अस्थिरतेची धोक्याची घंटा

‘हर इंव्हेस्टर की ताकद’ हे बिरूद असलेल्या ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड’ (सेबीने)  ६ ऑक्टोबर २०१७ रोजी एक परिपत्रक काढून समभागांचे प्रमाणिकरण आणि म्युच्युअल फंडांचे वर्गीकरण केले. गुंतवणूकदारांना फंड निवड करणे सोपे व्हावे म्हणून तुलनेसाठी सर्व फंडांत समानता आणण्यासाठी हे परिपत्रक काढण्यात आल्याचे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार म्युच्युअल फंड योजनांचे वर्गीकरण पाच मुख्य गटात करून प्रत्येक गटासाठी उपप्रकार निश्चित केले. या उपप्रकारानुसार

लार्ज-कॅप फंड: बाजार भांडवल क्रमवारीनुसार पहिल्या १०० समभागांत एकूण मालमत्तेच्या किमान ८०% गुंतवणूक

मिड-कॅप फंड: बाजार भांडवल क्रमवारीनुसार १०१ ते २५०  समभागांत एकूण मालमत्तेच्या किमान ६५ % गुंतवणूक

स्मॉल-कॅप फंड: बाजार भांडवल क्रमवारीनुसार २५१ पुढील समभागांत एकूण मालमत्तेच्या किमान ६५ % गुंतवणूक

निश्चित केलेली असतांना मल्टीकॅप गटासाठी निधी व्यवस्थापकाला त्याच्या मर्जीनुसार समभाग निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. मल्टीकॅप गटात एकच अट होती ती म्हणजे समभाग गुंतवणूक किमान ६५ टक्के राखणे आवश्यक होते. शुक्रवारी सेबीने काढलेल्या परिपत्रकानुसार या स्वतंत्र्याचा संकोच करत, मल्टीकॅप फंडांना किमान २५ टक्के लार्जकॅप, २५ टक्के मिडकॅप आणि २५ टक्के स्मॉलकॅप प्रकारच्या समभागांत गुंतवणूक करणे सक्तीचे केले आहे. थोडक्यात निधी व्यवस्थापकांचे स्वातंत्र्य १०० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आले आहे.

म्युच्युअल फंडाच्या समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडांची ऑगस्ट अखेरीस मालमत्ता ७.६६ लाख कोटी असून या पैकी १.४६ लाख कोटी मालमत्ता मल्टीकॅप फंडांच्या अंतर्गत असून मालमत्तेचे क्रमवारीत हा फंड गट लार्जकॅप फंडांनंतर (एकूण मालमत्ता १.४९ लाख कोटी) दुसऱ्या क्रमांकावर असलेला फंड प्रकार आहे. सेबीच्या या नवीन विभाजना नुसार फंड घराण्यांना लारकॅपमधून १३००० कोटी मिडकॅप मध्ये तर २७७०० कोटी स्मॉलकॅप मध्ये संक्रमित करावे लागती. जानेवारी २०२१ आधी एकूण ४०७०० कोटींचे पुनर्वाटप होणार असल्याने या फंडगटातील एकूण ९५.२१ लाख फंड खाती (फोलीओ) बाधित होणार असल्याने या परिपत्रकाची आणि संभाव्य बदलांची दखल या स्थंभातून घेणे भाग पाडले.  मल्टीकॅप फंड गटातील पहिले दहा फंड आणि या फंडांच्या गुंतवणुकीचा ढाचा सोबतच्या कोष्टकात दिला आहे. बहुसंख्य मल्टीकॅप हे लार्जकॅप केंद्रित गुंतवणूक असलेले आहेत.

कोष्टक क्रमांक १

फंडमालमत्ता $गुंतवणुकीचा हिस्सागुंतवणुकीचा हिस्सागुंतवणुकीचा हिस्सा
(रुपये कोटी) लार्जकॅपमिडकॅप स्मॉलकॅप
कोटक स्टॅंडर्ड मल्टीकॅप २९७१४७९.९९१८.८१.२२
एचडीएफसी इक्विटी १९७९७ ८७.४५८.५४ ४.०१
मोतीलाल ओसवाल मल्टीकॅप ३५ ११२३९ ९०.३६ ४.९१४.७३
आदित्य बिर्ला सनलाईफ इक्विटी ११०२३६९.७१२४.३८ ५.९१
फ्रँकलीन इंडिया इक्विटी८५९१ ८०.८६ १२.०७ ७.०८
निप्पॉन इंडिया मल्टीकॅप८०५३५४.८१२५.५४१९.६६
अॅक्सीस मल्टीकॅप ६४३४९६.५४३.४६
आयसीआयसीआय प्रुडें. मल्टीकॅप५५९३७८.१९१३.४१८.४

$ रेग्युलर ग्रोथ

स्त्रोत: मॉर्निंगस्टार

सेबीच्या नवीन परिपत्रक १ जानेवारी २०२१ पासून लागू होणार असल्याने निधी व्यवस्थापकांना आपल्या गुंतवणुकांचे सुसूत्रीकरण करण्यास साडेतीन महिन्यांचा कालावधी उपलब्ध आहे. आघाडीच्या दहा फंडांपैकी निप्पॉन इंडिया मल्टीकॅप फंडाच्या गुंतवणुका नवीन नियमांच्या सर्वात जवळच्या तर अॅक्सीस मल्टीकॅप, आणि मोतीलाल ओसवाल मल्टीकॅप ३५ या फंडाच्या गुंतवणुका सर्वात विचलित होणाऱ्या आहेत. साहजिकच निप्पॉन इंडिया मल्टीकॅप फंड या परिपत्रकामुळे सर्वात कमी बाधित तर मोतीलाल ओसवाल मल्टीकॅप ३५ या फंडाच्या गुंतवणुकीत सर्वात अधिक अस्थिरता येईल. सर्वच मल्टीकॅप फंडांच्या विद्यमान निधी व्यवस्थापकांकडे मिडकॅप आणि स्मॉलकॅप व्यवस्थापित करण्याचे कौशल्य नाही. अनेक फंड घराण्याकडे पुरेसे निधी व्यवस्थापक नाहीत. निधी व्यवस्थापकांचा विचार केल्यास प्रशांत जैन यांचे कसब लार्जकॅप व्यवस्थापित करण्यात असल्याने त्यांच्या जोडीला चिराग सेटलवाड यांच्यासारख्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप गुंतवणुकीचा जाणकार निधी व्यवस्थापक नेमला जाऊ शकतो. डीएसपी किंवा एसबीआय या सारख्या फंड घराण्यांच्या मल्टीकॅप फंडांच्या निधी व्यवस्थापकांत बदल संभवतो.

बहुतेक फंड मल्टीकॅप फंडांचा व्यवस्थापन खर्च त्या फंड घराण्यांच्या स्मॉलकॅप फंडांच्या जवळ परंतु गुंतवणूक लार्जकॅप फंडांसारखी आहे म्हणजे मल्टीकॅप फंड हे फंड घराण्यांना आणि फंड वितरकांना दुभती गाय असल्याने ही दुभती गाय फंड घराणी सहजसहजी सोडणार नाहीत. ‘अॅम्फी’च्या माध्यमातून सेबी’कडे या या सध्या जाचक वाटणाऱ्या अटी सैल करण्याबात फेर विचार करण्याचा आग्रह धरला जाण्याची शक्यात अधिक वाटते. सेबी ४०७०० कोटींचे फेरवाटप होणार असल्याने सेबी ‘गुंतवणूकदारांचे हित’ लक्षात या अटी शिथिल करण्याची किंवा सध्याच्या वाटपाचा फेर आढावा घेण्याची शक्यता अधिक आहे. फंड घराणी मालमत्ता टिकविण्यासाठी दोन किंवा अधिक फंडांचे विलीनीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 वाचकांनी सध्या त्यांच्या मल्टीकॅप गुंतवणूकीतून बाहेर पडण्याचा आततायीपणा करू नये. परंतु या नवीन नियमांत बदल न होता सुधारित नियम या परिपत्रकानुसार राहिले तर बहुसंख्य गुंतवणूकदार जे मिडकॅप स्मॉलकॅप फंडात गुंतवणूक करणे टाळत होते असे कमी जोखीमांक असलेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या मल्टीकॅप गुंतवणुकीचा नव्याने विचार करावा लागेल. सध्या आम्ही ५ ते ७ वर्षे दूर असलेल्या वित्तीय लक्षांसाठी मल्टीकॅप फंडांची शिफारस करू. प्रस्तवित बदल तसेच राहिल्यास गुंतवणूकदारांना त्यांच्या सातवर्षे किंवा त्याहून कमी कालावधीत गाठायच्या वित्तीय लाक्ष्यांसाठी नवीन साधने हुडकावी लागतील.  साधनाचा विचार करण्याचा सल्ला देत असू. प्रस्तवित वाटपानुसार गुंतवणूकदारांना त्यांच्या ७ ते १० वर्षे दूर असलेल्या वित्तीय लक्षांसाठी मल्टी-कॅप फंड गुंतवणुकीचे पुनर्मूल्यांकन करण्याची आवश्यकता आहे.

हे प्रास्तावित बदल लक्षात घेऊन नवीन आणि सुधारतीत शिफारासींसह आपली भेट होईल. तो पर्यंत सुरक्षित राहा गुंतवणुकीचे रक्षण करण्यास ‘कर्ते म्युच्युअल फंड’ समर्थ आहेत.

 

गुंतवणूकदारांनी हे लक्षात घ्यायला हवे की बर्‍याच मल्टि-कॅप फंडांच्या गुंतवणुका त्यांच्या लार्जकॅप फंडांच्या गुंतवणुका ७०-८० टक्के सारख्या होत्या. नवीन नियमामुळे हे प्रमाण जास्तीतजास्त ५० टक्यांपर्यंत सीमित असेल. साहजिकच मल्टीकॅप फंड आधीच्या तुलनेत अधिक अस्थिर होतील”

कौंस्थूभ बेलापूरकर
संचालक (संशोधन) मॉर्निंगस्टार इंडिया.

 

” समभाग विभाजनाच्या अस्पष्टतेचा काही निधी व्यवस्थापक गैर फायदा घेत होते. अनेक मल्टी कॅप फंडांचे व्यवस्थापन लार्जकॅप फंडाप्रमाणे करून मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांचा समावेश करणे टाळत असल्याचे दिसत होते. या परिपत्रकामुळे मल्टीकॅप फंड लार्जकॅप न राहता खऱ्या अर्थाने मल्टीकॅप होतील.”

कृष्णा करावा
वरिष्ठ फंड विश्लेषक आयफास्ट फायनांशियल इंडिया.

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top