सातत्य राखलेला लार्जकॅप

भारतीय भांडवली बाजारात सतत तेजीला उधाण आले असून निर्देशांक रोज नव्याने उच्चांक प्रस्थापित करीत आहेत. हा लेख लिहित असतांना राष्ट्रीयशेअर बाजाराच्या निफ्टी-५० ने महत्त्वपूर्ण २२ हजाराची वेस ओलांडली आहे. गुंतवणूकदारांचा ओघ मिड आणि स्मॉल कॅप फंडात असला तरी मिडआणि स्मॉलकॅप मुल्यांकन उच्चांकी झाल्याने नवीन गुंतवणूक करतांना सावधगिरी बाळगली पाहिजे.

सर्वाधिक इक्वीटी रिसर्च रिपोर्टस हे लार्जकॅप कंपन्यांचे असतात. गुंतवणुकीत ‘इक्वीटी रिसर्च‘ ही महत्त्वाची प्रक्रिया आहे.  ‘इक्वीटी रिसर्च’ मुळे त्या कंपनीच्या व्यवसायाबद्दल मौल्यवाची माहिती आणि अंतर्दृष्टी गुंतवणूकदाराला प्रदान करते. जी माहिती गुंतवणूकदारांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि जोखीम कमी करण्यास मदत करते. लार्जकॅप कंपन्यांना ‘ओव्हर रिसर्च कंपनीज’ असे सुद्धा म्हणतात. लार्ज-कॅप कंपन्यांचे व्यवसाय हे  सुस्थापित व्यवसाय आहेत. ज्यांचे बाजार मूल्य  २० हजार कोटी किंवा त्याहून अधिक असलेल्या कंपन्यांना लार्जकॅप कंपन्या असे संबोधित केले जाते. या कंपन्यांचा बाजारपेठेतील हिस्सा दखल घेण्याइतका मोठा असते. या कंपन्या ‘बिझनेस लिडर्स’ असतात. या कंपन्यांचे त्या करीत असलेल्या उद्योगावर वर्चस्व असते. या कंपन्या खूप स्थिर असतात. मंदीच्या किंवा कोरोनासारख्या नकारात्मक घटनेच्या वेळी तग धरून बसण्याची या कंपन्यांची क्षमता असते. या कंपन्या अनेक दशकांपासून कार्यरत असतात आणि त्यांची प्रतिष्ठा चांगली असते. तुम्हाला कमी जोखीम घेऊन कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर लार्ज कॅप स्टॉक हा नेहमीच चांगला पर्याय समजला जातो. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांच्या तुलनेत हे लार्जकॅप कंपन्या कमी अस्थिर असतात आणि कमी अस्थिरतेमुळे गुंतवणुकीतील धोका देखील कमी असतो. तथापि, या कंपन्यांच्या गुंतवणुकीतील जोखीम कमी असल्याने परतावा देखील मिड आणि स्मॉलकॅप समभागांपेक्षा तुलनेने कमी असतो.

आज आपण अशा लार्जकॅप फंडाबाबत जाणून घेणार आहोत ज्या फंडात १, ३,५,७ आणि १० वर्षांपूर्वी केलेल्या गुंतवणुकीची सर्वात जास्त वाढ झाली आहे. (सोबतचे कोष्टक पहा)  मालमत्ता क्रमवारीनुसार सर्व कालावधीत पहिल्या दहा फंडात सर्वात चमकदार कामगिरी निप्पॉन इंडिया लार्जकॅप फंडाने केली आहे.

फंडमालमात्त   १ लाखाच्या गुंतवणुकीचे आजचे बाजार मूल्य *
(कोटी रुपये)   १ वर्ष३ वर्ष५ वर्ष  ७ वर्षे १० वर्ष 
निप्पॉन इंडिया लार्जकॅप१६८३७  १.२८१.९५२.१६ २.९७४.९३
एचडीएफसी टॉप १००   २५७७२  १.२६१.८३  २.०७२.७४ ४.२१
आयसीआयसीआय पृ. ब्लूचीप४११८६    १.२३१.७६२.१३२.८६४.३८
एबीएसएल फ्रंटलाईन इक्वीटी२३००३१.१९१.६३१.९६२.५३४.०३
एसबीआय ब्लूचीप   ३८५९७१.१८१.६१२.०४२.५८४.३८
मिरॅ असेट लार्जकॅप३४३७६ १.१५१.५४१.९३२.७१४.७२
युटीआय लार्जकॅप ११०७७१.१७                 १.५४१.९७ २.५९  ३.८६
कॅनरा रोबेको ब्लूचीप १०१८२  १.१८                   १.५४२.१४२.९४ ४.१०
अॅक्सीस ब्लूचीप ३०७३३ १.१४                  १.३५१.८५२.७६ ३.७८
फ्रँक्लीन इंडिया ब्लूचीप  ६६६५  १.१७                 १.५७१.८५ २.२८०३.४६
@ मालमत्ते नुसार पहिले दहा फंड  *  आजचे बाजार मूल्य (लाखांत) 

समभाग संशोधनामुळे (इक्वीटी रिसर्च) गुंतवणूकदारांना ते ज्या गुंतवणुक संधीच्या शोधात आहेत, त्याबद्दल सर्वसमावेशक माहिती मिळवता येते. ही माहिती  त्यांना कंपनीचा कॅश फ्लो, कार्यप्रदर्शन आणि भविष्यातील संभाव्य शक्यतांचे विश्लेषण करण्यात मदत करते. संबंधित विदा (डेटा) परीक्षण करून आणि सखोल संशोधणाअंती गुंतवणूकदार त्यांच्या उद्दिष्टांशी, जोखीम सहिष्णुता आणि एकूण गुंतवणूक धोरणाशी सुसंगत रणनीती, आखू शकतात. समभाग संशोधन गुंतवणूकदारांना गुंतवणुकीशी संबंधित ‘रिस्क रिवॉर्ड ट्रेडऑफ’चे मूल्यांकन करण्यास मदत करते. हे त्यांना बाजारातील अस्थिरता, उद्योगाशी समंधीत आव्हाने, नियामनातील बदल / कंपनीशी समंधीत घटक यासारखे संभाव्य धोके ओळखण्यास मदत होते.  सखोल संशोधन करून, गुंतवणूकदार गुंतवणुकीवरील संभाव्य परताव्याबद्दल आणि इच्छित परिणाम साध्य करण्याच्या संभाव्यतेबद्दल अधिक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात. संशोधन गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांशी जुळणाऱ्या गुंतवणुकीच्या संधी ओळखण्यात मदत करते. बाजारातील ट्रेंड, उद्योगाची गतिशीलता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान किंवा क्षेत्रांचे विश्लेषण करून, गुंतवणूकदार संभाव्य कमी मूल्यमापन केलेली मालमत्ता किंवा उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखू शकतात. सखोल संशोधन गुंतवणूकदारांना स्पर्धात्मक फायदा देऊन इतरांनी दुर्लक्षित केलेल्या संधी साधण्यास सक्षम करते.

सध्या मिड आणि स्मॉल-कॅप उन्मादी अवस्थेत असतांना  गुंतवणूकदारांसाठी या अतिउत्साही गुंतवणुकी व्यतिरिक्त आढावा घेण्यासाठी ही चांगली संधी आहे असे मी एक विश्लेषक म्हणून मानतो. सर्व साधारणपणे लार्जकॅपचे मुल्यांकन मिडकॅप स्मॉलकॅप पेक्षा महाग असतात. परंतु सध्या लार्जकॅपचे मुल्यांकन मिड आणि स्मॉल-कॅप पेक्षा १५ टक्क्यांनी कमी आहे (‘इंडेक्स पीई’). गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलीओत  सर्वाधिक वाटा लार्जकॅप गुंतवणुकीला द्यायला हवा. सध्या स्मॉलकॅप मिडकॅपचे मुल्यांकन ऐतीहातिक शिखरावर असल्याने अनेकांच्या गुंतवणुकीत पोर्टफोलिओचा मोठा भाग मिडकॅप स्मॉलकॅपने व्यापला असण्याची शक्यता आहे. पोर्टफोलीओचा समतोल साधण्यासाठी मध्यम जोखमीची भूक असलेल्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी लार्ज-कॅप फंडांचा विचार करण्याची वेळ आली आहे. अर्थात, निफ्टी 50 TRI आणि एस अॅण्ड पी बीएसई 100 TRI सारखे मानदंडांनी ३-४ टक्के दरम्यान परतावा दिल्याने अनेक गुंतवणूकदार सक्रिय व्यवस्थापित लार्ज-कॅप फंड टाळण्याच्या मानसिकतेत आहेत. परंतु ज्या निवडक लार्ज कॅप फंडांनी चांगला नफा गुंतवणूकदारांना कमावून दिला त्यात निप्पॉन इंडिया लार्जकॅप फंड आघाडीवर राहिला आहे. वर कोष्टक क्रमांक एक मध्ये सर्व कालावधीत निप्पॉन इंडिया लार्जकॅप आघाडीवर राहिला आहे. निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड गेल्या अनेक वर्षांपासून कामगिरीत सातत्य राखणारा फंड आहे.  जे गुंतवणूकदार ५-७ वर्षे दूर असलेल्या उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करू इच्छितात अशा गुंतवणूकदारांसाठी निप्पॉन इंडिया लार्जकॅप फंड एक उत्तम एसआयपी पर्याय आहे. पॉइंट-टू-पॉइंट रिटर्नच्या आधारावर मध्यम ते दीर्घ कालावधीत निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंडाची कामगिरी अव्वल झाली आहे. गेल्या पाच वर्षांत बहुतेक सक्रिय व्यवस्थापित लार्ज-कॅप फंडांनी मानदंड सापेक्ष हीन कामगिरी असतांना निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंडाची विशेष उठून दिसते. निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंडाने  एक, तीन, पाच आणि दहा वर्षांच्या कालावधीत S&P BSE 100 TRI सापेक्ष चांगली कामागीती केली आहे. फंडाने गेल्या दहा वर्षात १६.८६ टक्के चक्रवाढ दराने वार्षिक परतावा दिला आहे, ज्यामुळे लार्जकॅप फंड गटात सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेला फंड ठरला आहे. मागील दहा  वर्षांचा फंडाचा एसआयपी परतावा (XIRR) देखील १६.११ टक्के असून लार्जकॅप गटात सर्वाधिक १० वर्षे एसआयपी परतावा असलेला फंड ठरला आहे. डिसेंबर २०१३- नोव्हेंबर  २०२३ या कालावधीत पाच वर्षांच्या रोलिंग रिटर्नच्या आधारावर, निप्पॉन इंडिया लार्ज कॅपने सरासरी ११.४१ टक्के परतावा दिला आहे, जो त्याच्या बेंचमार्कच्या परताव्यापेक्षा जास्त आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी, यूटीआय मास्टरशेअर, एचडीएफसी टॉप १०० आणि फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप यांसारख्या लार्जकॅप फंडाच्या परताव्यापेक्षा अधिक आहे. (कोष्टक क्रमांक २ पहा)

कोष्टक क्रमांक २ (५ वर्षाची चलत सरासरी)
सरासरी कमाल   किमान                     रिटर्न डिसट्रिब्यूशन (% वेळा)
                                               कमालकिमान                       ० पेक्षा कमी   ० ते ८ %   ८ ते १२ १२ पेक्षा अधिक
निप्पॉन इंडिया लार्जकॅप   ११.४१ १८.१३-१.९२  ०.८९        १६.२५ ३१.२०  ५१.६६
एस अॅण्ड पी बीएसई 100 TRI१२.१८                                    १.०८ -१.०१  ०.१६   ११.८५    २५.६२६२.३७

आलेख क्रमांक -१  (मागील दहा वर्षातील ५ वर्षाची चलत सरासरी (संदर्भ: मोर्निंगस्टार))

शैलेश राजभान आणि आशुतोष भार्गव हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. शैलेश राजभान हे फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (इक्विटी इंवेस्टमेंट) आहेत. शैलेश राजभान मागील १६ वर्षे या फंडाचे निधी व्यवस्थापक असून सप्टेंबर २०२१ पासून आशुतोष भार्गव यांची सहनिधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली. सक्रिय व्यवस्थापित लार्ज-कॅप फंडांचा गुंतवणुकीचा परीघ मर्यादित असतो. लार्ज-कॅप फंडांना त्यांच्या मालमत्तेपैकी ८० टक्के मालमत्ता एस अॅण्ड पी बीएसई 100 मध्ये अंतर्भूत असलेल्या कंपन्यांत गुंतवावी लागते. या मर्यादेमुळे अनेक फंड केवळ निर्देशांक सापेक्ष गुंतवणुक करतात. निप्पॉन इंडिया लार्जकॅप फंडाने मागील अनेक वर्षांमध्ये विविध उद्योगांना आणि कंपन्यांना आपल्या गुंतवणुकीत स्थान दिल्याचे दिसून आले आहे. निर्देशांकात बँकिंग आणि वित्तीय सेवा उद्योगाचा प्रभाव असल्याने बहुतेक लार्ज-कॅप फंडांप्रमाणेचनिप्पॉन इंडिया लार्जकॅप फंडाच्या गुंतवणुकीत बँकिंग आणि वित्तीय सेवाक्षेत्रातील  समभागांनी पोर्टफोलिओचा मोठा भाग व्यापला आहे. मागील दहा वर्षात बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील गुंतवणूक ३०  टक्क्यांपेक्षा नेहमीच जास्त राहिली आहे. मागील तीन वर्षाचा विचार केला तर कोरोन नंतर बँकिंग खालोखाल गुंतवणुकीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्र होते. क्षेत्रातील तेजीचा फायदा या फंडाला मिळाला. जानेवारी –मार्च २०२२ दरम्यान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे मुल्यांकन वाढले आणि व्यवसायातील आव्हाने स्पष्ट झाल्यामुळे फंडाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक कमी केली. मागील तीन वर्षांत फंडाने ग्राहक उपयोगी वस्तू (एफएमसीजी) कंपन्यांत गुंतवणूक वाढवत नेल्याचे दिसते. फंडाच्या सध्याच्या गुंतवणुकीचा विचार केल्यास पेट्रोलियम उत्पादने आणि बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक निर्देशांक सापेक्ष जास्त आहे. मागील दोन महिन्यांचा विचार केल्यास फंडाने एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक रिलायंस इंडस्ट्रीज, आयटीसी अॅक्सीस बँक हिंदुस्थान युनी लिव्हर इंफोसिस यांच्यातील गुंतवणूक वाढविली आहे. स्टेट बँक, झी एन्टरटेनमेंट, एसबीआय कार्ड्स, आणि लिंडे इंडिया यांच्यातील गुंतवणूक कमी केली आहे. युनियन बँक आणि टाटा टेक्नॉलोजी यांचा नव्याने समावेश केला आहे तर मॅरिकोला गुंतवणुकीतून वगळले आहे. निप्पॉन इंडिया लार्ज कॅपबद्दल एक मनोरंजक गोष्ट म्हणजे ते मार्केट ट्रेंड ओळखण्यात माहीर आहेत. उदाहरण सांगायचे तर कोविड-नंतरच्या कालावधीत  आदरातिथ्य सेवा (अत्यावश्यकपणे हॉटेल्स) मधील गुंतवणूक वाढविली. सध्या फंडाची ६.०९ टक्के गुंतवणूक आदरातिथ्य क्षेत्रात आहे. कामाशी संबंधित प्रवास पुन्हा सुरू करण्यासाठीसुट्ट्या घेण्यासाठी आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठीलोक उत्सुक होते. या काळात फंडाने आयटीसी, इंडियन हॉटेल्स, आणि इआयएच लिमिटेड या कंपन्यांच्या माध्यमातून आदरातिथ्य सेवेशी संधीत गुंतवणूक केली आहे. फंडाने नेहमीच प्रत्येक उद्योग क्षेत्रातील दोन किंवा तीन प्रमुख कंपन्यांना गुंतवणुकीत स्थान दिले आहे. निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंडाच्या पोर्टफोलिओत साधारणतः ५२ ते ५५  कंपन्यांना स्थान दिलेली आढळते. 

निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड फंड ८ ऑगस्ट २००७ मध्ये सुरु झाला. झाली. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड ही भारतातील सर्वात मोठी विदेशी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (AMC) आहे. निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड ३० नोव्हेंबर २०२३रोजी १६८३७ कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन  (AUM) करीत होता.  खर्चाचे प्रमाण १.६९ % आहे. शैलेश भान हे फंडाच्या सुरुवातीपासून या फंडाचे निधी व्यवस्थापन करीत आहेत.

ऑगस्ट २००७ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीतील फंडाच्या कामगिरीचा विचार केल्यास वर्ष २०१६ आणि २०१८ ते २०२० या काळात फंडाची कामगिरी समाधान कराक नव्हती. परंतु कोरोन पश्चात सर्वात लवकर या फंडाने पुनरागमन केले. व्यवस्थापकाचा मूल्यांकन-केंद्रित समभागांची निवड करण्याचा दृष्टीकोन यामुळे जून २०२१ पासून फंड ‘टॉप क्वारटाइल’मध्ये दिसू लागला. फंडाने २०२२ मध्ये ग्राहकाभिमुख वस्तू, आर्थिक आवर्तानाशी निगडीत  आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांची निवड तसेच औद्योगिक वापराच्या वस्तू आणि तंत्रज्ञान क्षेत्रात निर्देशांक सापेक्ष अधिक गुंतवणूक केल्याचा फायद झाला. या वर्षी, हा फंड त्याच्या श्रेणीतील सर्वोच्च कामगिरी करणारा आहे, मुख्यत्वे औद्योगिक, ग्राहक विवेकाधिकार आणि आर्थिक क्षेत्रातील मजबूत कामगिरीमुळे. अलिकडच्या वर्षांत त्याच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीमुळे, फंड विविध कालमर्यादेत ‘टॉप क्वारटाइल’मध्ये आहे. फंडाकडे दीर्घकालीन उत्कृष्ट कामगिरी देण्याची क्षमता आहे. लार्ज कॅप फंड बाजाराच्या  विविध टप्प्यात तुमच्या पोर्टफोलिओला स्थैर्य आणि रोकड सुलभता देते. निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड ही गेल्या १० वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या लार्ज कॅप फंडांपैकी एक फंड आहे. हा फंड तुमच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी सर्वोत्तम फंड आहे. सेवानिवृत्ती नियोजन, मुलांचे उच्च शिक्षण, आणि संपत्ती निर्माण करणे या वित्तीय ध्येयांसाठी गुंतवणूकदार या फंडाची निवड करू शकतात. हा फंड तरुण किंवा नवीन गुंतवणूकदारांसाठी देखील योग्य आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top