सही है

समभाग गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार मिड कॅपच्या मोहात पडला नाही असे अभावानेच आढळते.    एलआयसी एमएफ मिड कॅप फंडाच्या ताज्या पतनिश्चितीमुळे या फंडाचा समावेश निवडक दर्जेदार मिड कॅप फंडांमध्ये झाला आहे.   पतनिश्चितीच्या   पहिल्याच प्रयत्नांत नव्याने गुंतवणुकीसाठी आश्वासक पत मिळणे हे एखाद्या फलंदाजाने कसोटी पदार्पणात द्विशतक झळकावण्यासारखे आहे.

मागील आठवड्यात मॉर्निंगस्टार आणि व्हॅल्यु रिसर्च ऑनलाईन या म्युच्युअल फंडांचे पतमापन करणाऱ्या संस्थांनी म्युच्युअल फंडांची पत जाहीर केली. वेगवेगळ्या फंडांना मिळालेल्या मानांकनांपैकी एलआयसी एमएफ मिडकॅप फंडाच्या रेग्युलर ग्रोथला मॉर्निंगस्टारने फोरस्टार आणि व्हॅल्यु रिसर्च ऑनलाईनने ‘थ्री स्टार’ रेटिंग दिले. एलआयसी एमएफ मिडकॅप फंडाच्या डायरेक्ट ग्रोथ पर्यायाला सर्वोच फाईव्ह स्टार रेटिंग मिळाले. एखाद्या फंडाला पहिल्या पहिल्यांदाच फोर स्टार आणि फाईव्ह स्टार रेटिंग मिळणे हे एखाद्या फलंदाजाने कसोटी पदार्पणात द्विशतक झळकावण्याबरोबरीचे आहे. अशाच आश्वासक कामगिरीची अपेक्षा  ४ सप्टेंबर २०१७ रोजी या “पायी घागऱ्या करिती रुणझुण” या शीर्षकाच्या लेखातून केली होती.

पतनिश्चितीच्या पहिल्याच प्रयत्नांत नव्याने गुंतवणुकीसाठी आश्वासक पत मिळाल्यामुळे या यशामागील कारणांची दाखल घेणे भाग आहे. फंडाच्या गुंतवणुकीसाठी निवड करतांना शाश्वत व्यवसायातील कंपन्या, दर्जेदार व्यवस्थापन कौशल्य, भांडवली कार्यक्षमता, स्पर्धात्मक फायदा, व्यवसाय वृद्धीच्या संधी, या निकषांवर पात्र ठरलेल्या कंपन्यांतून होते. कंपनीचा समावेश फंडाच्या गुंतवणुकीत झाल्या नंतर निधी व्यवस्थापक त्रैमासिक आणि वार्षिक निकालांच्या आधारे पोर्टफोलीओचे सक्रीय व्यवस्थापन केले जाते. वरील निकषांत न बसलेली कंपनी गुंतवणुकीतून वगळली जाते. फंडाची पहिली एनएएव्ही २६ फेब्रुवारी २०१५ रोजी रोजी जाहीर झाली या दिवशीपासून फंडात ५००० नियोजनबद्ध गुंतवणूक केलेल्या १.८० लाखाचे ८ मार्च २०१८ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार वार्षिक २०.०६ टक्के दराने २.४१ लाख झाले आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत वाहन निर्निती पूरक उद्योग, रसायने आरोग्य निगा, रोकड सलग्न गुंतवणुका, खाजगी बँका ही आघाडीची पाच गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे असून, आयसीआयसीआय बँक, मदरसन सुमी टाटा केमिकल्स, रॅमको सिमेंट, आणि अरबिंदो फार्मा या सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्या आहेत. मागील वर्ष भरात फंडाच्या गुंतवणुकीत सर्वसाधारणपणे ४५ ते ४७ कंपन्यांचा समावेश असून पहिल्या पाच गुंतवणुकांचे एकूण गुंतवणूकिशी प्रमाण १९ टक्के आणि पहिल्या गुंतवणूकांचे एकूण गुंतवणूकीशी प्रमाण ३५ टक्के राखलेले आहे. आघाडीच्या कंपन्यांतून समभाग केंद्रित जोखीम पत्करून शेपटाकडील कंपन्यांतून जोखमीचे विकेंद्रीकरण केले आहे.

जानेवारी नंतर बाजारात झालेल्या पडझडीचा सर्वाधिक फटका मिडकॅप समभागांना बसला आहे. अशा परिस्थितीत एकूण गुंतवणुकीच्या १० टक्के गुंतवणूक रोकड समरूप असलेले जे मोजके फंड आहेत त्या पैकी हा एक फंड आहे. समभाग गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार मिडकॅपच्या मोहात पडला नाही असे अभावानेच आढळते. येत्या एप्रिलपासून फंडाच्या प्रमाणिकरणा नंतर सर्वच फंड एकसमान दिसतील आणि फंडाच्या गुंतवणुकीचा ढाचा बदलल्यामुळे मागील परताव्याच्या कामगिरी नुसार फंडाची निवड करणे व्यर्थ असेल. अशा परिस्थितीत एलआयसी एमएफ मिडकॅप फंडाच्या ताज्या पतनिश्चितीमुळे या फंडाचा समावेश निवडक दर्जेदार मिडकॅप फंडांमध्ये झाला आहे. कसोटी क्रिकेट संघात निवडकेलेल्या खेळाडूने पदार्पणात द्विशतक झळकाविल्याचा जो आनंद निवड समितीसदस्यांना होईल तसाच आनंद विश्लेशक या नात्याने होत आहे. सचिन रेळेकर यांच्या सारख्या कसबी फंड व्यवस्थापनाखाली हा फंड भविष्यात अव्वल कामगिरीच्या बळावर गुंतवणूक दारासाठी संपत्ती निर्मिती करेल या बद्दल आशा आहे. आपल्या गुंतवणूक सल्लागराच्या शिफारसीनुसार या फंडाचा गुंतवणुकीत समावेशाचा निर्णय करावा.

 

अधिक माहितीसाठी  खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top