प्रचीतीविण अवघे व्यर्थ…

लोकांतात राहण्याची सवय असलेल्यांना एकांत खायला उठतो. तर एकांत प्रिय असलेल्यांना गर्दीचा त्रास होतो. जागतिक संकटाच्या भयाने सर्वांनाच मर्यादित एकांतात राहावे लागले आहे. या एकांताचा उपयोग आपल्या गुंतवणुकीचा मागोवा घेतल्यास आपल्याच चुका आपल्याला दिसून येतील. आणि घसरलेला बाजार मालमत्ता विभाजनाचे महत्व नक्कीच पटवेल. मालमता विभाजनात फारच कमी लोकांना गुंतवणुकीत रोखे फंड असल्याचे महत्व पटते. रोखे फंड ही सुरक्षित गुंतवणूक आहे या कल्पनेला सप्टेंबर २०१८ आयएल अॅण्ड एफएस प्रकरणानंतर तडा गेला दरम्यानच्या काळात रोखे बाजारात अनियमिततेची संकटे अद्याप सरलेली नाहीत. त्यामुळे रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांची गुंतवणुकीसाठी निवड करतांना कोणते निकष असावेत हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे. परताव्यापेक्षा जोखीम व्यवस्थापन, आणि रोकड सुलभतेला प्राधान्य दिले पाहिजे. इतर रोखे गुंतवणूक पूर्णपणे परताव्याच्या कामगिरीवर (एनएव्ही) वर आधारित असू नयेत. रोखे गुंतवणुकीसाठी फंड निवडतांना पोर्टफोलिओ-आधारित निकष, जोखीम-समायोजित परतावा, गुंतवणुकीचे ध्रुवीकरण रोख्यांची गुणवत्ता (रेटिंग) गुंतवणूक केलेल्या रोख्यांची उर्वरित मुदत यासारख्या प्रमुख बाबींचा विचार करून म्युच्युअल फंडांची निवड केली जाते. ‘सेबी’ने कोणत्या फंड गटात रोख्यांची किती मुदत असावी या बाबतीत स्पष्टपणे नमूद केले आहे. सेबीच्या म्युच्युअल फंड वर्गीकरणापश्चात रोख्यांची ‘उर्वरित मुदत’ या निकषाला साहजिक कमी महत्व प्राप्त झाले आहे

रोखे गुंतवणूक हे संपत्ती निर्मितीचे साधन नसून भांडवलाची सुरक्षितता आणि नियमित उत्पन्न देणारे साधन आहे. साहजिकच  साधनातून कमाईच्या उद्देशाने बघणे चुकीचे आहे. रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांकडून बँकेच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजा इतके परंतु व्याजापेक्षा कर कार्यक्षम उत्पन्न मिळविणे हा उद्देश असायला हवा. मालमत्ता विभाजनाच्या ‘शंभर वजा वय’ या सूत्रानुसार आपल्या वयाइतकी गुंतवणूक निश्चित उत्पन्न रुपात हवी.  बँकेचे बचत खाते, मुदत ठेवी, पीएफ,(कर वजावट वगळून), एन्डॉवमेंट पॉलिसी, .. हे सर्व निश्चित उत्पन्न गुंतवणूक साधनांना म्युच्युअल फंडातील फंड प्रकार पर्याय आहेत. रोखे गुंतवणूक करणारे फंड हे बँकेची मुदत ठेव नव्हे, रोखे गुंतवणूक करणारे फंड हे परताव्याची हमी असलेले उत्पन्न साधन नव्हे. रोखे गुंतवणुकदाराला बाजाराशी निगडीत (व्याज दराशी) समंधीत जोखीम, रोख्यांच्या गुणवत्तेशी निगडीत (रेटिंग) जोखीम, फंडाने गुंतवणूक केलेल्या रोख्याच्या मुदतपूर्ती नंतर मुद्दल परत न मिळण्याची (डिफॉल्ट) जोखीम, एखाद्या विशिष्ठ कंपनीचे रोखे विकले न जाण्याचा धोका, रोकड सुलभता आटण्याची (खरेदीदार न मिळणे जसे की यस बँकेचे रोखे खरेदी करावयास कोणी तयार नसणे) जोखीम, या जोखीमांशी रोखे गुंतवणूकदाराला सामना करावा लागतो.

रोखे गुंतवणुक करणाऱ्या म्युच्युअल फंडाची शिफारस करत असतांना एखाद्या विशिष्ठ कंपनीच्या रोख्यांच्या गुंतवणुकांचे ध्रुवीकरण किती आहे हे सुद्धा महत्वाचे. एका फंडाच्या शॉर्टटर्म डेट फंडात त्याच उद्योग समुहाने प्रवर्तितकेलेल्या वीज निर्मिती, गैर बँकिंग वित्तीय कंपनी, आणि गृहवित्त पुरवठाकंपनीचे मिळून १५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक होती. वर वर पाहता फंडाच्या गुंतवणुकीत वैविध्य दिसले तरी भिंगातून पाहील्यास एकाच उद्योग समूहाच्या रोख्यांत ध्रुवीकरण झालेलेल दिसले. असे वेगवेगळे निकष लाऊन निवडलेल्या फंडाच्या या यादीचा मालमत्ता विभाजनासाठी वाचक उपयोग करतील अशी आशा वाटते. ज्यांनी गुंतवणुकीत रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांना मालमत्ता विभाजन तत्वानुसार योग्य स्थान दिले त्यांना त्याची प्रचीती येत असेल या बद्दल शंका बाळगण्यास वाव नाही. म्हणून रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडाची घ्यायला हवी. 

 फंड प्रकार आणि शिफारस प्राप्त फंड

  • लिक्वीड फंड
  • आयडीएफसी कॅश फंड
  • कॅनरा रोबॅको लिक्वीड फंड

 

  • ओव्हरनाईट फंड
  • निप्पॉन इंडिया मनी मार्केट फंड
  • एल अॅण्ड टी मनी मार्केट फंड

 

  •  लो ड्युरेशन फंड
  • अॅक्सीस ट्रेझरी अॅडव्हांटेज फंड
  • डीएसपी लो ड्यूरेशन फंड

 

  • अल्ट्राशॉर्ट ड्युरेशन फंड
  • आयडीएफसी अल्ट्राशॉर्ट टर्म फंड
  • डीएसपी अल्ट्राशॉर्ट ड्युरेशन फंड

 

  • शॉर्ट ड्युरेशन फंड 
  • एल अॅण्ड टी शॉर्ट टर्म बॉंड फंड
  • अॅक्सीस शॉर्ट टर्म बॉंड फंड

 

  • मिडीयम टू लॉंग ड्युरेशन फंड 
  • आयडीएफसी बॉंड फंड (इंकम फंड)
  • कॅनरा रोबॅको इंकम फंड

 

  • मिडीयम ड्युरेशन फंड
  • आयडीएफसी बॉंड फंड (मिडीयम टर्म प्लान)
  • एसबीआय मॅग्नम मिडीयम ड्युरेशन फंड

 

  • लॉंग ड्युरेशन फंड
  • एसबीआय मॅग्नम कॉन्स्टंट म्यॅच्युरिटी फंड
  • निप्पॉन इंडिया निवेश लक्ष्य फंड

 

  • कॉर्पोरेट बॉंड फंड
  • डीएसपी कॉर्पोरेट बॉंड फंड
  •  कॅनरा रोबॅको कॉर्पोरेट बॉंड फंड

 

  • गिल्ट फंड
  • आयडीएफसी जीसेक फंड
  • निप्पॉन इंडिया गिल्ट सेक्युरीटीज फंड

 

  • बँकिंग अॅण्ड पीएसयु डेट फंड
  • आयडीएफसी बँकिंग अॅण्ड पीएसयु डेट फंड
  • एलआयसी एमएफ बँकिंग अॅण्ड पीएसयु डेट फंड

 

  • क्रेडीट रिस्क फंड 
  • आयडीएफसी क्रेडीट रिस्क फंड
  • एसबीआय क्रेडीट रिस्क फंड

 

  • डायनॅमिक बॉंड फंड 
  • आयडीएफसी डायनॅमिक बॉंड फंड
  • डीएसपी स्टॅटेजीक बॉंड फंड

म्युच्युअल फंड विषयी अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top