गुंतवणुकीचा वार्षिक आढावा
आपण वर्षातून एकदा आपली वैद्यकीय तपासणी करून घेतो. त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागारासोबत वर्षातून एकदा आपण पोर्टफोलिओचा आढावा घेणे गरजेचे आहे. आपल्या सल्लागाराला वर्षातून एकदा भेटा तुमचा पोर्टफोलिओ वित्तीय ध्येयांनुसार कामगिरी करीत आहे, याची खात्री करून घ्या. आर्थिक सल्लागार तुम्हाला त्यात काही बदल सुचवेल निवृत्ती नियोजन प्रक्रियेतील हा अनावश्यक टप्पा आहे. काही गुंतवणूकदार असे गृहीत धरतात की फंडांची कामगिरी समाधानकारक असेल तर सर्व काही ठिक आहे. परंतु आम्ही आमच्या गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओबद्दल विस्तृत चर्चा करतो.
पोर्टफोलिओचा वार्षिक आढावा घेण्यामागची ५ मुख्य कारणे:
१. आपली गुंतवणूक लक्ष्ये बदलली असतील:
आपल्याकडे अशी वित्तीय ध्येये असतील आणि ती ध्येये पूर्ण करण्यासाठी एकच गुंतवणूक पोर्टफोलिओ असू शकते. अशाच प्रकारे, आपल्या प्राधान्यक्रमांची नियमितपणे पुन्हा उजळणी करणे आणि आपला पोर्टफोलिओ त्या प्राधान्यांसह उजळणी करणे गरजेचे आहे. आपण नवीन घरासाठी बचत करत असाल परंतु आपल्या मुलांसाठी महाविद्यालयीन शिक्षणाच्या वाढीव खर्चाची हातमिळवणी करतांना आपल्याला आपला पोर्टफोलिओ बदलण्याची आवश्यकता असू शकेल आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या स्वत: च्या सेवानिवृत्तीच्या योजनांसाठी असलेल्या एसआयपीं पैकी एखादी एसआयपी बंद करावी लागणार असेल.
२. आपल्या जोखीमांकातील बदल:
जशी आपली वित्तीय ध्येये बदलतात तसा आपला जोखीमांक सुद्धा बदलतो. बदलेल्या नोकरीमुळे झालेली पगारवाढ किंवा एखाद्या परदेशातील अस्थायी नेमणुकीमुळे जोखीम घेण्याची क्षमता वाढते. उलटपक्षी सेवानिवृत्ती किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्यास खार्चिक रोगाने ग्रासाने, सारखी घटनेने जोखीमांक कमी होऊ शकतो. बदलत्या जोखीमंकानुसार मालमता विभाजन बदलणे हा वार्षिक आढाव्याचा एक उद्देश असतो. आपली गुंतवणूक बदलावी लागणार असेल म्युच्युअल फंड गुंतवणूकीचा उद्देश सुद्धा बदललेला असतो. आपल्या गुंतवणूकीच्या व्यापक उद्दीष्टांचीच नव्हे तर प्रत्येक गुंतवणूकीद्वारे आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेतलेली भूमिका देखील वार्षिक आढाव्याच्या निमित्ताने तपासता येते.
३. कर कक्षेतील बदल:
आपल्या वाढलेल्या किंवा कमी झालेल्या उत्पन्नामुळे आपल्या करदरांत बदल झाला असेल. किंवा सरकाने कर आकारणीच्या नियमांत बदल केले असतील. आपल्या वार्षिक आढाव्याच्या निमित्ताने आपल्या नव्या करकक्षेशी सुसंगत बदल गुंतवणुकीत करणे गरजेचे असते. कर नियोजन हा वार्षिक आढाव्याचा एक उद्देश असू शकेल. याबद्दल सल्लागाराला विचारण्यासाठी वार्षिक आढावा ही एक उत्तम वेळ आहे. आपल्या गुंतवणूकीचे मूल्य बदलत असताना आणि कर कायद्यांमध्ये चढ-उतार होत असताना आपल्याला आपली आणि गुंतवणुकीबाबतची संपूर्ण कर रणनीती पुन्हा तपासावी लागेल.
४. नामनिर्देशानातील बदल:
गुंतवणुकीत नामनिर्देशन अतिशय महत्वाचे आहे. आपल्याला आपल्या मालमत्तांच्या पुनरावलोकन करण्याची संधी वार्षिक आढाव्यानिमिताने मिळते. आपल्या कुटुंबातील आणि आपल्या मालमत्तेतील बदल प्रतिबिंबित करण्यासाठी मालमत्ता योजनांच्या नामनिर्देशनातील बदल करण्याची संधी वार्षिक पुनरावलोकनामुळे मिळते. उदाहरण सांगायचे तर मुलगा अथवा मुलीने अठरा वर्षे पूर्ण करणे कुटुंबातील नामनिर्देशित व्यक्तीला मुकणे, इत्यादी कारणांनी मालमत्तांच्या नामनिर्देशानात सुधारणा करावी लागते. हे बदल वार्षिक आढाव्याच्या निमितांनी करता येतात.
५. सेवानिवृत्ती नियोजनातील बदल:
आपली सेवानिवृत्ती नियोजन बदलू शकते. आपल्या नोकरी बदलामुळे निवृत्ती वायोमानात बदल किंवा पूर्व निश्चित वायोमानाऐवजी प्रकृतीस्वास्थामुळे लवकर घ्यावी लागणारी निवृत्ती किंवा अन्य काही कारणांनी सेवा निवृत्ती नियोजनात बदल घडलेले असतात. आपल्याकडे सेवानिवृत्तीची योजना असेल, वार्षिक पोर्टफोलिओ आढाव्याच्या निमित्ताने या गोष्टीकडे लक्ष देता येते.
पोर्टफोलिओ पुनरावलोकन प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आम्ही आपल्याला आज वसंत कुळकर्णी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आमंत्रित करत आहोत... आर्थिक सामुपदेशनासाठी Appointment Book करा.
[ssa_booking type=personal-consultation]
* Consultation Charges Apply