Mutual Fund Performance

‘कर्त्यां’चे प्रगतीपुस्तक

म्युच्युअल फंड उद्योगातील व्यवस्थापना खालील मालमत्तेत जानेवारी २०२० मध्ये, डिसेंबरच्या तुलनेत ४.९ टक्के वाढ नोंदवत उच्चांकी २७.८५ लाख कोटींवर पोहचली आहे. एप्रिल २०१९ पासून या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेत ४.०६ लाख कोटींची (१७.०१%) वाढ झाली आहे. समभाग गुंतवणूककरणाऱ्या फोलीओंची संख्या जानेवारी ६.८९ कोटींवर पोहचली असून, म्युच्युअल फंडांच्या एकूण फोलीओच्या ७८ टक्के आहे. रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडाच्या  मालमत्तेच्या ऑक्टोबर डिसेंबर या तिमाहीअखेरील ओहटीनंतर मालमत्तेत जानेवारी महिन्यांत ५९ हजार कोटींची भर पडली मागील बारा महिन्यांत मालमत्तेत सर्वाधिक भर ऑक्टोबर २०१९ महिन्यांतील (९३२०३ कोटी) गुंतवणुक आणि जुलै २०१९ मधील सर्वात कमी (४५४४१ कोटी) गुंतवणुकीदरम्यान होती. समभाग गुंतवणूककरणाऱ्या फंडांच्या एकूण गुंतवणुकीपैकी सर्वाधिक वाटा लार्जकॅप फंडांकडे आहे.( तपशिला साठी आलेख क्रमांक १ पहावा) रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांनी सर्वाधिक ४.१९ लाख कोटींची गुंतवणूक कंपन्यांच्या रोख्यांत (कॉर्पोरेट डेट) मध्ये केली असून त्या खालोखाल ३.०७ लाख कोटींची गुंतवणूक ऋणपत्रात केली आहे. रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडाच्या गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांच्या गुंतवणुकीत झालेली घट ही लक्षवेधी गोष्ट आहे. वर्ष भरापूर्वी म्युच्युअल फंडांच्या एकूण मालमत्तेच्या १९ % गुंतवणूक गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांशी समंधीत होती. गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांना कोणी कर्ज अथवा कर्जरोख्यांत गुंतवणूक करण्यास तयार नसल्याने जानेवारी अखेरीस गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांतील फंडांच्या गुंतवणुकीचे प्रमाण घटून १०.९ टक्क्यांवर आले. समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडाच्या गुंतवणुकीचा विचार केल्यास बँका, वित्तीय सेवा, सॉफ्टवेअर, वैयक्तिक वापराच्या टिकाऊ वस्तू, आणि पेट्रोलियम ही सर्वाधिक पसंतीची क्षेत्रे आहेत. या क्षेत्रातील गुंतवणूक एकूण मालमत्तेच्या ५६ टक्के आहे. या पैकी केवळ बँकिंग आणि पेट्रोलियम कंपन्यांच्या उत्सर्जनात वाढ दिसली.

आलेख क्रमांक १

sector wise mutual fund distribution

फंड कामगिरीचा तुलनात्मक आढावा घेणाऱ्या या मालिकेतील पहिला भाग २० जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध झाला. गुंतवणूक विषयक वार्तांकन करणाऱ्या नियुताकालीकांप्रमाणे ‘लोकसत्ता’मधून  कर्ते’ म्युच्युअल फंड या यादीचे प्रतिबिंब त्या नंतर प्रसिद्ध झालेल्या ‘क्रिसिल म्युच्युअल फंड रँकिंग’मध्ये (सीएमएफआर) मध्ये दिसून आले. जे फंड ‘क्रिसिल परफोरमंस रॅकिंग’ (सीपीआर) मध्ये अव्वल स्थानमिळाले, त्या तील बहुतेक फंड नामांकित फंड घराण्यांबाहेरील फंड आहेत. उच्च मालमत्ता बाळगणाऱ्या फंडांची कामगिरी त्यांच्या लौकिकाला साजेशी  न झाल्याने त्यांना क्रिसिलाच्या

क्रमवारीत अव्वल स्थान गमवावे लागले.  हेच प्रतिबिंब या यादीत अगदी कमी फरकांनी उमटलेले दिसेल. या गोष्टीमुळे फंडांची निवड पद्धती काळाच्या कसोटीवर उतरल्याचे सिद्ध झाले आहे. फंड गुंतवणुकीवर परतावा हवा असेल तर फंड गुंतवणुकीच्या सक्रीय व्यवस्थापन आणि मुलभूत गुंतवणूक तत्वांचा उपयोग केल्यास १२ ते १५ टक्के वार्षिक नफा मिळविता येतो हे या फंड निवडीवरून दिसून येते.

Mutual Fund Performance

फंडएनएव्ही
(२० फेब्रुवारी २०२०)
मालमत्ता (कोटी)
(३१ जानेवारी २०२०)
परतावा
१ वर्षे
परतावा
३ वर्षे
परतावा
५ वर्षे
अँक्सीस ब्लूचीप फंड३३.४३११०७७२४.९७१८.४२१०.७६
अँक्सीस लॉंगटर्म इक्विटी फंड५१.८४२१९९७२७.२८१६.१९१०.८७
अँक्सीस मिडकॅप फंड४२.७६०४८१८२५.६२१७.६२१०.९९
अँक्सीस स्मॉलकॅप फंड३५.२८०२०८४३७.१७१५.०९१२.६९
बीओआय अँक्सा टॅक्स अॅडव्हांटेज फंड६०.१९०२७९३१.५३१३.६६०९.१०
कॅनरा रोबेको ब्लूचीप इक्विटी फंड२८.४६०३३०२४.२८१४.०२०९.४४
कॅनरा रोबेको कन्झ्युमर ट्रेंड्स फंड४५.७१०३८७२५.५११५.५५१२.०३
कॅनरा रोबेको इमरजिंग इक्विटीज फंड१०५.३४५६२५२१.९६१३.१११२.३६
डीएसपी फोकस्ड फंड२५.८३२०८९२३.७१०९.५३०७.७१
डीएसपी टॅक्स सेव्हर फंड५२.६३६३८१२१.२६१६.२३१०.१०
डीएसपी टॉप १०० फंड२२९.०४२६८४२१.८४०६.२९०६.५५
फ्रँकलीन इंडिया टेक्नोलॉजी फंड१८०.१९०२५५१४.४५०८.७३०८.२९
एल अँण्ड टी इंडिया व्हॅल्यु फंड३७.२४७६७४१३.७२१३.७२०९.१०
एल अँण्ड टी मिडकॅप फंड१४२.५७६३९११६.६६१२.१२१०.५०
एलआयसी एमएफ इन्फ्रास्ट्रक्चर फंड१५.१७००५५१९.२४१३.७२०३.७७
एलआयसी एमएफ लार्ज अँण्ड मिडकॅप फंड१७.०००६३९२४.५७१०.०७-
मिरॅ असेट इमर्जिंग ब्लूचीप फंड५९.५८०९८०६२३.३७१३.७२१५.११
निप्पॉन इंडिया लार्जकॅप फंड३५.५२१२७४१११.१८१०.०७०७.२९
निप्पॉन इंडिया फार्मा फंड१६५.१८२४५११२.५००६.५८०४.८७
पराग पारीख लॉंगटर्म इक्विटी२८.१३२७८४१७.४५१३.७३११.७३
पीजीआयएम लार्जकॅप फंड१७९.३२०३२९२१.२९०७.६७०९.११
प्रिन्सिपल इमर्जिंग ब्लूचीप११५.०६२२०२२१.२९१०.४०११.०१
सुंदरम फिनांशीअल ऑपॉच्युनीटी फंड०४८.१२०२४७२९.३९१२.०७०९.८२
टाटा लार्ज अँण्ड मिडकॅप फंड२२२.७५१६३१२०.९८०९.८५०७.६७
युटीआय इक्विटी फंड१६१.४५१०६५०२१.८४१३.५७०९.१६

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:
[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top