बदलत्या भारताचा लाभार्थी…

थीमॅटिक फंड एखाद्या विशिष्ट थीममध्ये गुंतवणूक करतात. यातील गुंतवणूक आर्थिक कल किंवा एखाद्या गोष्टीचा उपभोग किंवा बदल या भोवती फिरणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक असू शकते. ज्यात गुंतवणूक केल्याने फायदा होण्याची शक्यता असते, अशा संधींच्या शोधात एक इक्विटी फंड प्रकार आहे आणि साहसी गुंतवणूकदार या प्रकारच्या फंडाचा गुंतवणुकीसाठी या फंडाचा विचार करू शकतात. फ्रैंकलिन इंडिया अपच्युनिटीज फंड हा एक श्रीमंटिक फंड असून बदलत्या भारतातील गुंतवणूक संधींचा शोध घेणारा हा फंड आहे. विशेष परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संधींचा सक्रियपणे शोध घेऊन भांडवली लाभ मिळविण्यासाठी कॉर्पोरेट पुनर्रचना, सरकारी धोरणे आणि नियमांमधील बदल, तात्पुरत्या आव्हानांमुळे मूल्यांकन बाधित झालेल्या कंपन्या यांसारख्या अनेक घटकांचा या थीममध्ये समावेश असू शकतो. या फंडाची गुंतवणूक ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटलाइझेशन’ आणि ‘सस्टेनेबल लिव्हिंग’ या तीन सूत्रांभोवती गुंफलेली आहे. हा फंड फ्रँकलिनने २० परिघात दोन मार्गदर्शक तत्त्वांसह काही बदल करण्यात आले. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, गुंतवणुकीची रणनीती बाजारपेठेतील उदयोन्मुख थीम करणारा फंड आहे. ओळखणे आणि त्यांचा गुंतवणुकीत समावेश पोर्टफोलिओ रचना : करण्याबाबत शक्यता पडताळून पाहिली जाते. या फंडाचा पोर्टफोलिओत ८० टक्के गुंतवणूक याव्यतिरिक्त, पोर्टफोलिओचे उद्दिष्ट वर उल्लेख केलेल्या तीनपैकी कोणत्याही एका श्रीमचे पोर्टफोलिओवर वर्चस्व राहणार नाही याची खात्री करून गुंतवणुकीत लवचीकता राखणे हे आहे. पोर्टफोलिओ सक्रियपणे विकसित होत असलेल्या बाजारातील बदलांवर लक्ष ठेवून त्याच्या सापेक्ष गुंतवणुकीच्या संधींचा मागोवा घेत असतो.

प्रोत्साहन योजना म्हणजेच पीएलआय ही ‘मेक इन इंडिया’ या व्यापक धोरणाचा एक भाग आहे. कंपन्यांना उत्पादन वाढवण्यासाठी कर सवलत, आयात शुल्कात सूट, सुलभ भूसंपादन या स्वरूपात आहेत. पीएलआय योजनेचे फायदे कमी किमतीच्या दृष्टीने वस्तूंच्या अंतिम ग्राहकांना दिले जातात. या गोष्टीचे उत्तम उदाहरण म्हणजे विद्युत वाहने (ई-व्हेईकल). सध्या विद्युत वाहनांना मोठी मागणी नाही. पर्यावरणपूरक वाहनांकडे वळणे आवश्यक असल्याने या वाहनाच्या वापरकर्त्याला किमतीत अनुदानाच्या रूपात सूट देण्यात आली होती. पीएलआयमुळे अनेक उत्पादक कंपन्या कारखाने उभारत आहेत. अशा संधी ‘मेक इन इंडिया’ मुळे उपलब्ध झाल्या आहेत. या संधींचा शोध घेणारा हा फंड आहे.

इंटरनेटवर होणाऱ्या सर्व आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल अर्थव्यवस्था ही एक सामूहिक संज्ञा आहे. याला ‘वेब इकॉनॉमी किवा ‘इंटरनेटइकॉनॉमी’ असेही म्हणतात. तंत्रज्ञानाच्या आगमनाने आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे, डिजिटल आणि पारंपारिक अर्थव्यवस्था एकात विलीन होत आहेत. डिजिटल अर्थव्यवस्थेच्या या संकल्पनेबद्दल अधिक जाणून घेऊया.

इंटरनेटवर होणाऱ्या सर्व आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल अर्थव्यवस्था ही एक सामूहिक संज्ञा आहे. तंत्रज्ञानाच्या आगमनाने आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे, डिजिटल अर्थव्यवस्थेचा उदय झाला. डिजिटल अर्थव्यवस्थेची व्याख्या डिजिटल तंत्रज्ञानावर केंद्रित करणारी अर्थव्यवस्था म्हणून केली जाते. डॉन टॅपस्कॉट यांनी ‘डिजिटल इकॉनॉमी: प्रॉमिस अँड पेरिल इन द एज ऑफ नेटवक्र्ड इंटेलिजन्स’ या पुस्तकात १९९५ मध्ये ‘डिजिटल इकॉनॉमी’ हा शब्द पहिल्यांदा वापरला. मागील २५ वर्षांत डिजिटल मंचांची प्रचंड वाढ झाल्यामुळे आणि फिचर फोनकडून स्मार्ट फोनकडे संक्रमण झाल्याने अनेक गोष्टी कालबाहय झाल्या. उदाहरण द्यायचे तर परगावी प्रवासासाठी रेल्वेच्या तिकीट खिडकीवर प्राधान्य मिळू लागले. हा फंड अशा बदलांच्या लाभार्थी असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक करणारा फंड आहे.

पोर्टफोलिओ रचना :

या फंडाचा पोर्टफोलिओत ८० टक्के गुंतवणूक ‘मेड इन इंडिया’, ‘डिजिटलायझेशन’ आणि ‘सस्टेनेबल लिव्हिंग’ या थीमभोवती गुंफलेल्या आहेत. या थीमची निवड अनेक निकषांवर आधारित आहे. प्रथम, शाश्वत कल असलेल्या प्रदीर्घ काळ चालणाऱ्या थीम ओळखण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. यामध्ये श्रीमच्या दीर्घकालीन व्यवहार्यतेला समर्थन देणारे घटक आणि परिस्थितीचे कंपन्यांचे मूल्यांकन सापेक्ष विश्लेषण करणे आणि दुसरे म्हणजे, निधी व्यवस्थापक किरण रॉबस्टीन आणि त्यांचा गुंतवणूक संशोधकांचा चमू संभाव्य गुंतवणूक संधींचा सतत शोध असतो. या गुंतवणूक परिघातील प्रदीर्घ काळ व्यवसायातून रोकडनिर्मिती करणारे व्यवसाय ओळखणे हे या चमूचे मुख्य काम असते. “जी कंपनी व्यवसायातून रोख नफा मिळवू शकत नाही ती कंपनी गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्मिती करू शकत नाही.” असे किरण सबस्टीन म्हणाले. आकर्षक व्यवसाय प्रारूप आणि कार्यपद्धती टिकवून ठेवण्यासाठी वाजवी मूल्यमापन असलेल्या कंपन्यांचा शोध घेणे हे सतत सुरू असलेले काम असते. व्यवसायांची गुणवत्ता, त्यांच्या वाढीची शक्यता, त्यांच्या व्यवसायाचे प्रारूपाचा (बिझनेस मॉडेल) टिकाऊपणा आणि त्यांचे वाजवी मूल्यांकन यांचा विचार केला जातो. प्रत्येक कंपनीचे कठोर बॉटम-अप पद्धतीनुसार विश्लेषण करून वाढीच्या शक्यता, टिकाऊपणा आणि मूल्यमापनाच्या आधारे स्थान निश्चित केले जाते. फ्रैंकलिन इंडिया अपॉर्चुनिटीज फंडाने बाजाराच्या वेगवेगळ्या टप्प्यांत समाधानकारक कामगिरी केली आहे. एक ते दहा वर्षांच्या कालावधीत, त्याने निफ्टी ५०० आणि निफ्टी ५० या दोन्ही निर्देशांकांसापेक्ष अधिक परतावा मिळविला आहे. तीन, पाच आणि दहा वर्षांच्या कालावधीत फंडाने निर्देशांकांच्या तुलनेत सातत्याने जास्त परतावा दिला आहे.

किरण सेबॅस्टियन

फ्रैंकलिन इंडिया अपौच्युनिटीज फंडातील एकरकमी गुंतवणुरोधी कामगिरी

गुंतवणूक कालावधीफंडाचा परतावानिफ्टी ५००निफ्टी ५०
एक वर्ष२४.३०%१२.७४%१२.९४%
३ वर्षे३०.०५%२७.६८%२६.०३%
५ वर्षे११.०९%१२.३५%१२.८९%
१० वर्षे१५.२६%१४.१९%१३.३०%
१५ वर्षे१०.२८%१०.९२%

अधिक माहितीसाठी आणि गुंतवणूकिसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा
+91 97024 90900

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top