया मिडकॅप फंडाचे ते निधी व्यवस्थापक आहेत. त्यांना समभाग आणि निश्चित उत्पन्न बाजारपेठांचा १८ वर्षांचा अनुभव आहे. पिजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडात दाखल होण्यापूर्वी ते  आयडीएफसी म्युच्युअल फंड , डीएसपी ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स तसेच अन्य फंडांचा निधी व्यवस्थापित करण्याचा त्यांना अनुभव आहे.


या योजनेत मुख्यत्वे एसआयपीमार्फत गुंतवणूक करण्याची शिफारस आहे. आपल्याकडे एकरक्कमी गुंतवणूक उपलब्ध असेल तर ही रक्कम लिक्वीड फंडात एक रक्कमी गुंतवणूक करून वर्षभरात एसटीपीच्या द्वारे पीजीआयएम इंडिया इक्विटी डायव्हर्सीफाईड फंडात गुंतवणूक करणे योग्य असेल. मागील पाच वर्षाच्या कालावधीत फंडाने बरा परतावा दिला आहे. मल्टीकॅप फंड गटातील या उदायोन्मुख मल्टीकॅप फंड हा अधिक जोखीम स्वीकारून दीर्घ मुदतीच्या एसआयपी साठी गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय आहे.’रेंसीस बायस ही एक मानसशात्रीय संकल्पना आहे. एखाद्या व्यक्तीस काही काळापूर्वी घडलेल्या गोष्टीपासून धडा न घेता अलीकडच्या काळातील घडलेल्या घटनांच्या आधारे वर्तमानातील निर्णय घेतले जाण्याचा कल असतो. रीसेन्सी बायस निर्णय क्षमतेतील त्रुटीचा एक प्रकार आहे ज्यामुळे बरेच गुंतवणूकदारांचे निर्णय चुकतात. अलीकडे एखाद्या फंडाची कामगिरी चांगली असेल तर कामगिरीच्या आधारे फंडात गुंतवणुकीचा निर्णय घेणे टाळतो म्युच्युअल फंडाच्या बाबतीत अलिकडचा कल विचारात घेऊन त्यांच्या दीर्घकालीन कामगिरीचा  विचार न करता त्यांच्या अलीकडील कामगिरीच्या आधारे म्युच्युअल फंडामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवितांना दिसतात. गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की अलीकडील चांगली कामगिरी ही भविष्यातही अशाच कामगिरीचे संकेत देत आहे. जेव्हा गुंतवणूकदार गुंतवणूकीचा निर्णय घेतात तेव्हा पूर्वाग्रहापेक्षा अलीकडची कामगिरी भुरळ पाडते. अनेकदा परतावा न देणाऱ्या जुन्या फंडाची कास सोडायला गुंतवणूकदार तयार नसतात. करण या फंडांनी भूतकाळात केव्हातरी त्यांना चांगला परतावा दिलेला असतो. पीजीआयएम इंडिया फंड घराण्याच्या ही तिसऱ्या फंडाची शिफारस असून आधी शिफारस केलेल्या दोन्ही फंडांची कामगिरी सकारात्मक आहे.

सेबीच्या नवीन नियमामुळे मल्टीकॅप फंडांना नेहमीच स्मॉलकॅप आणि मिडकॅप मधील गुंतवणूक प्रत्येकी २५ टक्क्यांपेक्षा कमी करता येणार नाहीत. या मुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप मधील एकत्रित गुंतवणूक ५० टक्क्यांपेक्षा अधिक ठेवावी लागल्यामुळे मल्टीकॅप फंड सध्याच्या मध्यम जोखमीच्या वर्गातून उच्च-जोखीम वर्गात मोडतील नवीन मानदंडांतर्गत, हा फंड गट लार्ज अॅण्ड मिडकॅप प्रकारापेक्षा अधिक जोखमीचा ठरेल. या फंड गटासाठी एस अँण्ड पी बीएसई २०० टी आर आय’ निर्देशांक विचारात घेऊन ‘रिस्क रिवॉर्ड स्कॅटरप्लॉट’ सोबत दिला आहे. या निर्देशांकात स्मॉलकॅप समभागांचा वाटा ५.७ टक्के तर मिडकॅपचा वाटा १६.२ टक्के आहे.

आतापर्यंत शिफारस प्राप्त फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये मल्टीकॅप फंडाची भूमिका पराताव्यापेक्षा स्थैर्य राखण्याची होती पराग पारीख, युटीआय इक्विटी आणि कॅनरा रोबेको इक्विटी डायव्हर्सीफाइड हे फंड कर्त्यांच्या यादीत अग्रभागी होते. या फंडाच्या जोडीला पीजीआयएम इंडिया इक्विटी डायव्हर्सीफाईड या नवीन फंडाची भर पडली आहे.

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top