शिवामूठ भाग- ४ : निसरड्या धावपट्टीवरील शतकवीर

‘फंडाचा मागील परतावा भविष्यातील परताव्याची खात्री देऊ शकत नाही म्हणून गुंतवणुकीसाठी फंड निवड करतांना परताव्याकडे पाहू नका’ असा वैधानिक इशारा ‘सेबी’ नेहमीच देत असते तरीसुद्धा बहुसंख्य गुंतवणूकदार फंडाच्या भूतकाळातील परताव्याच्या निकषावर फंडाची निवड करतात. परतावा मिळविण्यासाठी निधी व्यवस्थापकाने घेतलेल्या जोखमीच्या तुलनेत कसा परतवा मिळविला आहे हे पाहून फंड निवड करण्याचा निकषाला जगभरात मान्यता मिळाली आहे. निर्देशांकाच्या तुलनेत उत्तम जोखीम व्यवस्थापित केलेल्या निधी व्यवस्थापकांचा शोध घेणाऱ्या मालिकेतील कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक श्रीदत्त भांडवलदार हे सर्वात जोखीम परतावा समतोल उत्तम सांभाळलेले निधी व्यवस्थापक ठरले. सर्व निधी व्यवस्थापकांची १ जुलै २०१५ ते ३० जून २०२० या कालावधीतील कामगिरी ‘शार्प रेशो’च्या आधारे निश्चित करण्यासाठी ४१ निधी व्यवस्थापकांची कामागिरी तपासली. उपलब्ध आधार बिंदू वापरून पहिल्या टप्प्यात सर्वात उत्तम जोखीम परतावा संतुलन राखलेल्या १० निधी व्यवस्थापक निश्चित केले. या १० निधी व्यवस्थाकांच्या कामगिरीला आणखी कठोर निकषांची चाळणी लावत या मालिकेसाठी ४ निधी व्यवस्थापकांची निवड केली. गुंतवणूकदारांना जोखीम समायोजित सर्वोत्तम परतावा दिलेल्या ४ निधी व्यवस्थापकांच्या कामगिरीची वाचकांना ओळख मागील ४ सोमवारी करून देत आहे.

मागील पाच वर्षे बाजारासाठी सर्वाधिक अस्थिर राहिलेली वर्षे होती. मागील पाच वर्षांत गुंतवणूकदारांची जोखीम व्यवस्थापित करण्यात कॅनरा रोबेको हे सर्वात यशस्वी फंड घराणे ठरले. मागील पाच वर्षात नावाजलेले निधी व्यवस्थापक ‘अल्फा’ निर्माण करण्यात (मानदंडापेक्षा अधिक परतावा) अयशस्वी ठरत असतांना कॅनरा रोबेको फंड घराण्याचे समभाग गुंतवणूक प्रमुख आणि निधी व्यवस्थापक म्हणून श्रीदत्त भांडवलदार यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करायचे यात ‘निसरड्या धावपट्टीवरील शतकवीर’ असे म्हणणे योग्य ठरेल. परंतु एक गोष्ट आवर्जून नमूद करायला हवी ती म्हणजे श्रीदत्त भांडवलदार यांची निधी व्यवस्थापक म्हणून ५ जुलै २०१६ पासून नेमणूक झाली.

श्रीदत्त भांडवलदार

(समभाग गुंतवणूक प्रमुख, कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड)

“आम्ही नेहमीच मुल्यांकनापेक्षा व्यवसायातून निर्माण होणाऱ्या रोकड सुलभ नफ्याला देतो.  याच कारणांनी कितीही मुल्यांकनाला तुलनेने कमी महत्व देतो. मुल्यांकन आकर्षक वाटते तरी एखादा अपवाद वगळता आम्ही धातू आणि खनिकर्म व्यवसायातील कंपन्यांत गुंतवणूक केलेली नाही. आमच्या दृष्टीने जे व्यवसाय ‘रिटर्न ऑन इक्विटी’ आणि ‘रिटर्न ऑन कॅपिटल’ निर्माण करू शकत नाहीत त्या संपत्तीची निर्मिती करू शकत नाही” इतके स्पष्ट बोलणाऱ्या निधी व्यवस्थापक असलेल्या फंडांची मागील पाच वर्षात कामगिरी चमकदार झाली नसती तरच नवल. “चांगले व्यवसाय जे गुंतवणूकदरांसाठी संपत्तीची निर्मिती करू शकतील अशा व्यवसायात आमची गुंतवणूक करायची तयारी असते. आमचे  फंड घराणे कायम एखाद्या कंपनीपेक्षा व्यवसायाकडे अधिक लक्ष देते. उद्योग व्यवसाय निश्चित केल्या नंतर आम्ही कंपन्यांकडे वळतो. एखादा व्यवसाय चांगला असेल पण तो व्यवसाय सांभाळणाऱ्याची नियत चांगली नसेल तर त्या व्यवसायात सोने जरी पेरले तरी माती होते, ज्यांची नियत खराब आहे असे प्रवर्तक आम्ही टाळले आहेत. प्रत्येक व्यवसायासाठी चांगले वाईट दिवस येताच असतात चांगले दिवस आले म्हणून आम्ही गुंतवणूक वाढवत नाही किंवा वाईट दिवस आले म्हणून समभाग विकून टाकत नाही. चांगले समभाग हे चांगल्या मित्रासारखे असतात. मॅन इज नोन बाय कंपनी ही किप्स’ अशी इंग्रजी म्हण आहे तसेच ‘द पोर्टफोलिओ मॅनेजर नोन बाय द बिझनेसेस ही ओन्स” असे त्यांचे सांगणे असते. आखूड शिंगी आणि बहु दुधी गाय बाजारात मिळत नाही. तुम्हाला एफएमसीजी क्षेत्रातील व्यवसायातून भरघोस नफा कमविणारी कंपनी कधीच स्वस्त मिळणार नाही. या व्यवसायातील एका बहुराष्ट्रीय कंपनीचा सर्वात कमी ‘पीई’ २५ होता आणि तो सुद्धा २००८ च्या वैश्विक वित्तीय संकटाच्या काळात. हा अपवाद वगळता आमच्या गुंतवणुकीत दीर्घकाल असलेल्या या कंपनीचे मुल्यांकन सरासरी ५० ते ७० दरम्यान राहिलेले आहे. या मुल्यांकानाला गुंतवणूक करून देखील गुंतवणूकदारांना नफा झाला आहे. भांडवली वस्तू उद्योगांच्या बाबतीत बोलायचे तर या कंपन्यांचे मुल्यांकन कमी असते परंतु ते गुंतवणूकदारांना चकवा देणारे ठरते. व्याजदर कमी झाले खेळते भांडवलाच्या खर्चा मध्ये बचत झाली म्हणून आम्ही भांडवली वस्तू उद्योगातील कंपन्या खरेदी करत नाही. आमच्यासाठी व्यवसायातील रोख नफ्याची टक्केवारी किती हे महत्वाचे आहे. आम्ही ‘एनबीएफसी’ मध्ये कधीच अवास्तव गुंतवणूक केली नाही. वेळीच आम्ही आमच्या गुंतवणुका काढून घेतल्या. औषध निर्मिती आणि आरोग्य निगा क्षेत्रात आम्ही आमच्या गुंतवणुकीचा परीघ महाग मुल्यांकन असलेल्या परंतु एकाधिकारशाही असल्याने नफाक्षम उत्पादने असणाऱ्या कंपन्यांना महत्व दिले. या क्षेत्रातील आमची गुंतवणूक असलेल्या कंपन्यांची संख्या पाच पेक्षा अधिक नाही. आम्ही मागील पाच वर्षात अनेक गुंतवणूक केलेल्या कंपन्यांतून वेळीच नफा वासुली केली. शेवटी हा गुंतवणूकदारांच्या कष्टाचा पैसा असल्याने अवास्तव जोखीम आम्ही कधीही घेतली नाही आणि मला वाटते हेच आमच्या यशाचे गमक आहे.” कॅनरा रोबेको फंड घराण्याच्या यशाचे गमक त्यांनी सांगितले.

निधी व्यवस्थापकाने अतिरिक्त जोखीम स्वीकारून अधिक परतावा मिळविल्यापेक्षा कमी जोखीम घेऊन कमी परतावा देतो तेव्हा त्या निधी व्यवस्थापकाने भांडवलाच्या सुरक्षीततेकडे अधिक लक्ष दिलेले असते. एखाद्या निधी व्यवस्थापकाची कामगिरी त्याने मिळविलेल्या पराताव्यावर न ठरता त्याच्या कामगिरीचे मूल्यमापन निधी व्यवस्थपकाच्या वेगवेगळ्या कालखंडातील प्रमाणित विचलानावर (जोखमी नुसार) ठरायला हवे. ‘शार्प रेशो’ हे  जोखीम-समायोजनाचे मानक आहे. एक एकक परतावा मिळविण्यासाठी किती एकक जोखीम स्वीकारली हे शार्प रेशो सांगतो. कायम चांगला (अधिक परतावा) देणाऱ्या फंडांच्या शोधात असणारे गुंतवणूकदार आपल्या सल्लागाराला फंड घराण्यापेक्षा इथून पुढे फंडाचे निधी व्यवस्थापक कोण आणि त्यांनी जोखमीचे व्यवस्थापन कसे केले हे सांगा असा प्रश्न विचारला तर ते या लेख मालिकेचे यश ठरेल. निधी व्यवस्थापकांच्या जोखीम व्यवस्थापनाची ओळख करून देणाऱ्या या मालिकेने केवळ परतावा महत्वाचा नाही तर जोखीम व्यवस्थापित करणे समायोजित परताव्याचे महत्व गुंतवणूकदारांच्या मनात नक्कीच अधोरेखित केले असेल अशी आशा वाटते.

फंडफंड गटवार्षिक परतावावार्षिक परतावावार्षिक परतावाप्रमाणित विचलनप्रमाणित विचलनप्रमाणित विचलन
१ वर्ष३ वर्ष५ वर्षे१ वर्ष३ वर्ष५ वर्षे
कॅनरा रोबेको ब्लूचीप इक्विटीलार्जकॅप४.३४७.२८७.९८२१.३६१८.२४१७.०६
कॅनरा रोबेको कंझ्युमर ट्रेंड्सथीमॅटिक२.८०५.५९८.५५२७.७१ २०.०१ १९.२७
कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्वीटीज लार्ज अॅण्ड मिडकॅप-०.४६ १.९७८.५६३१.९४२१.६३२१.१९
कॅनरा रोबेको डायव्हार्सी फाईड मल्टीकॅप१.०६५.७९६.७९२८.१३ १८.७११८.१८
कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हरइएलएसएस०.२०५.७६६.८१२९.०७१९.७४१८.२८
कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चरसेक्टरल-१३.४९-६.७४०.१२३२.२७२४.०६२१.९९
कॅनरा रोबेको स्मॉलकॅपस्मॉलकॅप-१.५५----३६.८७----

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top